पेटिट बॉडी टाईप असलेल्यांना गाऊन घालताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेषत: अशाप्रकारच्या कॉलम गाऊनमध्ये त्या अधिकच बारिक दिसू शकतात. पण रिचाने अबोली रंगाचा हा गाऊन अतिशय सुंदररित्या कॅरी केला आहे. चेक्स एम्ब्रॉयडरी असलेला हा गाऊन तिच्यावर फारच सुंदर दिसत आहे. त्यासोबवतच तिने गोल्डन रंगाची कल्च, गोल्डन हिल्स आणि लॉन्ग इअररिंग्स अशी मिनिमल अॅक्सेसरी कॅरी करत, लूकला पुर्ण न्याय दिला आहे.
‘एलिगन्स कॅन किल यु’ या उक्तीला सोफिया पुर्णपणे न्याय देऊ शकते, हे तिच्याकडे पाहून पटते. वन शोल्डर्ड व्हाईट गाऊनवर साईडला केलेली रेड फ्लोरल एम्ब्रॉयडरी तिचे कव्र्हस हायलाईट करण्यास मदत करत आहे. रेट्रो स्टाईल हेअरस्टाईल सुद्धा तितकीच मोहक आहे.
आदितीचा ब्लॅक गाऊन एक्सपिरिमेंटल रेड कार्पेट लूकचे एक उत्तम उदाहरण म्हणता येऊ शकते. ब्लॅक आणि न्युड कलरचे कटवर्क आणि खाली गोल्ड एम्ब्रॉयडरी या परस्पर भिन्न गोष्टी या गाऊनमध्ये एकमेकांना कॉम्पिमेंट करत आहेत. तसेच यासोबत टाईट बन हेअरस्टाईल तिच्या चेहऱ्यातील बोल्डनेस समोर आणत आहे.
छायाचित्रे : दिलीप कागडा