सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
यंदा ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर यांच्यासोबत कतरिना कैफही ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला रेड कार्पेटवर पदार्पण करणार आहे. ‘लॉरिअल्स’ची सदिच्छादूत म्हणून ती कानला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कतरिना आणि सोनमने या संदर्भात घोषणा केली आणि ‘लॉरिअल्स’च्या मॅट आणि ग्लॉसी लिपकलर्सचे अनावरणही केले.
या कार्यक्रमासाठी सोनमने सफेद ऑफ-शोल्डर गाऊन निवडला होता. खालच्या बाजूस बलून शेप असलेल्या या स्टाइलचा गाऊन म्हणजे सोनमची ओळख बनली आहे. त्यामुळे तिचा लुक नेहमीचाच वाटत होता. पण बेबी पिंक रंगाच्या स्ट्रेट फिट एम्ब्रॉयडरी गाऊनमध्ये कतरिनाने मात्र सर्वाच्या नजरा आपल्याकडे वळविल्या. त्यातही तिने केसांना दिलेले बर्गेडी हायलाईट्स लक्ष वेधून घेत होते.
सेलेब्रिटी फॅशन गॅलरी
सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
First published on: 01-05-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity fashion gallery