गायत्री हसबनीस

गरज आणि तरुणाई हे आजघडीला घट्ट समीकरण आहे. ‘आय नीड मनी’, ‘आय नीड आयफोन’ अशी नीड्सची एंडलेस यादी असलेल्या पिढीसाठी ‘आय नीड इट’ हाच एक निर्धार आहे की काय या थाटातच त्यांचा वावर आहे. अशा परिस्थितीत एखादा तरुण-तरुणी कमीत कमी गरजा ठेवून त्या पद्धतीने जगण्याचा विचार करते, असं सांगितलं तर ते खरं वाटणार नाही. मात्र कमीत कमी गरजांमध्ये अधिकीच्या समाधानाचे गणित मांडणारीही काही तरुण मंडळी आहेत. मिनिमलिस्ट लाइफस्टाइलची ही संकल्पना नेमकी काय आहे हे स्वानुभवातून सांगतोय तरुण मित्र राज पाटील..

Viral video of elder man driving cycle rikshaw with passanger in it went viral on social media
वयोवृद्धाचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी! दिव्यांग आजोबांनी एका पायाने चालवली सायकल रिक्षा, VIDEO झाला व्हायरल
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
jui gadkari tharala tar mag actress celebrates diwali in shantivan orphanage
Video : अनाथ व निराधार वृद्धांसाठी मदतीचा हात…; ‘ठरलं तर मग’ जुई गडकरीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
Ashok Chavan daughter, Tirupati Kadam, Bhokar,
भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
three savarkar brothers wife information
नाट्यरंग : ‘त्या तिघी’ हिमालयाच्या सावल्यांची खडतर आयुष्यं

गरज की आवड यातला फरक ओळखत, आवडीच्या वस्तूची गरज असेल तर ती स्वीकारून नाही तर नाकारून आपल्या गरजांचे गणित कमी करत जाणे ही संकल्पना सहजी पचनी पडणारी नाही. मात्र ती गरजेची आहे, असं राज म्हणतो. ‘मिनिमलिस्ट लाइफस्टाइल’ हा आजच्या पिढीच्या जीवनशैलीचा एक ट्रेण्ड आहे. खरं सांगायचं तर त्यात मिनिमल किती प्रमाणात राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मुळात ज्यांची लाइफस्टाइल त्यांच्या दिनक्रमानुसार सेट असेल तर त्यावर त्यांच्या गरजा किती कमी किंवा जास्त आहेत हे ठरतं किंवा आपल्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजनही करता येतं. एखादी व्यक्ती तिच्या किती गरजा कशा रीतीने पूर्ण करते त्यावर तो किती मिनिमल आहे हे ठरतं, कारण हे मिनिमलिस्ट लाइफस्टाइलचं डिझाईन आहे, असं तो म्हणतो.

मला स्वत:ला कमीत कमी गोष्टींत मॅनेज करायला आवडतं. कोणत्याही कठीण कामात मला मी कमीत कमी गोष्टींत केलेल्या मॅनेजमेंटमधून समाधान मिळते आणि कामं सोयीस्कर होतात. त्यामुळे मी ही लाइफस्टाइल स्वीकारण्याचा निर्णय घेतला, इतकं सहजपणे राज सांगतो. मिनिमल लाइफस्टाइल म्हणजे काय हे समजून घेऊनच त्याचा अवलंब केला पाहिजे, नाही तर केवळ समाजमाध्यमांवर ट्रेंड आहे असं मानून पुढे जाणारा मोठा वर्ग आहे, असं तो सांगतो. मिनिमल जगणं हे सोपं नाही. प्रत्येकाच्या आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजेनुसार त्यांची पूर्तता कशी करायची हे ठरते. ‘‘मी स्वत: सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. त्यामुळे ९ ते ७ माझं ऑफिस असतं. एक तास माझी जिम असते. दोन वेळेचं रोजचं जेवण असतं. ही मी माझ्या गरजांनुसार लाइफस्टाइल सेट आहे. आता प्रश्न आहे की, मी मिनिमल लाइफस्टाइल जगतो कसा? अर्थात इतरांप्रमाणे ऑफिसला जाताना भरपूर स्टेशनरीचा मी विचार करत नाही. मी ऑफिसला काहीच घेऊन जात नाही. माझ्या केबिनमध्ये एक नोटबुक आहे, दोन पेन्स, एक बोर्ड आणि एक कॉम्प्युटर आहे. मला स्वत: काही डेकोरेट करायला आवडत नाही. एवढय़ा गोष्टींत माझी कामं व्यवस्थित होतात. नको त्या गोष्टी नसल्याने पसारा होत नाही, चिडचिड नाही. गोष्टी जागेवर मिळतात. आता मी माझ्या कामांच्या गरजेनुसार या ऑफिसमधील गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत. हे याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट ठरवता येते,’’ असं तो म्हणतो. मिनिमलिस्ट लाइफस्टाइल स्वीकारल्यानंतर कामाव्यतिरिक्त त्यांचे आयुष्य कसे असते, यावरही मिनिमल लाइफस्टाइल ही टप्प्याटप्प्यानेच आत्मसात करता येते, असं राज सांगतो. मला लहानपणापासून मिनिमल राहण्याची सवय आहे, पण मित्रमैत्रिणींसोबत धम्माल मीही करतो पण.. अर्थात लाइफस्टाइलच्या डिझाईननुसार एक-दोन तास ऑफिसनंतर माझे मित्रमैत्रिणींबरोबर असतात. त्यातही अतिरेक नाही, असं त्याने सांगितलं. माझ्या मते कुठल्याही वस्तूला, गोष्टीला आणि गरजेला महत्त्व असते. तुमच्या आयुष्याशी निगडित गरजेचे किंवा कुठल्याही गोष्टीचे मूल्यमापन करायला हवे, तुमचे मन ध्येयकेंद्रित असले पाहिजे, तुमच्या लाइफस्टाइलमधून तुम्ही कार्यक्षम राहताय की नाही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या लाइफस्टाइलला फॉलो करताना मी ते साध्य करतो, असे त्याने स्पष्ट केले.

‘‘माझ्या दृष्टीने मिनिमलिस्ट लाइफस्टाइल जगणारी व्यक्ती एखाद्या परिस्थितीचे, समस्येचे, संकटाचे आणि वैचारिक पातळीवरील गोंधळाचे आयोजन व्यवस्थित करू शकते. मिनिमलिस्ट लाइफस्टाइल ही होमबेस्ड संकल्पना आहे. माझ्या रूमपासून मी सुरुवात केली तर एकदा सेटअप केलेल्या गोष्टी नंतर मी परत व्यवस्थित ऑर्गनाइज्ड करू शकतो, याची खात्री त्यात आहे. अमेरिकेत मिनिमलिस्ट लाइफस्टाइल जगणारी माणसं आहेत, तिथे राहण्याची शैली ही मिनिमल आणि इकोफ्रेंडली पद्धतीची आहे. कारण मिनिमलिस्ट आणि वेस्टेज या खूप जवळच्या संकल्पना आहेत. मिनिमलिस्ट दृष्टिकोन आला की आपोआपच पैशापासून वेळेपर्यंतच्या उधळपट्टीवर नियंत्रण येते, असं मत त्याने मांडलं. राज कोणत्या बाबतीत मिनिमलिस्ट आहे हे सांगताना, मी सोशल मीडिया वापरत नाही. मी अभ्यास करायचो तेव्हा टेक्सबुकचं वापरायचो. नोटबुकमध्ये नोटडाऊ न करण्यापेक्षा मी ते लक्षात ठेवायचो आणि लक्ष केंद्रित करून लेक्चर अटेंड करायचो, याचा मला फायदाच झाला. मुळात मिनिमलिस्टचा फायदा बिझनेसमध्ये खूप होतो. मिनिमलिस्ट लाइफस्टाइलमुळे विचारांना चालना मिळते. प्रॉडक्टिव्हिटी वाढते. आपण स्वत:ला स्पेस देऊ  शकतो, असं तो सांगतो.

मिनिमलिस्ट लाइफस्टाइलचे काही प्रकार –

* एस्थेटिक मिनिमलिस्ट – यामध्ये मिनिमलिस्ट व्यक्तिमत्त्वांना स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने राहायला आवडते. या प्रकारात मोडणारे स्त्री-पुरुष कलेवर खूप प्रेम करतात.

* एसेन्शियल मिनिमलिस्ट – या प्रकारातील मिनिमलिस्ट फार हौशी नसतात. जेवढी गरज तितक्याच गोष्टी अवतीभवती असतात. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट नाही आणि देखावा यात नसतो.

* एक्सपेरिमेंन्टल मिनिमलिस्ट – यात नवीन प्रयोग करून समाधान मिळवणारी तरुण पिढी आहे. ज्यात गोष्टी, व्यक्ती, वस्तू यांच्यामागे धावण्यापेक्षा अनुभव आणि आत्मसन्मान जपणारी ही मिनिमलिस्ट मंडळी असतात.

* सस्टेनेबल मिनिमलिस्ट – ही संकल्पना तशी नवीन नाही. रिसायकल, रियूज आणि इकोफ्रेंडली पद्धतीने जगण्याची उमेद असणाऱ्या व्यक्ती या प्रकारात मोडतात.

viva@expressindia.com