उन्हाळ्यातली कूल फॅशन म्हणजे सनग्लासेस. सेलेब्रिटींचे गॉगलमधले फोटो बघून यातला ट्रेण्ड फॉलो केला जातो. काय आहे सध्याचा ट्रेण्ड आणि तो कसा फॉलो करायचा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उन्हाळा जसजसा जाणवायला लागलाय तसे नवीन ट्रेण्ड्स बाजारात डोकावायला लागले आहेत. त्यातल्या सनग्लासेसच्या ट्रेण्डकडे हल्ली सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक चित्रपटांमधून आणि इतर माध्यमांमधून सेलेब्रिटींची गॉगलवाली छबी सतत दिसत असते. त्यातूनच वेगवेगळ्या सनग्लासेसचे ट्रेण्ड्स सेट झाले आहेत. उन्हाळी फॅशनमध्ये सनग्लासेस मस्ट. चेहऱ्याला सूट होणारा गॉगल असेल तर व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उठाव मिळतो. क्लासी लुक मिळतो. या सनग्लासेसच्या सध्याच्या चलतीतल्या ट्रेण्ड्सविषयी.

‘पिकू’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ब्रॉड गॉगल्सचा ट्रेण्ड उठून दिसला. मधल्या काही काळात हे असे ब्रॉड गॉगल आउटडेटेड झाले होते. सध्या या मोठय़ा गॉगलखेरीज आणखी एक ट्रेण्ड दिसतोय – राउंड ग्लासेसचा. खरं तर सनग्लास खरेदी करताना लेटेस्ट ट्रेण्डसोबतच आपल्या चेहऱ्याला काय चांगलं दिसेल ते बघणं आवश्यक आहे. कारण, ट्रेण्ड कुठलाही असला, तरी बाजारात बहुतेक सगळ्या आकाराच्या फ्रेम्स मिळतात. ब्रॉड स्क्वेअर ग्लासेस, राऊंड कॅट्स आय ग्लासेस हे ट्रेण्ड अजूनही चलतीत आहे. व्यक्तिमत्त्वाला सूट होणारा गॉगल हवा तसंच कुठल्या प्रसंगी घालायचा आहे. ऑफिस वेअर, फॉर्मल वेअर, कॅज्युअल, आउटिंग या कशावर घालताय त्यानुसार गॉगल कसा असावा हे ठरतं. एकाच शेपचा गॉगल वेगवेगळी भूमिका बजावतो कधी कधी. उदाहरणार्थ कॅट्स आय ग्लासेसचा ट्रेण्ड फंकी आणि क्सासी दोन्ही दिसू शकतो. तो तुम्ही कशा पद्धतीने वापरताय, कुठल्या रंगाच्या काचा घेताय आणि तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर ते अवलंबून आहे. खूप फंकी लुक हवा असेल तर पंचकोनी, षटकोनी आणि अनेक आकार तुम्हाला मिळू शकतील.

१. काही वेळा आपल्याला आवडला म्हणून आपण गॉगल खरेदी करतो , पण कधी कधी तो आपल्या चेहऱ्याला सूट होतोच असं नाही. त्यामुळे शक्यतो सनग्लासेस लावून बघितल्याशिवाय, ट्राय केल्याशिवाय खरेदी करू नयेत.

२. अंडाकृती चेहरेपट्टी असणाऱ्यांनी ब्रॉड, ओव्हर साइज फ्रेम्स वापराव्यात. त्यांना वाइड फ्रेम्स असलेले गॉगल सूट होतात. याउलट राउंड चेहरेपट्टी असणाऱ्यांनी स्क्वेअर शेप, चेहऱ्याला सूट होईल एवढीच राउंड किंवा सेमी राऊंड शेप ग्लासेस वापरायला हरकत नाही.

३. हल्ली बाजारात अनेक स्टाइल्स आणि कलरशेड्सचे सनग्लासेस बघायला मिळतात. आपल्या गरजेनुसार गॉगलची शेड निवडावी. उन्हाळ्यासाठी सनग्लासेसची निवड करताना शक्यतो ब्राउन, ब्लॅक, वाइन अशा डार्क शेड्स निवडाव्यात. हे रंग क्लासी दिसतात आणि कोणत्याही आउटफिटला सूट होतात.

४. ब्लॅक शेड प्रत्येकालाच सूट होते असं नाही. त्यामुळे कधी कधी ब्लाइंड लुक येऊ शकतो. त्यामुळे शेड निवडताना काळजीपूर्वक निवडावी.

५. आपली लाइफ स्टाइल, आपण वापरत असलेले आउटफिट्स या सगळ्याचा विचार करून तुमच्या आवडीनुसार साधे किंवा ब्रॅण्डेड सनग्लासेस खरेदी करू शकता. पण रस्त्यावरून गॉगल खरेदी करताना त्याची शेड, ग्लास तपासून बघितली पाहिजे. वाईट दर्जाच्या गॉगलमुळे दृष्टीला हानी पोचू शकते आणि त्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी फारसा उपयोगही होत नाही.