वेदवती चिपळूणकर
रंगमंचावरून रुपेरी पडद्यावर आलेली, ‘रमाबाई पेशवे’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली आणि आता ‘मीडियम स्पाइसी’मधून अडीच वर्षांनी पुन्हा चित्रपटगृहात एन्ट्री घेतलेली अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे. मानसशास्त्रात मास्टर्स केलेल्या पर्णचं सायकॉलॉजिस्ट व्हायचं आपोआपच ठरलं होतं, मात्र महाविद्यालयीन काळात कला क्षेत्रात घेतलेल्या वेगवेगळय़ा अनुभवांमुळे ती आपसूकच या क्षेत्राकडे वळली आणि इथलीच होऊन गेली.

घरी नाटकाचं वातावरण असलं की आपसूकच अभिनयाचं पाणी लागणारच अशी आपली धारणा असते. मात्र, पर्णच्या बाबतीत असं काही झालं नाही. लोकांमध्ये सहजासहजी न मिसळणारी इंट्रोव्हर्ट मुलगी असलेल्या पर्णने भरतनाटय़ममध्ये आपलं एक्स्प्रेशन शोधलं होतं. ती सांगते, ‘‘घरात नाटकाचं वातावरण होतं, माणसं येत-जात असायची. मी बघायचे, ऐकायचे; पण मीसुद्धा कधी या क्षेत्रात जाईन असं वाटलंही नव्हतं आणि ठरवलंही नव्हतं. मी खूप इंट्रोव्हर्ट मुलगी आहे. त्यामुळे घरात माणसांचं येणं-जाणं असलं तरी मी कधी कोणात मिसळायचे नाही. मला फारसे मित्रमैत्रिणीही कधी नव्हते.’’ पुढे पर्णने भरतनाटय़म शिकायचा निर्णय घेतला. ‘‘मी जेव्हा अश्विनी एकबोटे यांच्याकडे भरतनाटय़म शिकायला जायला सुरुवात केली तेव्हा मला स्वत:च्या एक्स्प्रेशनचा मार्ग मिळाला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, जेव्हा मी परफॉर्म करते तेव्हा ती स्पेस माझी असते.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

माझी कला बघणारे प्रेक्षक असतात, त्यांचं लक्ष असतं, ते जज करतात, हे जरी खरं असलं तरी त्या स्पेसमध्ये मी एकटीच असते, त्यात कोणी प्रवेश करत नाही. त्यानंतर मी हळूहळू थोडी ओपन-अप व्हायला लागले.’’ इथूनच हळूहळू तिचं अभिनयाशीही नातं जुळत गेलं. ‘‘फग्र्युसन कॉलेजमध्ये धर्मकीर्ती सुमंत नाटकाची वर्कशॉप्स घ्यायचा आणि ती मी अटेंड केली. तिथे मला माझ्या इंट्रोव्हर्जनचा वे-आऊट मिळाला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधून माझ्या अॅकक्टिंगची सुरुवात झाली. कॉलेजमध्ये मोहित टाकळकरच्या एकांकिकेला मी बॅकस्टेज करत होते. तेव्हा त्याने मला स्टेजवर काम करण्यासाठी विचारलं. मी कधी केलं नव्हतं. त्यामुळे थोडी चलबिचल होती; पण मोहितदादाने सांभाळून घेऊन, त्याच्या ‘आसक्त’ या संस्थेकडून स्टेजवर काम करण्याची संधी दिली आणि मी पहिली एकांकिका केली ‘झूम बराबर झूम’ नावाची..’’ अशी आठवण पर्ण सांगते.

शिक्षणाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर पर्ण मानसशास्त्र विषयात पदवीधर आहे आणि त्यातच तिने मास्टर्सही केलं आहे. दोन-तीन मोठय़ा इंटर्नशिप्स करून तिने अनुभवही घेतलेला होता. त्यामुळे ती काऊन्सिलर होणार हे तिच्या दृष्टीने निश्चित झालेलंच होतं; पण एम.ए. झाल्यावर लगेच तिला ‘रमा-माधव’ या चित्रपटासाठी विचारणा झाली आणि तिचा इंडस्ट्रीत ऑफिशियली प्रवेश झाला.

