सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
जाता जात नाहीत असे काही फॅशन ट्रेण्ड्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘टॉर्न्ड् डेनिम्स’. काही महिन्यांसाठी हा ट्रेण्ड आपल्याला दिसतो, मग तो मध्येच गुडूप होतो आणि परत येतोच. लपाछपी खेळणारा हा ट्रेण्ड परत आला आहे. आजच्या सेलिब्रिटी फॅशन गॅलरीमध्ये त्याचीच एक झलक.
अनुष्का शर्मा
अनुष्काचा लुक काहीसा फसल्याचे दिसून येते. आता तो नेमका कशामुळे ते तुम्हीच शोधा. कारण तिचे विस्कटलेले केस, अति-टॉण्र्ड डेनिम आणि मॅच न झालेले शूज ही त्यामागची काही संभाव्य कारणं असू शकतात. त्यामुळे ती एकूण थकलेली दिसते आहे. लुकमध्ये फ्रेशनेस नाही. खरं तर तिच्या पिवळ्या शर्टची निवड उत्तम आहे. पण तो शर्ट तिचा ओव्हरऑल लुक सावरू शकलेला नाही.
सागरिका घाटगे
सागरिकाने तिच्या फिटेड टॉण्र्ड डेनिमसोबत ग्रे टी-शर्ट आणि ब्लेझर कॅरी केले आहे. सकाळच्या ब्रंच मीटिंगसाठी हा लुक अगदी उत्तम आहे. तिने पेन्सिल हिल्स आणि चंकी बँगल्सनी हा लुक पूर्ण केला आहे. सोबत पोनिटेल तिला ‘नीट अॅण्ड क्लीन’ लुक देतोय.
सेलेब्रिटीज फॅशन गॅलरी
सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
First published on: 13-02-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrities fashion gallery