vn17
vn10सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला
एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
‘फॉर्मल लुक’मध्ये वैविध्य आणणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. पण आपल्या सेलेब्रिटीजच्या ड्रेसिंगमधून कित्येकदा याबाबत क्लू मिळतात. आजच्या या दोन सेलेब्रिटी अशा काही फॉर्मल ड्रेसिंग टिप्स देताहेत.

अनुष्का ग्रे शर्ट विथ ब्लॅक प्लॅकेट आणि ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट प्रिंटेड स्कर्ट.. अनुष्काचा हा लुक म्हणजे फॉर्मल ड्रेसिंगचं उत्तम उदाहरण आहे. त्यात लूज पोनी टेल आणि स्टेटमेंट इअररिंग्स तिच्या लुकला चारचाँद लावताहेत. ब्राईट रेड लिपस्टिक लुकला आणखी उठाव देतेय.

काजोल
आई झाल्यावर वजन वाढतं आणि स्टाइलच्या बाबतीत आपण नापास होऊ लागतो असं जर वाटत असेल, तर एकदा काजोलकडे पाहावं. हेवी वेट असूनही स्ट्रेट फिटचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट स्ट्राईप्सचा हा ड्रेस तिच्यावर उत्तम दिसतोय. त्यावर मोकळे केस आणि गळ्यात पेंडंट इतकंच तिचा लुक पूर्ण करायला पुरेसं आहे.

Story img Loader