शब्दांकन : राधिका कुंटे viva@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेली दोन वर्षे आपण सगळे कोविड-१९च्या तडाख्यात सापडलो आहोत. पुनश्च हरिओम म्हणत आपण जगायला सुरुवात केली खरी पण करोनाच्या लाटांचे येणे-जाणे अद्याप सुरूच आहे. तरीही न डगमगता त्या लाटांतून वाट काढत आपल्या करिअरची नाव परदेशी वल्हवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उमटलेल्या या ‘जग’नोंदी.
ठाम आत्मविश्वास, विचारपूर्वक निर्णय घेणं आणि सकारात्मक मनोबलामुळे आज मी इंग्लंडमध्ये शिकतो आहे. म्हटलं तर ही आहे अगदी अलीकडची गोष्टङ्घ पुण्याच्या ‘पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मधून मार्च २०२० मध्ये बीई (ईएनटीसी) झालो. दुसऱ्या-तिसऱ्या वर्षांला असताना पुढे आणखीन शिकायला हवं असा विचार डोक्यात होता; पण त्यादृष्टीने फारशी काही तयारी केली नाही. त्याच दरम्यान भारतात कोविड १९ चं संकट गडद झालं आणि लॉकडाऊन लागला. दरम्यान, मी ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ‘फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये नोकरी केली. या काळात नोकरीच करायची की पुढे शिक्षण घ्यायचं या दुविधेत होतो. मनात परदेशी शिक्षणाचा विचार करू लागलो आणि त्यासाठीची माहिती स्वत:च शोधू लागलो. परदेशी शिकायला जायचं झाल्यास आयईएलटीएस, जीआरईसारख्या परीक्षा द्यायला लागतात. युरोपमध्ये जायचं ठरवल्यावर प्रामुख्याने जर्मनी आणि युनाईटेड किंगडम या दोन्ही देशांमधल्या विद्यापीठांची माहिती काढू लागलो. जर्मनीत जायचं झालं तर जर्मन भाषा शिकावीच लागेल हे कळलं आणि मी जर्मनची पहिली लेव्हल शिकलोही. परदेशात जायचं तर अनेक गोष्टी खूप बारकाईने बघाव्या लागतात. त्यातही स्वत:च्या क्षमतांचा कस कसा लागेल हे पाहायचं ठरवलं. मग युनाईटेड किंगडम आणि जर्मनीमधील विद्यापीठांत अर्ज करायचे असं ठरवलं.
विद्यापीठाची निवड आणि आनुषंगिक प्रक्रिया साधारण सहा महिने चालू होती. यादरम्यान मी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. बरंच काही शिकलोदेखील. त्यात विद्यापीठात अर्ज करण्यापासून ते कुठं शिकायचं हा निर्णय स्वत:चा स्वत: घेण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता. शिवाय विद्यापीठाची रँक, अभ्यासक्रम कुठला निवडायचा, त्या विषयाची आपली आवड-निवड, त्यातल्या पुढच्या संधी आणि आनुषंगिक गोष्टीही समाविष्ट होत्या. जर्मनीतल्या अभ्यासक्रमांची माहिती मिळवण्यासाठी ‘Uni- Assistl या पोर्टलची मला खूप मदत झाली. दरम्यान, जर्मनीमध्ये जवळपास पंधरा विद्यापीठांसाठी अर्ज केला होता त्यापैकी दोन ठिकाणाहून होकार आला. यूकेमध्येही जवळपास १५ ते २० ठिकाणी अर्ज केला होता. त्यापैकी जवळपास बारा ठिकाणांहून होकार आला. मग मी यूकेतील कोलचेस्टरमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स’ येथे ‘एमएस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अॅण्ड इट्स अॅप्लिकेशन्स’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा ठरवलं. हा अभ्यासक्रम वर्षभराचा असून मी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि मला ती मिळाली. त्यामुळे माझ्या टय़ुशन फीचा खर्च कमी झाला. इथल्या राहणीमानाचा खर्च कसा कमी होईल याचाही विचार केला.
