डोंबिवलीत राहणारा एक तरुण, आपल्या पदवी परीक्षेआधीच, ‘जगाची आíथक जडण-घडण’ या विषयावर निबंध लिहितो, तो जागतिक व्यासपीठाकडे पाठवितो आणि जगभरातून आलेल्या इतर सर्व निबंधांपेक्षा हा निबंध उजवा ठरतो. अवघ्या २० वर्षांच्या या तरुणाला जगभरातील विविध देशांकडून आमंत्रण मिळते आणि एका वेगळ्या विश्वात त्याचा प्रवेश होतो. पहिल्या परदेश गमनावेळी परकीय चलन कसे मिळवावे याची प्राथमिक माहिती नसलेला हा तरुण त्यानंतरच्या काही वर्षांत जागतिक समस्यांचा वेध ‘प्रोअ‍ॅक्टिव्हली’ घेऊन त्यावर उपाय सुचवू लागतो. हे सारेच स्वप्नवत वाटते नाही? पण हे सत्य आहे. संदीप वासलेकर असे त्यांचे नाव असून आपला हा प्रवास त्यांनी ‘एक दिशेचा शोध’ या पुस्तकात लिहिला आहे.
एकीकडे भारताला राजकीय, आíथक, सामाजिक प्रश्नांनी ग्रासले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सामान्य माणसाला त्याचे आयुष्य सहज-सुलभ आणि सन्मानाने जगता यावे यासाठी काय करता येईल? असा आपण विचार करीत असताना या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी आपल्याला केवळ राजकीय औदासीन्य दिसते. राजकीय नेतृत्वाचा – लोकप्रतिनिधींचा वाढता उद्दामपणा दिसतो आणि स्वाभाविकच या समस्यांवर आपण हतबल आहोत असा आपला ग्रह होत जातो. वासलेकर यांनी मात्र थोडा अधिक सूक्ष्मपणे विचार करीत आपण अशा समस्यांवर काय करू शकतो, राजकीय नेतृत्वाच्या उद्दामपणामागे आपलाही काही हातभार आहे का, आदी बाबींचा ऊहापोह केला आहे. जगातील विकसित देशांतील राष्ट्रप्रमुखांची, त्यांच्या जीवनशैलीची उदाहरणे त्यांनी यासाठी दिली आहेत. सामान्य नागरिक म्हणून आपण स्वावलंबी आणि स्वाभिमानी आयुष्य कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. एक आशेची पणती त्यांनी आपल्या लेखणीतून नक्कीच उजळवली आहे.
एका दिशेचा शोध, सिंहासन, आंधळी कोिशबीर, माणुसकीच्या शत्रूसंगे, एक छोटीशी आशा, हिमालयाला जेव्हा ताप येतो, वसुधव कुटुंबकम, केल्याने होत आहे रे आणि नियती, निश्चय, निर्मिती अशा नऊ प्रकरणांतून त्यांनी राजकारण, दहशतवादविरोधी लढाई, पर्यावरण, ग्लोबल वॉìमग अशा विविध विषयांना स्पर्श केला आहे. एकीकडे जग अशा प्रश्नांवर कोणत्या उपाययोजना करतंय आणि दुसरीकडे आपण काय करायला हवे, अशा दोनही प्रकारांनी त्यांनी विश्लेषण केले आहे. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी या पुस्तकाबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ‘हा सर्व खटाटोप कशासाठी? तर आपण डोळ्यावरची पट्टी काढून जग पाहिले पाहिजे. केवळ पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची आंधळी कोिशबीर खेळणं थांबविले पाहिजे. जगात योग्य अयोग्य काय ते जाणता आले पाहिजे. आपले जग, आपला देश, आपले शहर, आपले गाव उज्ज्वल मार्गाने एका नव्या दिशेकडे नेण्यासाठी काय करता येऊ शकेल आणि त्यातील आपले योगदान काय असेल हे ओळखता आले पाहिजे..’ असे वासलेकर यांनी लिहिले आहे.
आज जेव्हा आपण करिअरच्या वाटा ठरवत असू, आपल्या आयुष्याची दिशा शोधत असू, तेव्हा आपले योगदान काय, याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला महिती असणे गरजेचे आहे. अनेकदा माहिती असलेल्या उत्तराची अभिव्यक्ती घडविण्यासाठी गरज असते ती प्रेरणेची. संदीप वासलेकरलिखित ‘एका दिशेचा शोध’ ही प्रेरणा आणि चिकाटी यांचे चिरकाल टिकणारे इंधन आपल्याला नक्कीच पुरवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुस्तक- एका दिशेचा शोध
लेखक – संदीप वासलेकर
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
पृष्ठे – १८०
मूल्य – २५०/-

पुस्तक- एका दिशेचा शोध
लेखक – संदीप वासलेकर
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
पृष्ठे – १८०
मूल्य – २५०/-