सध्या आपण काय करतोय, तर जे जे म्हणून गारवा देईल, ते ते स्वाहा करणं चालू आहे. मग ती ‘पारसी डेअरी’ची कुल्फी असेल, ‘हाजीअली’चं ज्यूस असेल किंवा मग ठाण्यातल्या ‘कुलकॅम्प’चं आइसक्रीम असेल. किंवा मग ‘बादशाह’चा फालुदा, ‘नॅचरल्स’चं आइसक्रीम, ‘बास्किन रॉबिन्स’मधले कूलर्स, ‘मेरेडियन’ची कूलकॉफी किंवा मग पुण्याची फेमस ‘मस्तानी-कॅडबी’. कधी कोक-पेप्सी, कधी ‘शाऊट-निंबूज, कधी माझा, फ्रूटी, टँग नि कधी कधी कलरफुल बर्फाचा गोळादेखील! उन्हाच्या झळा सुसह्य़ करत असले तरीही ते खाता-पिताना त्यांचा अतिरेक होऊ नये. कधीतरी हे सगळं ट्रायआऊट करणं ओके, पण रोज रोज नाही. सो, समर कूल होण्यासाठी एका डॅशिंग डाएट प्रॅक्टिकलची गरज आहे. या प्रॅक्टिकलसाठी काही लेसन्स फॉलो करणं मस्ट आहे. यू नो, ‘व्हीव्हीआयएमपी’.. हिअर वुई गो..
‘पाणी म्हणजे जीवन’ वगैरे फिलॉसॉफी केवळ पिक्स म्हणून न ठेवता ती लाइफमध्ये रिअली अप्लाय करा. पाणी हे एकदम बेस्टच. फक्त उन्हातून आल्या आल्या फ्रिजमधलं पाणी पिणं टाळा. जरा वेळानं माठातलं वाळा घातलेलं पाणी पिणं कसलं झकास लागतं, माहितेय. सगळे हेल्थ एक्स्पर्ट्स हाच तर सल्ला देतात. शिवाय बाहेर असतानाही पाण्याची बॉटल सोबत हवीच.
फॉर अ चेंज फक्त पाणी प्यायचा कंटाळा आला तर लिंबू-मीठ पाणी किंवा इलेक्ट्रॉल घातलेलं पाणी प्या. कोल्ड्रिंकमधल्या साखर किंवा सोडय़ाचं प्रमाण जास्त असल्यानं अनेक जण ते ऑलरेडी टाळायला लागलेत. त्याऐवजी घरी केलेलं लिंबू, आवळा, कैरी, कोकम, पेरू, काजू यांचं सरबत टर्न बाय टर्न प्या.
एक हेल्थ सिक्रेट असं आहे की, बारीक असलेल्यांनी घरी केलेला मिल्कशेक, फालुदा, लस्सी प्यावी नि जाड असलेल्यांनी कोकमाचं सार, सोलकढी, मठ्ठा घ्यावा. पातळ नि गोड ताक ऑलवेज वेलकम.
दिवसभर बाहेर असताना एक सही ऑप्शन आहे, तो म्हणजे कलिंगड, टरबूज-खरबूज, द्राक्षं, जांभूळ, संत्रं, मोसंब, अननस, स्ट्रॉबेरी, आवळा ही फळं खाणं. ते शक्य नसेल तेव्हा त्यांचे ज्यूस पिणं. या फळांमध्ये सी व्हिटॅमिन, कॅल्शिअम, आयर्न, बीटा केरोटिन, प्रोटीन आदी आवश्यक जीवनसत्त्वं असतात. शिवाय उसाचा रस प्यायलात, तेही बिनबर्फाचा तर तो चांगला नि खिशाला परवडण्याजोगाही. शिवाय चिंचा, बोरं, काजू, करवंद, जांब, कैरी, फणसाचे गरे, रायआवळे हा रानमेवा स्टेशनरोडला येता-जाता दिसतोच. तो न विसरता टेस्ट करून पाहाच. हे सगळं ट्राय कराल तेव्हा चहा-कॉफी पिणं टाळलेलंच बरं. कारण त्यातल्या कॅफिनमुळं डिहायड्रेशन होऊ शकतं. तुमच्या नेहमीच्या समर कूलर्ससोबत हे फण्डे ट्राय करून बघाच. त्यामुळं उन्हाच्या झळा थोडय़ा कमी लागतील. हॅव कूल समर!
राधिका कुंटे