रंगमंचावर काम करणं पर्णला नेहमीच आवडायचं. तिने केलेल्या पहिल्या नाटकाबद्दल ती सांगते, ‘‘मी काम केलेलं पहिलं नाटक हे खरं तर आम्ही आमच्यापुरता प्रयोग म्हणून बसवलं होतं. त्याचे प्रयोग आम्ही पृथ्वी थिएटरला करायला लागलो. त्या नाटकाला जेव्हा प्रेक्षकांनी पहिल्यांदा स्टॅिण्डग ओव्हेशन दिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की, आपण केवळ आपल्या समाधानासाठी बसवलेल्या नाटकाला इतका चांगला प्रतिसाद! त्यानंतर काही वर्षांनी मी ‘सत्यशोधक’ हे नाटक केलं. त्यात मी सावित्रीबाईंची भूमिका करत होते. त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर गावागावांमध्ये खूप फिरलो. त्यांच्याशी नाटकाबद्दल बोलताना, सावित्रीबाईंबद्दल बोलताना हे जाणवलं की, लोक खूप नीट आपल्याला बघत असतात. आपल्या कामाशी स्वत:ला कनेक्ट करायच्या प्रयत्नात असतात. आपल्याविषयी आणि आपल्या कामाविषयी खूप विचार करत असतात आणि बोलत असतात. कोणताही विषय आणि प्रेक्षक यांच्यातला दुवा आपण बनू शकतो, हे मला तेव्हा लक्षात आलं.’’

आपले चित्रपट, नाटक यांच्या संहिता विचारपूर्वक निवडणारी पर्ण तिच्या निगेटिव्ह अनुभवांबद्दलही सहजपणे बोलते. चुकांमधून शिकायचं असतं या भावनेने काम करत असल्याचं ती सांगते. ‘‘आपले अनेक निर्णय प्रचंड चुकतात आणि अनेक वेळा चुकतात. माझे खूप निर्णय चुकलेले आहेत. त्या वेळी वाटलं म्हणून एखादी गोष्ट केली किंवा स्वीकारली आणि नंतर त्याचा पश्चात्ताप झालाय असंही झालंय. सगळी मेहनत करून, फायनल बोलण्यापर्यंत पोहोचून, वर्ष- दीड वर्ष एखाद्या प्रोजेक्टवर मेहनत घेऊन आयत्या वेळी काही कारणाने ते फिस्कटलंय, असेही अनुभव आहेत. केवळ मी बोलण्यात कमी पडले म्हणून किंवा नाही म्हणू शकले नाही म्हणून कोणत्या तरी कामाला ‘हो’ म्हटलंय असंही झालंय. एखाद्या कामाला मी नाही म्हटलंय किंवा तारखा जमल्या नाहीत म्हणून मला तो चित्रपट सोडावा लागलाय आणि नंतर त्याला प्रेक्षकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळालाय, हेही पाहिलं आणि आपण नाही म्हटल्याचा पश्चात्तापही करून झाला आहे. हे चांगल्या आणि मनासारख्या कामासाठी वाट बघत बसणं खूप टायिरग आणि पेनफुल असतं, पण तो न टाळता येण्यासारखा भाग आहे कलाकाराच्या आयुष्यातला,’’ असं ती म्हणते.

अभिनयाच्या क्षेत्रातील या बऱ्या-वाईट अनुभवांमधून तावून सुलाखून ती बाहेर पडली आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी संयम ठेवायलाच हवा हेही तिने अंगी बाणवून घेतलं आहे. त्यामुळेच असेल कदाचित.. पर्ण निवडक भूमिकांमधून दिसली तरी प्रत्येक भूमिकेतून तिच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ती यशस्वी ठरली आहे. प्रायोगिक रंगभूमी, चित्रपट, डिजिटल माध्यम अशा सगळय़ाच माध्यमांवर अल्पावधीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या पर्णची संयमी वाटचाल तरुण कलाकारांना मार्गदर्शक ठरणारी आहे.
viva@expressindia.com

Story img Loader