दोन्ही बाजूंनी ते कॅज्युअलीच घेतलं जातं ते कॅज्युअल फ्लर्टिग. ते करताना ‘फ्लर्टिग सेहत के लिये अच्छा है’, असंही ऐकवलं जातं.
व्हॉट्सअ‍ॅपवरचा एक प्रेमळ संवाद :
ती : अरे, कुठे आहेस तू? कधीचा तुला फोन ट्राय करतीये मी? उचल ना.
तो : अगं मित्राच्या लग्नात आहे मी. नंतर निवांत बोलूयात.
ती : लग्नात..अहं, मग तुझी विकेट घेतली की नाही अजून कोणी?
तो : नाही ना अगं! मस्तपकी शेरवानी वगरे घालून आलोय, पण काहीच प्रोग्रेस नाही.
ती : शेरवानी..!! ओहो आय मिस्ड इट!
तो : काय??
ती : तुला पाहायचा चान्स रे ! कसला रापचिक दिसत असशील नाही शेरवानीत!
हल्ली सोशल नेटवर्किंग साइट्सवरून किंवा ऑनलाईन चॅटवरून, मोबाईलवरून एकमेकांशी संवाद साधताना ही अशी वाक्ये सतत ऐकू येतात. व्हॉट्सअ‍ॅपवर तर असे ‘प्रेमळ’ संवाद सर्रास चालू असतात. पूर्वी अशा गोष्टी ‘फ्लìटग’ म्हणून ओळखल्या जायच्या. आताही याला फ्लर्टिंगच म्हणतात पण सध्या ते फार ‘कॅज्युअली’ घेतलं जातं.. दोन्ही बाजूंनी.
फ्लìटग म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अगदी चिडवाचिडवीपासून ते छेडछाडीपर्यंतची प्रकरणं उभी राहिली असतील, परंतु हे फ्लìटग शारीरिक किंवा रिअल नसून ‘व्हर्चुअल लेव्हल’वरचं आहे. पूर्वी लपूनछपून होणाऱ्या या गोष्टी आता उघडपणे होऊ लागल्या आहेत. हे मान्य करणारी पिढीही आलीय. कारण या सगळ्या गोष्टी आई-बाबांसमोर किंवा सोबत शेअर करणारे नग काही फार विरळ राहिलेले नाहीत!
कॅज्युअल फ्लर्टिग हे आता फार मनावर घ्यायची गरज नसते, हे तर सगळ्यांनाच मान्य असावं असं वाटतंय. मित्र-मत्रिणींकडून ‘फ्लìटग टिप्स’ही घेतल्या जातात आणि प्लॅन वर्कआऊट झाल्यानंतर एखादा अवघड किल्ला सर केल्यासारखा विजयोन्माद साजरा करत ट्रीटही घेतली जाते. एखादा मुलगा किंवा मुलगी रिलेशनशिपमध्ये असो-नसो. समोरच्याला इम्प्रेस करायला त्यांना फ्लìटग महत्त्वाचं वाटतं आणि मग समोरच्याने रिस्पॉन्स दिला की, खुलेआम फ्लर्ट सुरू होतं.
मुलगा आणि मुलगी मुळात जेव्हा एकमेकांचे छान मित्र असतात व फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवर सतत कनेक्ट राहिल्याने गप्पांच्या ओघात जेव्हा एकमेकांना अजून जाणून घेऊ इच्छितात तेव्हा खरं तर फ्लर्टिग सुरू होतं. जोवर हे व्हर्चुअल लेव्हलवर असतं तोवर यात काहीच गर वाटत नाही. ‘सिंगल’ असणाऱ्या लोकांना तर प्रेम आणि रिलेशनशिपच्या कटकटीपेक्षा फ्लìटगच जवळचं वाटतं.. त्याची अनेक कारणंही आहेत.
फ्लìटगचा मुख्य फायदा किंवा प्रिव्हिलेज असा की, दोन व्यक्ती एकमेकांचं कौतुकच करतात किंवा एकमेकांच्या चांगल्याच गोष्टी हायलाइट होतात. त्यामुळे संपूर्ण संवाद हा सकारात्मक होतो. शारीरिक आकर्षणापोटी किंवा मग समोरच्या व्यक्तीच्या अजून जवळ जाण्यासाठी, कधी टाइमपास म्हणून, तर कधी चक्क ताण हलका करण्यासाठी फ्लìटग केलं जातं. दिवसभर कामाच्या व्यापामुळे चिडचिड झाली असेल आणि त्यात जर मत्रिणीचा गोड मेसेज आला तर वातावरण कसं झटक्यात बदलतं..!!
मित्र-मत्रिणी किंवा ओळख असणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा हे अतिप्रेमळ संवाद होतात तोवर सगळं ठीक आहे, परंतु एखादी व्यक्ती निव्वळ फ्लìटगसाठी आपल्याजवळ येत असेल, तर आपण वेळीच शहाणं होणं गरजेचं आहे आणि रिलेशनशिपमध्ये असणारी व्यक्ती केवळ आपल्या जोडीदाराला जळवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीसोबत फ्लर्ट करत असेल तर मात्र तुमच्या रिलेशनशिपला धोका आहे बरं का..!!
बाकी डोळ्यावर येण्याइतपत फ्लìटग आपल्या आजूबाजूला दिसत नसलं, तरी ‘फ्लìटग मेरे सेहत के लिए अच्छा है’ असं म्हणणारे रणबीर कपूर मात्र आपल्याला प्रत्येक कॉलेज गॅंग्ज मध्ये सापडतील..!!
छाया : ऋषिकेश पवार    /   फोटो  प्रातिनिधिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा