नाटकवेडय़ा महाविद्यालयीन तरुणाईसाठी आयएनटी म्हणजे पर्वणीच असते. या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजने यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या वातावरणाविषयी, याविषयीच्या विषयांबद्दल कलासक्त तरुणाईने व्यक्त केलेल्या भावना..
मुंबईतल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या असंख्य एकांकिका स्पर्धामधली इंडियन नॅशनल थिएटर्स (आय. एन. टी.) ही एक. नुकतीच या स्पध्रेची अंतिम फेरी पार पडली. स्पध्रेत ४० महाविद्यालये सहभागी झाली होती. प्राथमिक फेरी आणि उपांत्य फेरी पार पाडत अंतिम फेरीत पोहोचून पहिल्या तीन क्रमांकांची मानाची स्थानं पटकावली ती जोशी-बेडेकर कॉलेज, डहाणूकर कॉलेज आणि कीर्ती कॉलेजने.
या प्रत्येक महाविद्यालयाच्या कलाकारांनी स्पध्रेत स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवला. संवेदनशील आणि सहजसोप्या पण मानवी जीवनावर भाष्य करणाऱ्या विषयांद्वारे प्रेक्षकांना रिझवले. विषयांचे वैविध्य आणि सादरीकरणातली संवेदनशीलता हेच या वर्षीचे विशेष होते. पण गेल्या कित्येक वर्षांत फॉलो केला जाणारा गिमिक्स एकांकिकांचा ट्रेंड गेल्या एक-दोन वर्षांत हळूहळू बदलतोय. शिवाय नाटकवेडय़ा हरहुन्नरी कलाकारांना वाव देणारा आय.एन.टी. हा एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरतोय. या स्पध्रेत ‘ओश्तोरिज’ (जोशी-बेडेकर) ही एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. ‘बँक ऑफ बँक्रप्ट’ या डहाणूकर कॉलेजल्या एकांकिकेला दुसरं, तर ‘नहीं तो गोली मार दूंगा’ (कीर्ती महाविद्यालय)ला तिसरं बक्षीस मिळालं.
या स्पध्रेत सहभागी झालेल्या जोशी-बेडेकरच्या सुप्रियाचं म्हणणं असं की, ही स्पर्धा अत्यंत चुरशीची असते. पण या वर्षी आमच्या कॉलेजने खूप वर्षांनंतर पार्टििसपेट करून पहिलंच स्थान पटकावलं असल्यामुळे खूपच आनंद होतोय. याचं श्रेय ती तिच्या दिग्दर्शकांना आणि लेखकांना देतेय, तर चेतन गुरव या कीर्ती कॉलेजच्या मित्र-कलाकाराच्या म्हणण्यानुसार आय.एन.टी. हा असा एक प्लॅटफॉर्म असतो, जिथे तुमच्या कलागुणांना पूर्णत: वाव दिला जातो. नाटकाच्या टॅगलाइन्स तुमच्याही आयुष्यात बदल घडवत असतात. शिवाय बॅकस्टेजचा सुद्धा अनुभव या सगळ्यांमध्ये मिळत जातो. चेतन पुढे असंही म्हणाला की, आय.एन.टी.ला अनेक उत्तम आणि प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती असते, जे सतत आमच्यासारख्या नाटकवेडय़ांची दखल घेत असतात आणि अनेक संधी उपलब्ध करून देत असतात. म्हणूनच असामान्य व्यक्तिरेखांच्या किंवा प्रसंगांच्या चित्रणाऐवजी सामान्यच गोष्टींना किंवा पात्रांना पूर्णपणे न्याय देण्याची धमक आय.एन.टी.मध्ये सहभागी होणाऱ्या कलावंतांना असते असं म्हणावं लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
नाटकवेडय़ांची मांदियाळी
नाटकवेडय़ा महाविद्यालयीन तरुणाईसाठी आयएनटी म्हणजे पर्वणीच असते. या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजने यात प्रथम क्रमांक पटकावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College drama contest