जिममध्ये जाण्याचा आनंद दुप्पट होतो, जेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना जाणवू लागतात. पण अनेकदा असे होते की जिममध्ये नियमितपणे व्यायाम करूनही त्याचे काही परिणाम दिसत नाहीत. म्हणजे जिम लावल्यावर काही दिवसातच जवळच्या लोकांकडून पॉझिटिव्ह रिअॅक्शन येत नाही. वेट लॉस आणि इंच लॉस काहीच आपल्याला जाणवत नाही. असे झाले की मग व्यायाम करण्याचा उत्साह उतरणीला लागतो आणि जिम एक कंटाळवाणी गोष्ट वाटू लागते. जर हे तुमच्या किंवा तुमच्या मित्रांबरोबरही झाले असेल तर..
सर्वप्रथम, आपले ट्रेिनग तपासून पाहा. आठवडय़ातून ४ ते ५ वेळा जिमला नियमितपणे जाऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच ट्रेिनग करत असताना काíडओ आणि स्ट्रेन्थ ट्रेिनग देणारा व्यायाम यांचे मिश्रण करून शरीराला योग्य आराम मिळेल याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर या सर्व गोष्टी योग्यप्रकारे पाळल्या जात असतील, तर तुमच्या डाएटमध्ये काहीसे बदल करण्याची आवश्यकता आहे.
व्यायाम करणाऱ्यांसाठी योग्य डाएटची सप्तसूत्री.. अर्थात काही टिप्स
१. पहिल्यांदा, आपल्या डाएटमध्ये काय कमतरता आहे हे समजून घ्या. जर एखादी व्यक्ती एक तास व्यायाम करते आणि हाय कॅलरीचे पदार्थ खाते तर शरीरात साठवलेले फॅट कमी होणे अवघड होते. साहजिकच अशा व्यक्तीचे वजन कमी होत नाही.
२. प्रोटिन्स किती प्रमाणात घेतले जातात हे पाहणे गरजेचे आहे. व्यायामाला सुरुवात केलेल्या व्यक्तीला १.५ ग्रॅम ते १.८ ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते तर नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला १.८ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रोटिन्स गरजेचे असतात. अंडय़ातील पांढरा भाग, व्हे प्रोटिन, चिकन, मासे, दुधाचे पदार्थ हे प्रोटिन्सचे चांगले स्रोत आहेत. व्यायामानंतर शरीराची हानी भरून काढण्यासाठी व्यायाम करणाऱ्याच्या वजनाचा विचार करता प्रतिकिलो १ ग्रॅम प्रोटिन्सचे सेवन केले नाही तर मसल लॉस होण्याचा धोका असतो.
३. फायब्रस काबरेहायड्रेट्स (उदाहरणार्थ आर्टचिोक, ब्रोकोली, रासबेरी, व्होल ग्रेन) आणि प्रोटिन्स (उदाहरणार्थ मासे, अंडय़ाचा पांढरा भाग, दही, अक्रोड इत्यादी) यांचा आहारात समावेश केला तर वजन किंवा चरबी कमी करण्यास ते फायदेशीर ठरतात. कारण त्यामुळे चयापचय वाढते. त्यामुळे पचनादरम्यान कॅलरींचे विघटन होण्यास मदत होते.
४. अक्रोड, फ्लाक्ससीड आणि माशांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटमुळेही चयापचयात वाढ होते.
५. पाचवी गोष्ट म्हणजे, शरीरातील पाण्याची पातळीही महत्त्वाची ठरते कारण डिहायड्रेट झालेले शरीर फॅट कमी करू शकत नाही तसेच मसल्स वाढवू शकत नाहीत. शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर व्यायामाचा शरीरावर फारसा परिणाम जाणवत नाही. दिवसाला किमान २ ते ३ लिटर पाणी न चुकता प्यायला हवे.
६. आपल्या डाएट बाहेर जाऊन आपण किती वेळा इतर पदार्थ खातो यावरही लक्ष ठेवले तरी फायदा होतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर अतिरिक्त व्यायाम केला तर या पदार्थानी होणारे नुकसान भरून काढता येऊ शकते.
७. अखेरचे म्हणजे, केवळ वजनाकडे पाहून आपले शरीर योग्य प्रमाणात आहे की नाही हे ताडणे चुकीचे आहे. मसल्स वाढल्याने वजन वाढते. या वाढणाऱ्या वजनामुळेही अनेकजण चिंता करतात पण ते योग्य नाही. चोख डाएट आणि उत्तरोत्तर वाढणारा व्यायाम तुमच्यात अपेक्षित बदल घडवू शकतात.
जान्हवी चितलिया – viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट असून वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा