सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
या कार्यक्रमासाठी सोनमने सफेद ऑफ-शोल्डर गाऊन निवडला होता. खालच्या बाजूस बलून शेप असलेल्या या स्टाइलचा गाऊन म्हणजे सोनमची ओळख बनली आहे. त्यामुळे तिचा लुक नेहमीचाच वाटत होता. पण बेबी पिंक रंगाच्या स्ट्रेट फिट एम्ब्रॉयडरी गाऊनमध्ये कतरिनाने मात्र सर्वाच्या नजरा आपल्याकडे वळविल्या. त्यातही तिने केसांना दिलेले बर्गेडी हायलाईट्स लक्ष वेधून घेत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा