एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
अस्फुटशी
अलवारशी
उमलणारेत पाकळ्या
स्वप्नांच्या साखळ्या
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
चंचल
मनचल
कोषातली
गोफातली
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
इवलंसं देठ
वाऱ्याशी भेट
स्पर्शाची थरथर
नावीन्याचा बहर
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
स्वत:त रमणारी
मायेत जगणारी
मारते मध्येच तान
कधी वास्तवाचं भान
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
उमलू द्या पूर्ण तिला
नको वाईटाच्या सावल्या
अवेळी नका खुडू
अजाण आहे लेकरू
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
येऊ दे स्वत्वाची जाण
जाणवू दे स्वातंत्र्याचा प्राण
वेलीशी पुन्हा जुळो नाळ
बहराची प्रसन्न सकाळ
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
आणखी वाचा