रसिका शिंदे-पॉल

पॅरिस, मिलान, न्यू यॉर्क आणि लंडन फॅशन वीक म्हणजे फॅशनप्रेमींसाठी एक वेगळंच जग. त्यातही लॅक्मे फॅशन वीक म्हणजे प्रथितयश डिझायनर्सच्या बरोबरीने नवख्या फॅशन डिझायनर्सनाही आपली कलाकृती जगासमोर थेट आणण्याचे हक्काचे व्यासपीठ. फॅशनच्या बाजारपेठेत यंदा कुठल्या प्रकारचे फॅब्रिक्स, पॅटर्न्‍स, डिझाइन्स ट्रेण्डमध्ये असतील याची नांदी देणारा फॅशन शो म्हणून लॅक्मे फॅशन वीक नावाजला जातो. नुकतेच लॅक्मे फॅशन वीकचं या नव्या वर्षांतील पहिलं नवं पर्व नेहमीच्या झगमगाटात पार पडलं. नव्यांचे नवे आणि जुन्यांचेही नवे काही असा मिलाफ पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून साधला गेला. डिझाइन्समधील नवे प्रयोग आणि सस्टेनेबल फॅशनच्या दृष्टीने केले गेलेले प्रयोग, मनीष मल्होत्रासारख्या प्रसिद्ध डिझाइनर्सचे ग्लॅमरस कलेक्शन्स, शो स्टॉपर्स कलाकारांचा गाजावाजा अशा अनेक गोष्टी यथासांग फॅशनप्रेमींनी अनुभवल्या.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

मुंबईतील जिओ गार्डन येथे लॅक्मे फॅशन वीक २०२३ पार पडला. गेले काही वर्ष सातत्याने ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाइन’(आयएनआयएफडी)च्या सहकार्याने लॅक्मे फॅशन वीक ‘जेननेक्स्ट’ हा मंच नवोदित फॅशन डिझाइनर्स आणि फॅशन लेबल्ससाठी उपलब्ध करून देते आहे. या जेननेक्स्टच्या मंचावरून पुढे आलेल्या काही नामांकित ब्रॅण्ड्सचे उत्तम कलेक्शन या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाले. कोयटॉय, हिरो, कोया या प्रसिद्ध लेबल्सबरोबरच सिद्धार्थ बन्सल, रुद्राक्ष द्विवेदी अशा फॅशन डिझाइनर्सचे कलेक्शन हे यंदा जेननेक्स्टचे आकर्षण ठरले. ‘कोया’च्या अनुग्रह चंद्रा यांनी पहिल्यांदाच ही संधी मिळाल्याने लॅक्मेचे आभार मानत ‘क्वॉलेसिस’ या त्यांनी सादर केलेल्या कलेक्शनबद्दल माहिती दिली. क्वॉलेसिस म्हणजे दोन भिन्न टोकांना एकत्रित करणे. निसर्गाकडून प्रेरणा घेत मी हे कलेक्शन तयार केले आहे. आणि यात निसर्गातील महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे आणि त्यांच्या फांद्या, पाने यांच्यातून प्रेरणा घेत हे कलेक्शन तयार केले, असे अनुग्रह यांनी सांगितले. तर ‘इको ब्रुटलिझम’ या आर्किटेक्चर प्रकारातून प्रेरणा घेत रुद्राक्ष द्विवेदीने त्याचे कलेक्शन सादर केल्याचे सांगितले. आर्किटेक्चर घडवताना काळा आणि राखाडी रंग जास्त प्रमाणात वापरला जात असल्याने त्यानेही त्याच्या डिझाइन्स या दोन रंगांपुरत्याच मर्यादित ठेवल्याचेही सांगितलं.

या वेळी सिद्धार्थ बन्सल या फॅशन डिझाइनरने ‘सेवन हेवन’ या नव्या कलेक्शनची प्रस्तुती केली. माणसाच्या आयुष्यातील कडू-गोड आठवणी, अनेक चढ-उतारांचे प्रतिबिंब त्यांनी विविध रंगांच्या कपडय़ांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न कलेक्शनमध्ये केला होता. अभिनेत्री संजना सांघी ही त्यांच्या कलेक्शनची शो स्टॉपर होती. एरवी मेन्स फॅशन कलेक्शनचं प्रमाण हे इतर फॅशनच्या तुलनेत फार कमी असतं, यंदा मात्र खास मेन्सवेअरसाठी प्रसिद्ध असलेल्या लेबल्सनी ट्रेण्डी मेन्सवेअर कलेक्शन्स सादर केले. अंतर-अग्नी, कोयटॉय हे ब्रॅण्ड्स खास फॅशनेबल, स्ट्रीट स्मार्ट मेन्सवेअरसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. याशिवाय, साहिल अनेजा, ध्रुव-वैशसारख्या डिझाइनर्सचे मेन्सवेअर कलेक्शनही चर्चेचा विषय ठरले. ‘फॅशन डिझाइन कौन्सिल ऑफ इंडिया’ने ‘पर्ल अकॅडमी’च्या सहकार्याने आयोजित केलेला ‘फस्र्ट कट’ हा शोही नेहमीच्या फॅशन शोच्या भाऊगर्दीत वेगळा ठरला. जगभरात फॅशनउद्योगावर बरेवाईट परिणाम होत असताना भविष्यात हा उद्योग प्रगतीच्या दृष्टीने कसा परिणामकारक ठरू शकतो, या विषयावर देशभरातील ३२ फॅशन प्रशिक्षणक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मुद्दे या शोमध्ये मांडले. याशिवाय, स्ट्रीट स्टाइल फॅशनमधील ट्रेण्ड्स यावरही अन्विता शर्मा, अवनी अनेजा आणि हिरल जलाल या प्रसिद्ध डिझाइनर्सनी या वेळी मांडणी केलेली पाहायला मिळाली.

ग्लॅमरस शो स्टॉपर्स

लॅक्मे फॅशन वीकचा रॅम्प नेहमीच बॉलीवूड कलाकारांच्या उपस्थितीने झळाळून उठतो. या वेळी सत्तरच्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची रॅम्पवरची उपस्थिती सुखद धक्का ठरली. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर शाही मनन यांच्यासाठी झीनत अमान यांनी रॅम्प वॉक केले. याशिवाय, अभिनेत्री सारा अली खान, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी, सुश्मिता सेन, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, नेहा धुपिया अशा रॅम्प वॉक करण्यात मातब्बर असलेल्या अभिनेत्रींनीही लॅक्मे फॅशन वीक गाजवले. यंदा या शोमध्ये दूरचित्रवाहिनीवरील कलाकारही मागे राहिले नाहीत. सोनाली बेंद्रे, निम्रत कौर, आश्ना हेगडे, अरमान मलिक, आदित्य सील अशा नावाजलेल्या कलाकारांनी या वेळी वेगवेगळय़ा ब्रॅण्डसाठी रॅम्प वॉक केले.

फॅशन म्हणजे ट्रेण्डिंग काही ना काही असायलाच हवं. आणि हीच ट्रेण्डिंग फॅशन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर असे नावाजलेले फॅशन वीक करतात. भारतीय पारंपरिक वस्त्रोद्योग आणि कला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्या फॅशन डिझाइनर वैशाली शडांगुळे हिने यावेळी लॅक्मे फॅशन वीकमध्ये खोल समुद्रातील जग आणि माणसाचे अंतर्मन कसे असते याचा मेळ जुळवत नव्या डिझाईन्सचं कलेक्शन सादर केलं. ‘‘खोल समुद्रात गेल्यावर आपण आधी घाबरतो आणि नंतर आपण हळूहळू पाण्यात तळाशी असलेल्या रंगीबेरंगी गोष्टी शोधायला लागतो. याच गोष्टींचा विचार करत मी ‘अबिस’ (अथांग) संकल्पनेवर आधारित कलेक्शन सादर केलं’’, असं वैशाली सांगते. या कलेक्शनसाठी जे कपडे मी वापरले आहेत ते सर्व मी याआधी तयार केलेल्या विविध फॅब्रिकमधून उरलेले कपडे आहेत. त्यातूनच ही कलाकृती घडवल्याचेही वैशालीने सांगितले.

यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये विविध डिझाइनर्सनी आपलं कलेक्शन स्टॉलरूपातही उपलब्ध करून दिलं होतं. उन्हाळय़ाच्या ऋतूला साजेसे पार्टीवेअर, कॅज्युअल वेअर असे विविध आकार-प्रकारातील फॅशनेबल कपडे या स्टॉल्सवर उपलब्ध होते. याशिवाय, अनुज क्रिएशन, अनुश्री रेड्डी, पुनीत बालन या डिझाइनर्सनी सादर केलेलं एकाहून एक डोळय़ात भरतील असं वेडिंग कलेक्शनही फॅशनप्रेमींसाठी पर्वणी ठरलं.

शंभरहून अधिक मॉडेल्स आणि हजारो फॅशनप्रेमी पाहुण्यांच्या उपस्थितीत यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकचा शानदार समारोप सोहळा झाला. लॅक्मेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या उपस्थितीत क्लोजिंग शो सादर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही फॅशन जगतात नव्या ट्रेण्ड्स आणि फॅशन डिझाइनर्सची नांदी ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या निमित्ताने झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Story img Loader