फ्रेण्डस्, तुम्हाला कानोकान आणि सोशल साइट्सच्या पानोपानावरून खबर लागलीच असेल की अभी फेस्टिव्हल्स का राज शुरू होनेवाला हैं. सारी मंडळी आळस झटकून कामाला लागल्येत. धावपळ आहे पण गोंधळ अजिबात नाहीये. सारं काही शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे. या फेस्टिव्हल्समध्ये काय नसतं? इंडियन ग्रुप साँग, वेस्टर्न ग्रुप साँग, इंडियन सोलो, वेस्टर्नसोलो, फोक ऑर्केस्ट्रा, क्लासिकल डान्स, फोक डान्स, क्रिएिटव्ह डान्स, स्किट, एकांकिका, माईम, मोनोअॅक्टिंग, मिमिक्री वगैरे वगैरे. तसंच एलोकेशन, डिबेट, स्टोरी रायटिंग, क्विझ, पेंटिंग, पोस्टर मेकिंग, कोलाज, क्ले मॉडेलिंग, रांगोळी आणि किती तरी काय काय या फेस्टमध्ये असतं.
सगळ्या फेस्टिव्हल्समध्ये दर वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना असतात. प्राचार्य आणि प्राध्यापकांचा पाठिंबा असतो. विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी आणि टीम स्पिरीट असतं. अनेकदा प्रायोजक मिळवताना अडचणी येतात. कधी मार्केटिंग होत नाही. मुख्य म्हणजे बऱ्याच कॉलेजेसचे फेस्ट एकदम येतात. मात्र या सगळ्यांवर मात करून प्रचंड उत्साहनं कॉलजगोअर्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात. काही फेस्टिव्हल्सची ही प्रातिनिधिक झलक.
संकलन : राधिका कुंटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा