सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. या सगळ्यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
फॅशन म्हटलं की, नेहमीच नायिका, तरुणी यांच्याच चर्चा होणार?
ही परंपरा मोडून काढत या वेळी आपण बॉलीवूडच्या दोन हॅण्डसम डूडबद्दल बोलणार आहोत.
vn01‘रंगरसियाँ’- रणदीप हुडा हा स्टाईलच्या बाबतीत ‘ब्लॅक हॉर्स’ आहे, असं म्हटलं जातं. त्याचा लुक चुकलाय, असं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही. व्हाईट शर्ट, ग्रे ट्राऊझर, सोबत अबोली रंगाचे जॅकेट आणि ब्राऊन बेल्ट. ‘ऑफ ब्रेक रेड कार्पेट ड्रेसिंग’ म्हणजे काय, ते याच्याकडून शिकावं. त्यात त्याचे विस्कटलेले केस म्हणजे, तर बास! चर्चाच नको. मुलींना वेडं करण्यासाठी आणखी काय हवं?

vn02शाहिद कपूरला चॉकलेट हिरो म्हणायचं की डॅशिंग मॅन हा निर्णय तुमचा. पण ‘मॅन इन ब्लॅक’ असा त्याचा लुक सॉलिड आहे, हे नक्की. ड्रेसिंग करताना एकाच रंगाचा ओव्हरडोस करू नये, असं तज्ज्ञ म्हणतात. तो नियम या पठ्ठय़ाने इथे मोडून काढलाय. त्यात त्याच्या डोळ्यातले निरागस भाव, प्रमाणात वाढवलेली दाढी आणि हेअरस्टाईल कडकच! ‘स्माइल इज बेस्ट अ‍ॅक्सेसरी यू कॅन वेअर’ असं म्हणतात, ते काही चुकीचं नाही, हे शाहिदला पाहून कोणीही म्हणेल.