प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! चॉकलेट कँडीजच्या देशी फ्लेवर्सची चर्चा करताना बालपणीच्या चॉकलेटी क्षणांचा आठव अनिवार्य आहे. त्या छोटय़ा खिशातल्या नॉटी नटीजविषयी थोडंसं..

‘द बॉम्बे शेफ’ या माझ्या यूटय़ूब चॅनेलवर मी होतो. राजश्री फूड्स हे चॅनेल चालवते. तर सर्फिग करताना अचानक स्क्रीनवर एक पॉप आऊट आला, तो ‘जंगल बुक’च्या प्रोमोजचा होता. बरं. जितक्या वेगाने तंत्रज्ञान पुढे चाललं आहे, त्याच्याही कितीतरी वेगाने मनही मागे जाऊ शकतं, याचं ते उत्तम उदाहरण. मी तो जंगल बुकचा नवा आविष्कार पाहून क्षणात नव्वदच्या दशकात फेकला गेलो. ‘जंगल बुक’ या नावाने अनेकांच्या मनात एक जागा ‘बुक’ केली आहे. अर्थात मीही त्याला अपवाद नाही.
नव्वदीच्या दशकातली रविवारची सकाळ.. टीव्हीवर दूरदर्शन सुरू.. त्यावर दिसतोय तो चड्डी पहनके फूल खिला है वाला मोगली.. तो या झाडावरून त्या झाडावर मस्त हुंदडतोय त्याच्या प्राणीमित्रांसोबत.. त्या जंगल बुकाचे ते दर्शन मंत्रमुग्ध होऊन पाहणारा छोटा प्रिन्स (अर्थात छोटा मी) प्रिन्स च्या हातात टीव्हीवरचा हा शो बघताना कायम असायचं ते ‘नटीज’चं पाकिट. आता जंगलबुकची आठवण आली आणि त्या नटीज्सारख्या चॉकलेट कँडीजची चवदेखील मनात घोळत राहिली.
जंगल बुकचा प्रोमो बघितल्यापासून मी तो चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होतो आणि तो झाला तेव्हा मी सरळ थिएटरचा रस्ता धरला आणि तीच ‘नटीज’ची पाकिटं खिशात घेऊन मी सिनेमागृहात घुसलोसुद्धा, अगदी सावधगिरीने. का म्हणून काय विचारताय? सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नाही ना! पण ते जाऊ द्या, हा निरागस गुन्हा त्या जंगलबुक आणि त्याने जागवलेल्या आठवणींसाठी माफ असणार. त्याच वेळी ‘नटीज’सारख्या चॉकलेट कँडीजवरील या लेखाची माझ्या मनात निर्मिती झाली.
‘नटीज’ हा शब्द वाचल्यानंतरच अनेकांच्या मनात एक ओळखीचा नाद घुमू लागतो. मग आठवणींच्या पायवाटेवर मन रेंगाळू लागते. माझ्याही मनाची अवस्था या घडीला तशीच झाली आहे. ‘नटीज’ची निर्मिती ही ‘कॅडबर’ची. हे बहुतेकांना माहीत असायला हरकत नाही. (२०१४ मध्ये या कंपनीचं नामकरण मॉन्डलेझ इंडिया असं करण्यात आलंय.. असो..) ‘नटीज’ हा पॅन्ड चॉकलेट कँडीचा प्रकार आहे. पॅनिंग म्हणजे नट्स किंवा फळांच्या तुकडय़ांना चॉकलेटचा लेप देऊन केलेल्या कँडीज. चॉकलेट पॅनिंग ही कला मूळची प्राचीन इजिप्तमधून आलेली. आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यात बदल करून आधुनिक यंत्रसामुग्री वापरून पॅन्ड चॉकलेट्स बनवली जातात. मोठाल्या गोल फिरत्या पातेल्यात नट्स आणि फळांचे तुकडे टाकले जातात. त्यात चॉकलेट वितळवण्यासाठी उष्णता दिली जाते. चॉकलेटचा थर या सुक्यामेव्यावर दिला जातो. मध्यभागी नट्स आणि बाजूने चॉकलेट असा हा प्रकार. प्रत्येक चॉकलेटच्या आवरणात नट्स गुप्त झाले की, मग चॉकलेट थंड करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. इतकी की थंड हवेचा मारा केल्यानंतर चॉकलेट पुन्हा घट्ट होते आणि गोल तुळतुळीत नटीज तयार होतात. आता या मोठाल्या पातेल्यांची जागा स्वयंचलित मशीन्सनी घेतली आहे. यंत्राच्या साहाय्याने ही पातेली फिरवली जातात. या महाकाय यंत्रांच्या मदतीनेच आजकाल नटीजना आकार दिला जातो.
‘टिफिन्स’ हा एक पॅन्ड चॉकलेट्सचा दुसरा लोकप्रिय ब्रँड. नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर एकवीसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही टिफीन्स चॉकलेट्स लोकप्रिय होती. टिफिन्ससुद्धा कॅडबरीचीच निर्मिती. परंतु आता कंपनीने इतर कोअर ब्रँड्सकडे लक्ष केंद्रित केल्याने ‘नटीज’ आणि ‘टिफिन्स’च्या जाहिरातींमध्ये आणि प्रमोशनमध्ये घसरण झाली आहे. पणछोटय़ा स्वरूपात का असेना, या दोन्ही चॉकलेट्सचं उत्पादन कॅडबरीनं सुरू ठेवलेलं आहे. सेलिब्रेशन या कॅडबरीजच्याच ब्रँडअंतर्गत सध्या यासारख्या पॅन्ड चॉकलेट कँडीज विकल्या जातात.
पॅन्ड चॉकलेटबद्दल बोलत आहोत, तर आणखी एका ब्रँडविषयी दिलखुलास गप्पा मारण्यास काहीच हरकत नाही. माझ्यासाठी ती अभिमानाचीच गोष्ट आहे. महाबळेश्वर येथील मॅप्रो गार्डनला मी वर्षभरापूर्वी भेट दिली होती. तेव्हा तिथे पॅन्ड चॉकलेटची निर्मिती करणारी देसी फॅक्टरी बघून मला खरंच खूप आनंद झाला. ‘माझना’ या तुलनेने नव्या कंपनीने चॉकलेट निर्मितीच्या क्षेत्रात आता बऱ्यापैकी नाव कमावलं आहे. कंपनी छोटीशीच पण स्वत:चं वैशिष्टय़ कायम राखून असलेली. मयूर-निकुंज वोरा हे बापलेक मिळून या कंपनीला आकार देण्यासाठी झटत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
चॉकलेट पॅनिंग ही कला मूळची प्राचीन इजिप्तमधून आलेली; पण आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यात बदल करून आधुनिक यंत्रसामुग्री वापरून पॅन्ड चॉकलेट्स बनवली जातात.
चॉकलेट पॅनिंग ही कला मूळची प्राचीन इजिप्तमधून आलेली; पण आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यात बदल करून आधुनिक यंत्रसामुग्री वापरून पॅन्ड चॉकलेट्स बनवली जातात.

चॉकलेट कँडीजचा विषय आहे तर गेलं दशकभर आपला भवताल चॉकलेटी करणाऱ्या इतर लोकप्रिय ब्रॅण्ड्सना विसरून कसं चालेल? आजही लहान मुलांमध्ये यातल्या काही चॉकलेट कँडीज फेमस आहेत. कॉफी बाइट – कॉफी फ्लेवर असलेली चॉकलेट कँडी. कॅडबरीचे चॉक्लेअर्स म्हणजे पूर्वीचे इक्लेअर्स. लहानपणाचे असे अनेक सोबती आहेत की जे स्मरणातून कधीही दूर जाणार नाहीत. मी शाळेत होतो तेव्हाची एक जाहिरात अजून लक्षात आहे. कोणती? ‘मेलडी खाओ, खुद जान जाओ!’ मित्रांनी केलेल्या कोणत्याही सवालाला जवाब देण्यासाठी ही कँडी फेकली जायची आणि उत्तर देणारा ती खाऊन त्यातली मजा चाखायचा. पार्ले मेलडीची जादू होतीच तशी. याशिवाय तुलनेने नवे ब्रॅण्ड्स म्हणजे डेअरी मिल्क शॉट्स – चॉकलेटच्या छोटय़ा गोळ्या किंवा त्यांच्या भाषेत लाडू, ‘परफेट्टी’च्या आल्पेनलिबे, मार्स ग्रूपच्या रंगीबेरंगी एम अ‍ॅण्ड एम, स्कीटल चॉकलेट कँडीज इत्यादी. यातल्या ‘आल्पेनलिबे’ने भारतीय कँडीजच्या बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता.
गॉरमेट चॉकलेट्स तयार करण्याच्या माझ्या कामातून विरंगुळा म्हणून मी कधी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधल्या छोटय़ा गल्ल्यांमधून हिंडायला जातो. तेव्हा तिथल्या होलसेल बाजारात चॉकलेट कँडीजचे काही देसी ब्रॅण्ड दिसतात. कधीतरी क्रॉफर्ड मार्केटमध्ये फेरी मारा, तुम्हालाही अशा अनेक नव्या चॉकलेट कँडीज दिसतील. त्यांची नावं कुणाला ठाऊक नसतील. ऐकलीही नसतील कधी. पण अशा वेगळ्या चॉकलेटच्या चवींची सैर अशा मार्केटमधून करता येईल, यात संशयच नाही.

(अनुवाद – गोविंद डेगवेकर)

Story img Loader