कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट.
पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता थोडंसं खाण्याच्या किंवा खिलवण्याच्या विविध पद्धतींकडे बघावं लागेल. बुफे ही पद्धत आता आपल्याकडेही बरीच रुळली आहे. पण या बुफेमध्येही अनेक प्रकार आहेत. कुठल्या पद्धतीत कसे जेवण असावे याचे एटिकेट..
गेले काही आठवडे आपण पाश्चात्त्य जेवणाच्या फाइन डाइनमधले कोर्सेस पाहिले. जेवणाच्या बुफे पद्धतीबद्दल आणि त्यातील एटिकेटबद्दल थोडंसं.. टेबलवर सíव्हस न देता प्रत्येकाने आपले जेवण स्वत वाढून घ्यावे, या विचाराने जेवण बुफे स्टाइलने सव्र्ह केलं जातं. त्यामुळे बुफे हे जेवण आणि जेवणाची सíव्हस स्टाइल दोन्ही असतं.
बुफे अगदी टेस्टफुल, सुबक पद्धतीने मांडला जातो. त्यासाठी काही खास सíव्हसचं सामनही लागतं. त्याची सेंटरपीस आणि इतर प्रॉप्सने त्याची शोभा अधिक वाढते. या बुफेमध्ये अनेक प्रकारचे आणि अनेक पद्धतींचे पदार्थ असू शकतात. जेवण सेल्फ-सíव्हस असू शकतं किंवा काही पदार्थ टेबलावर सव्र्ह केले जातात. बुफेच्या दोन पद्धती आहेत
स्टॅण्ड-अप बुफे :
’ हा फिंगर किंवा फोर्क बुफे असू शकतो.
’ जागा, मनुष्यबळ आणि सामानाची कमी असली, की पद्धत सुटसुटीत ठरते. कमी जागेत अधिक लोकांचा पाहुणचार व्यवस्थित करता येतो. थोडं इनफॉर्मल वातावरण तयार होतं.
’ आपल्या लग्नांमध्ये हा प्रकार खूप पॉप्युलर झाला आहे. खूप लोक असल्यास प्रती प्लेट किंमत मोजली जाते. अशा वेळी एकच प्लेट सर्व पदार्थ खायला वापरावी.
सीट-डाउन बुफे :
’ सहसा टेबलवर कटलरी सेट केली जाते. सूप आणि ब्रेड/ रोटीची सíव्हस टेबलवर होते. टेबल सेट-अप असल्याने जेवणाऱ्यांची संख्या मर्यादित राहते. वातावरण थोडं फॉर्मल होऊ शकतं.
’ रेस्तराँमध्ये अशा बुफेला टेबल सीटींग दिल्याने बििलगसाठी जेवणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे या पद्धतीत जेवणाचे विविध प्रकार खाताना उष्टी प्लेट बदलून नवीन प्लेट घेता येते.
याखेरीज जेवणामध्ये कोणते पदार्थ आहेत, कुठल्या स्टाइलचे आहेत तसंच कुठल्या वेळी, कुठल्या प्रसंगी बुफे लावण्यात येणार आहे या नुसारही बुफेचे काही प्रकार करण्यात आले आहेत. या प्रकारांविषयी पुढच्या भागांत सविस्तर बोलूच. बुफे जेवण पद्धतीत आपलं आपण जेवण वाढून घेतानाही काही एटिकेट पाळणं आवश्यक असतं. त्याविषयीदेखील बुफेच्या दुसऱ्या भागात बोलू या.
-गौरी खेर