परदेशी शिकणं असो किंवा अन्य कोणताही निर्णय, मला आई-बाबांचा कायमच पाठिंबा मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये आपल्याकडे कोविड १९ चं संकट आलं, तेव्हा त्याच्या विषयी नीट कल्पना नसल्यामुळे परदेशी शिकायला जाण्यात धोका आहे की काय, किंवा परदेशी कसं काय जाता येईल असं मला एकदा वाटलं होतं. पण माझा निश्चय पक्का होता. त्यामुळे आज नाही, उद्या नाही, तर परवा, मी जाणारच, हे ठरवलंच होतं. ठरून ते प्रत्यक्षात आल्यावर अनेकांनी मला ‘हे तू कसं काय जमवलंस?’, असं विचारलं. त्यांना एकच उत्तर दिलं की, ‘तुम्ही एकदा ठरवलंत, तुमची इच्छाशक्ती तगडी असली की सगळय़ा गोष्टी साध्य होतात. गोष्टी सकारात्मक घडतात’. दरम्यान, इंग्लंडमधल्या विद्यापीठांमध्ये जानेवारीतच प्रवेश सुरू झाले होते. जानेवारीमध्ये प्रवेश घेतला असता तरी घराबाहेर न पडता ऑनलाइनच शिकायचं होतं, असं काही विद्यापीठांमध्ये तेव्हाचं धोरण होतं. तेव्हाचं ते चित्र पाहून पुढे कसं काय होईलङ्घ असं मला वाटलं होतं एका क्षणी. मग ठामपणे ठरवलं आणि सप्टेंबर २१ मधल्या बॅचमध्ये प्रवेश घेतला.
दोन्ही देशांची कोविड १९ च्या बाबतीतली धोरणं थोडी वेगळी असल्याने काही गोष्टींचा उलगडा व्हायला वेळ लागला, तर कधी लगेच उलगडा झाला. उदाहरणार्थ- लशीची गोष्ट. कोव्हिशील्डला मान्यता मिळायला त्या काळात वेळ लागला होता. नंतर एकदाची कोव्हिशील्डला मान्यता मिळाली. त्यामुळे परदेशी शिक्षणाला जाण्यासंदर्भातली कागदपत्रं दाखवल्याने मला प्राधान्याने लस मिळाली. इंग्लंडला जाताना टीबीची (क्षयरोग) तपासणी करावी लागते. ती मुख्यत्वे मुंबईत लीलावती, सीडीसी आणि पुण्यामध्ये रुबी हॉल या रुग्णालयांमध्ये करता येते. परदेशात जायच्या आधी ४८ तास करोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करावी लागते. ती पॉझिटिव्ह आली तर तीन महिने घरूनच अभ्यासक्रमात सहभागी व्हावं लागतं, असं तेव्हा काही विद्यापीठांमधलं धोरण होता. ऑगस्ट २१ मध्ये करोना रुग्णसंख्येच्या संदर्भात भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये होता. तेव्हा जायचे ठरले असते तर हॉटेलमध्ये विलगीकरण करावं लागणार होतं. त्याच्या शुल्कापैकी काही रक्कम विद्यापीठातर्फे दिली जाईल, असं काही विद्यापीठांनी सांगितलं होतं. त्याशिवाय व्हिसा वगैरे कामांसाठी प्रत्यक्षच जावं लागतं आणि तिथेही कटाक्षाने स्वत:ची काळजी घ्यावी लागते.
इथे पोहोचल्यावर विलगीकरणाच्या ठरावीक कालावधीत दुसऱ्या आणि आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करावी लागली. विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचा काळ इथल्या हवामानात आणि जीवनमानात स्थिरावण्यात गेला. आम्हाला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अभ्यासासाठी जाता येतं. जी व्याख्यानं ऑनलाइन होऊ शकतात ती तशी होतात. इतर व्याख्यानं आणि लॅबवर्कसाठी इथल्या नियमानुसार उपस्थिती असते. कुणाला करोना झाल्यास तेव्हा होणाऱ्या व्याख्यानांचे व्हिडिओ नंतरही बघता येऊ शकतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठातर्फे अनेक उपाययोजना आवर्जून केल्या जातात. देशांनुसार विद्यापीठांमधले करोनासंदर्भातले नियम सतत बदलत आहेत.
