सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. यावर एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
हुमा कुरेशी
‘ब्लॅक रंगात आपण बारीक दिसतो’ हा सिद्धांत प्रत्येक वेळी यशस्वी ठरतोच असे नाही, हे हा हुमा कुरेशीचा ड्रेस पाहून लक्षात येतं. सध्या हुमा कुरेशीचा ‘बदलापूर’ चित्रपट गाजत असल्यामुळे ती चर्चेत आहे. तिच्या अभिनयाबद्दल ती कौतुकाची पावती मिळविते. पण फॅशनच्या बाबतीत काहीशी मागे असते. फिटेड पेप्लम ड्रेस तिच्या शरीरयष्टीला अजिबात सूट होत नाहीये. त्यात तिने घातलेला टाय कुठेच जुळून येत नाही.
मलाइका अरोरा-खान
मलाइका अरोरा खानची फिटेड साडी तिच्या बॉडी फिचर्सना नक्कीच ठळक करत आहे. मलाइका बॉलीवूडमधील उत्कृष्ट फिगर मेंटेन केलेल्या काही मोजक्या ‘मॉम्स’मध्ये एक आहे आणि तिचा लुकही नेहमी तसाच असतो. सोबतचा कुंदनचा नेकपीस नक्कीच साजेसा आहे. तिनं लावलेलं पिंक नेलपेंट एकूण लुकला एक फ्रेशनेस देतंय.