मितेश रतिश जाशी

काही तासांचे ते काही दिवसांचे आयुष्य असलेली, काही मिलिमीटर ते काही सेंटिमीटर आकाराची फुलं आपल्या रंगाने, सुवासाने पर्यटकांना आकर्षित करायला लागतात. त्यामुळे ही ‘पुष्पश्रीमंती’ पाहण्यासाठी पर्यटक वेड्यासारखी गर्दी करतात.

stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
diwali preparation at home
Diwali 2024 : आली माझ्या घरी ही दिवाळी!
corporate gifting gift trend on diwali occasion diwali gifts ideas for friends diwali gifts for family zws 70
भेटवस्तूंचा ट्रेण्ड
Loksatta viva safarnama health Tourism Sleep tourism trend
सफरनामा: झोपेसाठी पर्यटन!
loksatta viva article Blouse type Boat neck blouse Blouse type Saree Fashion
नव्याकोऱ्या चोळीचा साज
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण

पावसाळी भटकंती सर्वांनाच मोहवून टाकणारी असते. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, डोंगरातून वाहणारे पांढरेशुभ्र ओढे, कड्यावरून कोसळणारे धबधबे, हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटांनी आच्छादलेले डोंगर व शेते, धुक्यात हरवलेले किल्ले व डोंगर, ऊन-पावसाचा खेळ अशा विविधांगी छटांनी नटलेल्या या पावसाची मोहिनी सर्वांनाच पडते. हा पावसाळा जसा मोहवून टाकणारा आहे, तशीच पावसाळ्यानंतर फुलणारी पुष्पचादरही सर्वांना आकर्षित करणारी आहे. सरत्या पावसाळ्यात महाराष्ट्रामधील सह्य़ाद्री पर्वतरांग अनंत रंगांनी न्हाऊन निघते. पाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फुटू लागतात. जमीन हिरवा शालू पांघरते. पाऊस पडल्या पडल्या फुलांची हजेरी सुरू होते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरअखेपर्यंत सह्याद्रीचं हे नटणं अगदी भान हरपून टाकणारं असतं. काही तासांचं ते काही दिवसांचं आयुष्य असलेली, काही मिलिमीटर ते काही सेंटिमीटर आकाराची फुलं आपल्या रंगाने, सुवासाने पर्यटकांना आकर्षित करायला लागतात. त्यामुळे जगभरातील ‘पुष्पश्रीमंती’ पाहण्यासाठी पर्यटक देशाटन करतात.

कास पठार

सातारा जिल्ह्यातील जैववैविध्याने नटलेलं ठिकाण म्हणजे कास पठार. सह्याद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरलं आहे. कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडलं असल्याची दंतकथा सांगितली जाते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचं मंदिर आहे. कासा या वृक्षाचं वैशिष्टय़ म्हणजे याची पानं पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. मार्च महिन्यात फक्त १५ दिवसांच्या कालावधीत यास पांढऱ्या रंगांची फुलं लाल पाकळ्यांसह गुच्छागुच्छाने आलेली दिसतात. कास पुष्प पठाराचं खरं सौंदर्य फुलतं ते सप्टेंबर महिन्यात. कास पठार हे कातळ खडकाचं, कमी प्रमाणात माती असलेलं पुष्प पठार आहे. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अति दुर्मीळ वनस्पतींचादेखील समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पठारावर रंगीबेरंगी फुलांचे पट्टे बहरू लागतात. निळ्या, जांभळया, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांच्या फुलांची आरास इथे सजलेली पाहावयास मिळते. कास पुष्प पठारावर पाऊस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फुलं फुलायला लागतात, पण कासच्या पठारावर मोठय़ा प्रमाणात असलेली टोपली कारवी सात ते बारा वर्षांत एकदाच फुलते, तेव्हाचं कास पठाराचं दृश्य केवळ अवर्णनीय असतं. इंटरनेटच्या महाजालात आणि प्रसिद्धी माध्यमातून कारवीने खच्चून भरलेल्या कासच्या छायाचित्रांमुळे कासवर हवशा-नवशा-गवशा पर्यटकांचा लोंढा इतका वाढला आहे की शहरातल्याप्रमाणे ट्रॅफिक जाम होऊ लागतं. त्या प्रदूषणाने आणि लोकांच्या बॉलीवूड टाइप बागडण्याने आता कासच्या फुलांनाही धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे वन खात्याने कास पठारालाच कुंपण घातलं आहे.

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: यंगेस्ट ऑलिम्पियन अमन

काश्मीर

जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पुष्पप्रेमींच्या विशेष जिव्हाळ्याचं आहे. हे गार्डन १५ हेक्टर क्षेत्रात पसरलं आहे. या गार्डनमध्ये जवळजवळ ६८ जातींची १५ लाख ट्युलिप्स आहेत. दल लेक आणि झबरवान टेकडीच्या पायथ्याशी असलेलं आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन ही श्रीनगरमधील दोन ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत या दोन्ही ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये ट्युलिप गार्डन सुरू केलं होतं. दहा वर्षांत आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं ट्युलिप गार्डन खूप महत्त्वाचं आहे. दरवर्षी लाखो लोक देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पृथ्वीवरील हे नंदनवन पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतात.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

गढवालमधली ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हा पुष्पश्रीमंतीचा अद्भुत नजराणा आहे. १० किमी लांब आणि ३ किमी रुंद पसरलेल्या दरीत जागोजागी असंख्य फुलं फुललेली दिसतात. हा सगळा भाग ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखला जातो. या सगळ्या प्रदेशाला रातबन, हाथी पर्वत, निलगिरी पर्वत, गौरी पर्वत, खिलीया घाटी अशा पर्वतांचा गराडा पडलेला आहे. १९८८ साली या प्रदेशाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हिरव्या पार्श्वभूमीवर निळे, जांभळे, लाल, केशरी, पांढरे, पिवळे, गुलाबी अशा रंगांचे नैसर्गिक वाफे तयार होतात. या फुलांभोवती मधमाश्यांचा गुंजारव सुरू होतो, वाइल्ड मेरीगोल्ड मोठ्या डौलाने डोलत असतात. गुलाबी रंगांचे आणि एकेरी पाकळ्यांचे गुलाब इथे दिसतात. मध्येच तेरड्याने आपलं डोकं वर काढलेलं दिसतं. फुलांच्या रंगांची उधळण करायला इथे येतात बेगोनियाज, जरबेराज, डॅफोडिल्स, कॉर्नफ्लॉवर्स, ग्लॅडीओलस आणि असे असंख्य. खरोखर आपलं देहभान हरपून जातं. थुम्मा, हाथजारी, रुद्रवंतीजारी, दीपजारी अशा औषधी वनस्पतीसुद्धा इथे दिसतात. दीपजारीचा उल्लेख कालिदासाने कुमारसंभवात केला आहे. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’शी लोककथादेखील जोडल्या गेल्या आहेत. द्रौपदीने अलकनंदा आणि लक्ष्मणगंगेच्या संगमावर प्रवाहात सुरंगी ब्रह्मकमळाचं फूल पाहिलं. त्याच्या शोधात भीम पुष्पगंगेच्या किनाऱ्याने दरीत शिरला. तेथे पुष्पसमुद्रातच त्याला ब्रह्मकमळांचा ताटवा दिसला, अशी कथा सांगितली जाते. एप्रिलपासून इथलं बर्फ वितळू लागतं. जूनपासून उबदार वातावरण आणि हलकासा पाऊस सुरू होतो. मग गढवालमधली ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हिरवी शाल पांघरून बसते आणि त्या शालीवर नाना रंगांची फुलं फुलून एक देखणा कशिदा तयार होतो. सप्टेंबपर्यंत हा परिसर अशा असंख्य फुलांनी फुललेला असतो.

चेरीब्लॉसम जपान

तुम्ही कधी वसंत ऋतूत जपानला गेलात, तर तिथले अनेक रस्ते पांढऱ्या, गुलाबी किंवा किंचित जांभळट फुलांनी अंगभर बहरलेल्या ‘साकुरा’ वृक्षांनी सजलेले दिसतील. साकुरा वृक्ष म्हणजे सुंदर फुलांच्या बहरासाठी जगभर प्रसिद्ध असणारे चेरीब्लॉसम! जपानी संस्कृतीमध्ये अनेक शतकांपासून माणसांना अभूतपूर्व असा जीवनानंद देणारा वृक्ष अशी साकुराची ख्याती आहे. हा जीवनानंद तात्कालिक, पण अलौकिक असतो असं जपानचे लोक मानतात. तात्कालिक यासाठी की वसंत ऋतूच्या आगमनानंतर अवघे १० दिवस या चेरीब्लॉसम फुलांचा बहर टिकतो आणि नंतर ती सारी फुलं गळून पडतात. एका दृष्टीने या साकुरा वृक्षांचा जीवनक्रम मानवाच्या जीवनक्रमाशी मिळताजुळता आहे. हा वृक्ष मोठा होऊन सुमारे १५ वर्षांचा झाला की मार्च-एप्रिलमध्ये त्याला फुलं येऊ लागतात. हा वृक्ष २०-२१ वर्षांचा झाला की त्याच्या फुलांचा बहर शिगेला पोहोचतो. त्यानंतर मात्र हा बहर कमी कमी होत जातो. साधारण ७० वर्षांनंतर हा वृक्ष मृत होतो.

हॉलंड

ट्युलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते. हॉलंडमधलं कुकेनहाफ ट्युलिप गार्डन म्हणजे निसर्गाच्या मुक्त सौंदर्याविष्काराचा आणि त्याला मिळालेल्या सौंदर्यासक्त मानवी प्रयत्नांचा अनुभवला पाहिजे असा नजराणाच आहे. दरवर्षी मार्चअखेर ते मध्य मे या केवळ सात आठवड्यांच्या काळातच तिथे प्रेक्षकांना प्रवेश असला तरी जगभरातील लाखो टुरिस्ट या काळात त्याला भेट देऊन डोळ्यांचं पारणं फेडतात. या बागेचा इतिहास चक्क २०० वर्षांचा आहे!

बागेचं सध्याचं रुपडं सजलं १९५० साली आणि तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढतच चालली आहे. झाडांचे पिरॅमिड्स आणि वेलींच्या हिरव्यागार कमानींमध्ये फुलांचे मनोहारी ताटवे, सरळ सूर्यकिरणांचा आभास करणारे कालवे आणि त्यामध्ये थुईथुई उडणारी कारंजी या सर्वाचा त्रिवेणी संगम इथे अनुभवता येतो.

viva@expressindia.com