आठवडाभरामध्ये तीन-चार दिवस व्याख्यानं आणि वीकेंडला सुट्टी असं साधारण वेळापत्रक असतं. मी सकाळी लवकर उठून जॉगिंग आणि व्यायाम आलटून पालटून करतो. विद्यापीठात चालतच जातो. कधी प्रोजेक्ट किंवा असाइन्मेंट असतील तर मित्रांसोबत उशिरापर्यंत विद्यापीठात अभ्यास करतो. सकाळीच एकदा नाश्ता, जेवण वगैरे करून ठेवतो. इथे विद्यार्थ्यांना काही ठरावीक तास वीकेंडला अर्ध वेळ काम करण्याची मुभा आहे. त्यानुसार लंडनमधल्या एका मोठय़ा सँडविच फॅक्टरीमध्ये काम करत होतो. या स्वकष्टाच्या कमाईमुळे भटकंतीची आवड इथेही जोपासता आली. कधीकधी फावल्या वेळात मी अर्कचित्रही काढतो. इथे स्वयंअध्ययन करणं अपेक्षित आहे. ते चांगल्या रीतीनं करताही येतं, कारण सुंदर आणि अत्यंत व्यावसायिक पद्धतीने शिकवलं जातं. इथं जगात वावरायचा आत्मविश्वास मिळतो. अभ्यासाखेरीज इतर अॅक्टिव्हिटीजमध्येही सहभागी होता येतं. आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारांत सहभागी होता येतं. पेपर प्रेझेंटेशन, सेमिनार्स यांसह अनेक ऑनलाइन कोर्सेस करता येतात. बीई इंजिनीअिरगला मी ऑप्शनल विषय म्हणून मशीन लर्निग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे विषय घेतले होते, त्यामुळे हा अभ्यासक्रम शिकता आला. शिवाय ऑफलाइन आणि नंतर काही ऑनलाइन कोर्सेस केले होते त्यांचाही नक्कीच फायदा झाला.
या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निग, डीप लर्निग, न्युरल नेटवर्क, कॉम्प्युटेशनल मॉडेल्स इन इकॉनॉमिक अँण्ड फायनान्स, बिग डेटा फॉर कॉम्प्युटेशनल फायनान्स आदींचा समावेश आहे. हे शिकताना काही नवीन गोष्टी कळल्या आणि माझा दृष्टिकोनही बदलला. कुठलीही गोष्ट शिकणं, त्यातून ज्ञान मिळवणं, ते वाढवून त्याचं योग्य उपयोजन करणं, हा म्हटलं तर प्रत्येकाचा स्वत:चा लढा आहे आणि तो ज्याचा त्यानं लढायला हवा. प्रत्येकाच्या ध्येयाचा टप्पा, त्यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीची आस, भोवतालची परिस्थिती अशा अनेक गोष्टी आपलं ध्येय साध्य होण्यासाठी पूरक ठरतात. मी नकारात्मक गोष्टींचा विचार करत नाही. माझ्याबाबतीत सुदैवाने सगळय़ा गोष्टी चांगल्याच घडत आहेत. पण चुकून कधी काही नकारात्मक घडलंच तरीही त्यातून मी चांगलीच गोष्ट बघेन किंवा पुढे चांगलं घडणार आहे, असं म्हणेन. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवणं आणि आपण योजलेल्या ध्येयाच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करणं, हे माझं सध्याचं लक्ष्य आहे. इकडे आल्यावर सगळय़ांपुढे असतात तसे माझ्यापुढेही नोकरी किंवा पीएचडी हे दोन पर्याय आहेत. परवाच मी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं अर्कचित्र काढून त्यांचं एक वाक्य लिहिलं होतं – ‘यकीन को हमेशा वक्त के पिछे चलना चाहिए, आगे नही..’
कानमंत्र
* घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि काहीही झालं तरीही आपल्याला यश नक्की मिळेल असा आत्मविश्वास ठेवा.
* आपल्या चांगल्या क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार आपलं ध्येय ठरवून त्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने ठामपणे वाटचाल करत राहा.