सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
पांढरा रंग हा फॅशन जगताचा लाडका रंग. एखादी मीटिंग असो किंवा पार्टी पांढरा रंग तुम्हाला कधीच दगा देऊ शकत नाही. त्यामुळे हा रंग फॅशनिस्टांच्या वॉडरोबमध्ये असतोच. आज आपल्या गॅलरीतील दोन्ही फॅशनिस्टांनी हा पांढरा रंग दोन वेगवेगळ्या पद्धतीने कॅरी केला आहे.
भूमी पेडणेकर
‘दम लगा के हैशा’ चित्रपटाने यशराजची नायिका म्हणून नावारूपास आलेल्या भूमीने या पांढऱ्या रंगाला क्रिस्प लुक देणे पसंत केले आहे. मिड कट असलेला लांब टय़ुनिक आणि काळी पँट ही निवड उत्तमच आहे. पण तिची हेअरस्टाइल काहीशी चुकली आहे. डार्क लिप मेकअपसोबत केसांचा छान बन केला असता, तर तिचा लुक अजूनच उठून दिसला असता.
आदिती राव हैदरी
आदितीने फॅशनची सावध खेळी खेळली आहे. स्ट्रॅपलेस पांढऱ्या ड्रेसमध्ये ती एखादी राजकन्याच वाटते आहे. सोबत लालचुटूक लिप्स आणि काळ्या हिल्स असल्यास तक्रारीला जागाच उरत नाही. तिचे स्ट्रेट केस तिच्या लुकला साजेसे दिसत आहेत.