सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न म्हणजे खरेदी, धावाधाव ही चाललेली असतेच. त्यात महिने कसे निघून जातात व लग्नाची वेळ येऊन थडकते ते कळतही नाही. खरंतर या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते मुलीची. प्रत्येक मुलीला आपण लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावं असं वाटत असतं, मात्र त्यासाठी नेमकं काय करावं? आपण कुठे आणि कशी ब्युटी ट्रीटमेंट घ्यावी? कुणावर विश्वास ठेवावा? खरं आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला कुठे मिळेल? मग त्याचा खर्च किती येईल? असे अनेक प्रश्न नवऱ्या मुलीला भेडसावत राहतात, मग कुणाला तरी विचारून ती एखाद्या सलोन किंवा स्पामध्ये जाते आणि ट्रीटमेंट घेते. मात्र प्रत्येक वेळी तिला त्यातून समाधान मिळेलच असं नाही. कितीतरी गोष्टी राहून जातात व पसाही भरपूर जातो.
लग्न जमलं रे जमलं की विविध रीतिरिवाजांप्रमाणे कार्यक्रम असतात. साखरपुडा, केळवण, पार्टी, मेहंदी इत्यादी कार्यक्रमांसाठी नवरीला खास तयार व्हावं लागतं. प्रत्येक कार्यक्रमाला आगळावेगळा लुक असला पाहिजे असं तिला मनापासून वाटत असतं. कारण हे तिचं स्वप्न असतं. आजच्या काळात ब्युटी ट्रीटमेंटमध्ये कमालीचा बदल घडलेला आहे. त्यात ‘हेड टु टो’ म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उपचार घेतले जातात. त्यात आयब्रो, व्ॉक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीचिंग, फेशियल हे, बेसिकली उपचार येतात याच्या व्यतिरिक्त दुल्हन स्पा हल्ली घेतला जातो. म्हणजे यात बॉडी पॉलिशिंग, बॉडी रॅपिंग, बॉडी मास्क अशा प्रकारे डिझाइन केलेला उपचार येतो. दुल्हन स्पामध्ये तिच्या संपूर्ण शरीराचे पॉलिशिंग होऊन त्वचा टवटवीत होते. मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेमध्ये नवी चमक येते.
दुल्हन स्पा कधी करावा?
* हळद व मेहंदीच्या पहिल्या दिवशी दुल्हन स्पा करावा.
* स्पानंतर हळदीचा कार्यक्रम केल्यास उपयुक्त ठरतो.
* लग्न खरेदी पूर्ण झाल्यानंतरच स्पा करावा. म्हणजे बाहेर उन्हातान्हात फिरण्याची वेळ येणार नाही.
* स्पानंतर उन्हात फिरू नये. घरातच रिलॅक्स करावे.
* तेलकट खाऊ नये. सात्त्विकभोजन केल्यास चांगलं.
स्पा कशा प्रकारे करतात?
खरंतर बॉडी स्पा करताना मंद प्रकाश असलेली खोली हवी. फुलं, सुगंध, रिलॅक्स करणारे तेल हे डिफ्युजरमध्ये वापरून खोली सुगंधित केलेली असावी. त्या ठिकाणी मंद संगीतमय वातावरण असावं. बॉडी स्पामध्ये संपूर्ण शरीर क्लिन्झिंगनं क्लीन करून स्वच्छ केलं जातं. त्यानंतर स्क्रब लावून त्वचेचं डीप क्लिंझिंग केलं जातं. त्यानंतर मिनरल सॉल्ट लावून त्वचेवरील मृत त्वचा काढली जाते. संपूर्ण शरीरावर समुद्री जेल लावून अल्ट्रासाउंड मशीनने ते जेल संपूर्ण शरीरात मुरवले जातं. त्यामुळे त्वचेची मृदुता कायम राहून त्वचा उजळते. त्यानंतर अॅरोमा तेल किंवा बॉडीबटरने संपूर्ण शरीरावर मसाज दिला जातो. त्यानंतर बॉडीवर पॅक लावून त्यावर फुलांच्या पाकळ्या लावून क्लिंग फिल्म (प्लॅस्टिक)ने कव्हर केले जाते. त्यामुळे स्किन फार मऊ होते.
हा स्पाचा एक प्रकार झाला. मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या त्वचेनुसार तुमच्या समस्यांनुसार स्पा डिझाइन केला जातो. त्यामध्ये ३००० रुपयांपासून तुमच्या बजेटनुसार खर्च असतो. लग्नसराईच्या दिवसात वेगवेगळ्या पॅकेजमध्ये घेतल्यास स्पा स्वस्त पडतो. तर काही सलोन, स्पा किंवा क्लिनिकमध्ये मेकअपच्या पॅकेजमध्येही स्पा दिला जातो.
सुंदर मी : नववधू प्रिया मी..
लग्न ठरल्यावर लगेचच मुलगी ब्युटी ट्रीटमेंट घ्यायला सलोन किंवा स्पाची पायरी चढते. पण काय करावं, कोणती ट्रीटमेंट घ्यावी, खर्च काय होईल यातच मुलगी गोंधळलेली दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beauty treatment tips for new bride