कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट.पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता थोडंसं खाण्याच्या किंवा खिलवण्याच्या विविध पद्धतींकडे बघावं लागेल. बुफे ही पद्धत आता आपल्याकडेही बरीच रुळली आहे. पण या बुफेमध्येही अनेक प्रकार आहेत. कुठल्या पद्धतीत कसे जेवण असावे याचे एटिकेट..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टेबलवर सíव्हस न देता प्रत्येकाने आपले जेवण स्वत वाढून घ्यावे, या विचाराने जेवण बुफे स्टाइलने सव्र्ह केलं जातं. त्यामुळे बुफे हे जेवण आणि जेवणाची सíव्हस स्टाइल दोन्ही असतं. या बुफे सव्र्हिसचे स्टॅण्ड-अप बुफे आणि सीट-डाउन बुफे हे दोन प्रकार आपण मागच्या लेखात पाहिले. या शिवाय बुफेमध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ आहेत आणि बाकी व्यवस्था कशी आहे यावरून काही प्रकार पडतात.
बुफेचे इतर प्रकार :
फोर्क बुफे – एका हातात प्लेट आणि दुसऱ्या हातात फोर्क धरून जेवलं जात. अर्थात मांसाहारी प्रकार बोनलेस असले पाहिजेत. भाज्यांचे कट्सपण फक्त काट्याने खाता येतील असे असतात. जेवण सहसा पाश्चात्य पद्धतीच असत कारण भारतीय पद्धतीच्या जेवणातली रोटी/पोळी फोर्क बुफेमध्ये खाण म्हणजे कसरतच!
फिगर बुफे : अगदी इनफॉर्मल पद्धतीत सव्र्ह केलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. पदार्थ कोरडे, हात खराब न होता खाल्ले जातील असे असतात. उदाहरणार्थ कॉकटेल सामोसा, सँडविच, चिकन तंगडी, मिनी पिझ्झा इत्यादी. हात पुसायला पेपर नॅपकिन्स दिले जातात.
बुफे ब्रेकफस्ट : मोस्ट फेवर्ड बाय बिझनेसमन! हल्ली जवळ-जवळ सर्व बजेट हॉटेल्समध्ये कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट मिळतो आणि त्यात भरपूर व्हरायटी पण असते. म्हणजे – फ्रूट ज्यूस, कापलेली फळं, सिरिअल्स आणि दूध, एखादा भारतीय पदार्थ, ब्रेकफास्टच्या ब्रेडचे असंख्य प्रकार आणि त्याबरोबर खायला बटर, जॅम, मध इत्यादी. शिवाय अंड्याचे प्रकार आपल्या आवडीचे ऑर्डर करू शकतो. ब्रेकफास्टचा शेवट करायला एखादा गोड पदार्थही असतो. चहा, कॉफी, दूध तर गृहीतच धरलं जातं!
सॅलड बुफे : यात फक्त सूप, सॅलड आणि ब्रेड असतं. काही वेळा एखादा गोड पदार्थ! सॅलड करायला लागणाऱ्या भाज्या, फळं आणि इतर सामग्री बुफेवर ठेवली जाते. आपल्याला पाहिजे त्या भाज्या, फळं मिक्स करून आपण आपल्या आवडीचं सॅलड बनवू शकतो.
थीम बुफे : एखादी थीम घेऊन केलेला बुफे. उदाहरणार्थ १५ ऑगस्टला अनेक ठिकाणी बुफेचं डेकोरेशन नारंगी, सफेद आणि हिरव्या रंगाचं तर असतं, पण काही पदार्थही या तीन रंगांचे केले जातात. म्युझिक थीम, दिवाळी थीम आणि बर्थ डेला कार्टून थीम अशा अनेक थीम्स असू शकतात. एका उत्साही आईने, तिच्या मुलाचं नाव ‘ङ’ पासून सुरु होत असल्याने, त्याच्या वाढदिवसाला ‘ङ’ थीम ठेवली आणि बुफेवर सगळे ‘ङ’ पासून सुरु होणारे पदार्थ ठेवले – ‘काबुली चना’ (छोले), खमण ढोकला, किडनी बीन्स (राजमा), कचोरी, काला जामून, काला खट्टा इत्यादी. यानंतर पटलं की, आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टींचा थीम बुफे करू शकतो !
बुफे एटिकेट
* रांगेत उभं राहावं!
*कुणाचे पाहुणे असताना, डिशमध्ये पदार्थ कमी असल्यास, रिफिलसाठी वेटरला नम्र विनंती करावी.
* करीमधले फक्त उत्तम तुकडे काढू नयेत. इतरांसाठीपण ठेवावे
* पदार्थावरील गाíनशचे काजू/ बदाम किंवा बेक्ड डिश वरचं फक्त ग्रिल्ड चीज वरून काढू नये.
* पाहिजे तेवढंच अन्न घ्यावं. नवीन पदार्थ आधी थोडा घेऊन आवडल्यास दुसऱ्यांदा घ्यावा.
* लग्नाच्या जेवणात भाताचा मेरू पर्वत करू नये आणि त्याखाली त्रिवेणी संगम तर नकोच नको. वाटी न घेतल्याने/ दिल्याने पिवळी डाळ/कढी, हिरवं पालक पनीर आणि लाल मखनी ग्रेवीचा त्रिवेणी संगम अनेकांच्या प्लेटमध्ये दिसतो!
गौरी खेर