अलॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी, अशी एका कॉफी शॉपची थीमलाइन आहे. खरोखर कॉफी शॉप्स म्हणजे तरुणाईचे आवडते कट्टे झालेत.  तिथून सहसा चटकन उठा असं कुणी म्हणत नाही. त्यामुळे तासन्तास गप्पा मारण्याची जागा, बिझनेस मीटिंगपासून, मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापर्यंत सगळं काही या कॉफी शॉपमध्ये बिनबोभाट सुरू असतं.
मूड ऑफ असला की कुठे जावं, काय करावं ते समजेनासं होतं. कॉलेज कट्टा त्या वेळी नकोस वाटतो. चार जण येऊन पडक्या चेहऱ्याचं कारण विचारतात, चौकशी करतात. मग उत्तर देणं आणखी कठीण होऊन बसतं. पूर्वी बिल्िंडगच्या गच्चीवर जाऊन बसता यायचं; पण आता गच्चीवर जायचं म्हणजे दहा लोकांची परवानगी घ्यावी लागते. लायब्ररीत एकांत मिळतो, नव्हे. ती भयाण शांतता अंगावर येते. तेव्हा कुठे डोक्याची टय़ूब पेटते. कॉफी शॉप! थंडगार कॉफी घशाखाली उतरल्यावर कुठे जिवाला शांतता मिळते. मागच्या कोपऱ्यातलं टेबल मिळायलासुद्धा थोडं नशीबच लागतं. ते मिळालं एकदा की मग जन्नत! डीम लाइट, कोल्ड कॉफी, अंगाला रिलॅक्स करणारा काऊच. अशा अ‍ॅम्बियन्समध्ये बॅक स्ट्रीट बॉइजचं ‘शो मी द मििनग ऑफ बिइंग लोनली’ हे गाणंसुद्धा श्रवणीय वाटतं. कोपऱ्यात मोबाइलची रेंज गेली की तोही जरा सुस्तावतो. तिथे सतत ऑर्डरसाठी मागे-पुढे करणारा वेटर नसतो. कोणी ओळखीचं भेटण्याची शक्यताही कमी असते. गजबजलेल्या शहरांमध्ये इतका सुखद एकांत फक्त कॉफी शॉपच देऊ शकतो. या कॉफी शॉपमध्ये काही तरी जादू आहे. कारण तिथे कधी एखादा आर्टस्टि स्केच काढताना दिसतो तर कधी एखादा सूट-बुटवला लॅपटॉपवर काम करताना दिसतो. मनाचं समाधान होईपर्यंत कॉफीच्या प्रत्येक सीपचा आस्वाद घेऊनच मग तिथून बाहेर पडावं. कोणत्याही मूडसाठी कॉफी शॉप उत्तमच!
कॉफी शॉप्सना सध्या एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय. पहिलीच डेट असली की आपली मजल थेट डिनपर्यंत पोहोचत नाही. थोडं-थोडकंच खावं नि सटकावं असा काहीसा प्रकार असतो. कारण रेस्टॉरंट म्हणजे जरा अति होतं आणि बर्गरमधून काही रोमान्स निर्माण होत नाही. त्या मूडला कॉफीच लागते. त्यामुळे कॉफी शॉप्सना बऱ्याचदा कपल्सची वर्दळ दिसते. पण म्हणून डेटवर नसलेल्या व्यक्तिंसाठी कॉफी शॉप वज्र्य नसतं. दोन टेबल्स जोडून गोंधळ घालायला, धिंगाणा करायलासुद्धा कॉफी शॉप बेस्ट असतं. त्यामुळे कपल्सनासुद्धा लव्हर्स पॉइंटवर आल्याचा फील येत नाही आणि एकंदरच वातावरण खेळीमेळीचं राहतं. कपकेक्स, डोनट्स, कॅन्डीज् यांचीसुद्धा डिमांड त्या-त्या शॉपच्या अ‍ॅम्बियन्स आणि सíव्हसमुळे वाढलीये. चार-पाच मित्र-मत्रिणींचा गलका करून फोटोज् काढण्याच्या या उत्तम जागा आहेत. खास करून वितळत्या चॉकोलेटचा चटकन् विरघळणारा डोनट तर त्या क्षणाला रंगतच आणतो.
फास्ट फूडचे फॅनस्सुद्धा मॅक डोनाल्ड, सबवे यांसारख्या ठिकाणी जातात. आमची मित्र मंडळी फोनवर फक्त ‘भेटू या’ एवढंच बोलते. कारण वेळ, जागा आणि अगदी टेबलसुद्धा ठरलेलं असतं. वडापावचेसुद्धा असे मोठाले शॉप्स आले; पण त्यांना हॉटेलचं रूप मिळालं. त्यामुळे विसावून गप्पा मारण्यासाठी आणि थोडी टंगळमंगळ करण्यासाठी अशा पाश्चिमात्त्य शॉप्सना हे महत्त्व आलंय.
आपल्याला नेमकं काय करावंसं वाटतंय यावरून कॉफीशॉपमधलं टेबल ठरतं. एकटे असलो की कोपरा, डेटसोबत असलो की थोडी रोमॅन्टिकली कम्फर्टेबल जागा आणि मित्रांसोबत असलो की खिडकी, असं समीकरण बहुतांश लोकांचं ठरलेलं आहे. थोडंसं ‘हाय’ होण्यासाठी कॉफी, बर्थडेसाठी गोडधोड म्हणून कपकेक्स आणि डोनटस्, तर फुकट टाइमपास करायला सॅण्डविच किंवा बर्गर असं ‘मूडचं फूड’ ठरलेलं असतं.
या सगळ्यांमुळे कॉलेज कट्टे ओस पडले वगरे असं काही झालं नाही आणि कधी होणारही नाही. त्यांची गरज न संपणारी आहे. कॉलेज लाइफचा तो अविभाज्य घटक आहे. पण या नवीन अड्डय़ांमुळे कॉलेज कट्टय़ांवरचा ताण मात्र नक्कीच कमी झालाय. तेव्हा आता पाहूयात. अजून कोणत्या जागा आपल्या शहरी मनाला मानवतायेत.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा