आपला ‘वुमन्स डे’ नुकताच साजरा करून झाला आणि त्यानिमित्त होणारे कार्यक्रमांचे सोपस्कारसुद्धा उरकले. पण सेलिब्रेशनच्या मूडमध्येही इस्थर आणि निर्भया प्रकरणे मनात सलत राहिली. प्रत्येक स्तरातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, हेदेखील आज प्रकर्षांने जाणवतंय. नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘काळाघोडा फेस्टिव्हल’मधल्या एका गटाने लोकलमध्ये महिलांच्या डब्यावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रावर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते, या चित्रांमध्ये साडी, डोक्यावरून पदर, नाकात चमकी, कानात, हातात आणि गळ्यात सोन्याचे दागिने ही महिलांची प्रतिमा अत्यंत चुकीची आहे. आजची स्त्री आणि तीसुद्धा लोकलमधून प्रवास करणारी, शिक्षण आणि नोकरीसाठी फिरणारी तरुणी आणि लोकलच्या चित्रातील तिची प्रतिमा यात कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे तिथे आजच्या तरुण मुलीचे प्रातिनिधिक चित्र लावावे अशी त्यांची मागणी होती. आपल्या लाडक्या चित्रपटांच्या नायिकाही बदलताहेत. हीरोच्या मागे गाणी म्हणत बागेतून फिरणारी मुलगी या बॉलीवूडमधल्या नायिकेच्या प्रतिमेत कमालीचा बदल झाला आहे. स्वत:च्या आणि गावाच्या न्याय्य हक्कासाठी हातात लाठी घेतलेली ‘गुलाब गँग’मधली रज्जो असो किंवा स्वत:च्या हनिमूनला एकटीच जाऊन आपल्या अस्तित्वाचा थांग शोधणारी ‘क्वीन’मधली राणी असो या स्त्रिया स्वतंत्र होत्या. आपले निर्णय स्वत: घेण्याची धमक आणि त्याचे परिणाम सहन करायची तयारी त्यांच्यात होती. ही आणि अशी कित्येक उदाहरणे नुकत्याच प्रदíशत झालेल्या कित्येक चित्रपटांमधून पाहायला मिळाली आहेत.
फॅशन इंडस्ट्री या सगळ्यातून मागे कशी राहील. नुकताच मुंबईमध्ये लॅक्मे फॅशन वीकचा सोहळा थाटात पार पडला. फॅशन वीक म्हटले की लेटेस्ट ट्रेंड्स, स्टाइल्स यांच्या चर्चाना उधाण येते. त्यात हे होते िस्प्रग-समर कलेक्शन. त्यामुळे पेस्टल शेड्स, फ्लोरी गारमेंट्स, फुलाफुलांची डिझाइन्स असे ट्रेंड्स पाहायला मिळतील असा साधारण अंदाज बांधला जातो. पण यंदाचे समर कलेक्शन मात्र या प्रतिमेला छेद देणारे होते. या वेळी कित्येक डिझायनर्सनी ‘मॅस्क्युलिन’ लाइनची डिझाइन्स सादर केली. शार्प, क्रिस्प कट्स, बॉडीसूट्स, जॅकेट्स, ट्राउझर्स असा संपूर्ण कॉर्पोरेट लुक यंदा रॅम्पवर पाहायला मिळाला. रंगाच्या बाबतीतही सफेद, काळा, ब्राऊन, नेव्ही, मेहंदी ग्रीन, ग्रे, मरून अशा काही मॅस्क्युलिन शेड्स पाहायला मिळाल्या. या ट्रेंडबद्दल डिझाइनर पल्लवी सिंघी म्हणाली, ‘आजची स्त्री ही स्वतंत्र आहे आणि याच स्त्रीचे रूप
बोल्ड अँड ब्यूटिफुल
मुंबईत नुकताच लॅक्मे फॅशन वीक साजरा झाला. दर वर्षीप्रमाणे समर कलेक्शनमध्ये सादर होणाऱ्या ब्राईट, फ्लोरल डिझाइन्सऐवजी यंदा ‘मॅस्क्युलिन’ लाइनला डिझायनर्सनी प्राधान्य दिलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-03-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bold and beautiful