viva261सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या  व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळा वाढल्याची जाणीव आपल्या सेलेब्रिटीजच्या बदललेल्या स्टाइलवरूनही व्हायला लागली आहे आता. एरवी ‘एसी’तून प्रवास करणाऱ्या या सेलेब्रिटीजना उन्हाळ्याचा तितकासा त्रास जाणवत नसला, तरी यानिमित्ताने बाजारात येणारे लूझ, इझी फिटिंग कपडे घालण्याचा  मोह मात्र त्यांनाही आवरता येत नाही. आज अशाच दोन ‘समर कूल’    फॅशनिस्टांच्या स्टाइलबद्दल..     
( छाया : दिलीप कागडा)

कंगना रनौट  स्पोर्टी लुकआणि ब्राइट कलर्स म्हणजे उन्हाळ्यासाठी परफेक्ट स्टाइल. त्यात कंगना नेहमीच तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. त्यामुळे याबाबतीत ती चुकणे शक्यच नाही. त्यातही नेव्ही आणि ग्रीन रंगाचा लूझ वनपीस आणि सोबत ब्राऊन-यल्लो रंगाचा बस्टियर हा ड्रेस मस्त जमून आला आहे. सोबतचे व्हाइट स्निकर्स स्पोर्टी लुक देतात आणि कंगनाचे कर्ली हेअर तिचा हा लुक पूर्ण करत आहेत.

नेहा धुपिया खादी फॅब्रिक सध्या ट्रेंडमध्ये आहे. लूझ गारमेंट्स सर्वानाच कॅरी करता येत नाहीत. त्यातही बिस्किट-ग्रे रंगाचा वन-पीस ड्रेस आणि त्यावर जॉमेट्रिक प्रिंट्स घालायला धाडस लागतंच. नेहाने हे आव्हान लीलया पेललं आहे. टाइट बन आणि न्यूड शेडच्या सिलेटोज, क्लचने तिने नेहमीच्या रेड कार्पेट ड्रेसिंगला एक वेगळाच पर्याय दिला आहे.