कूऽऽऽल.. येस्स ! तुम्ही बरोब्बर वाचलेत हे शब्द ! समजा, उन्हामुळं थोडंसं गरगरलं असेल तरी हे शब्द एकदम करेक्ट आहेत. उन्हाळा हा रंगांचा ऋतू, जगभरात फॅशन फ्रेंडली म्हणून ओळखला जातो. तो अगदी ‘कुऽऽऽल’ असू शकतो, थोडीशी काळजी घेत फक्त काही टिप्स फॉलो केल्यात तर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवसेंदिवस उन्हाची तलखी वाढू लागेल तसतशी जिवाची नुसती तगमग होऊ लागेल. घामाच्या धारा नि कलकल नकोशी होऊन जाईल. ‘व्हॉट्स अॅप’वरच्या स्टेटसमधला ‘गॉगलवाला सूर्य’ही नकोसा वाटेल.. खरोखरच ‘कूल’ कशानं राहता येईल, असा विचार सतत डोकं खाईल. तेव्हा डोकं शांत ठेवा नि एक दीर्घ श्वास घ्या.. उन्हाळ्याचा डट के सामना करायचा असेल, तर आपल्यालाही बदलायलाच हवं. उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी आपल्या ‘लाइफस्टाइल’मध्ये थोडासा बदल केलात तर उन्हाळा सुसह्य़ होऊ शकतो. हा बदल आपल्या वेअरमध्ये असेल, मेकअपमध्ये असेल, अॅक्सेसरीजमध्ये असेल नि डाएटमध्येही असेल.

दस नूर कपडा..
उन्हाळा नि कॉटन हे एक फिक्स नि परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मऊ, मुलायम नि मस्तसा फील.. इसकी तो कुछ बातही अलग हैं.. त्यातही तो लखनवी ड्रेस असेल तर बघायलाच नको. छानशी एम्ब्रॉयडरी नि कम्फर्टेबल फीलमुळे उन्हाचा चटका जाणवणार नाही. सध्या क्रॉप टॉपखाली हायवेस्ट जीन्स, हायवेस्ट स्कर्ट्स, धोती पँट्स इन आहेत. त्याखेरीज शॉर्ट्स, कॉटन स्कर्ट्स, लेनिन पँट्स, स्लिव्हलेस टॉप्ससोबत कॉटन कुर्ता यांची चलती आहे. कॉटनच्या कपडय़ांची सवय नसेल तर टेरिकॉटचे कपडेही चालतील. उन्हाळ्यात हेवीवर्कचे कपडे अजिबात घालू नका. िपक, पीच, लेमन, पोपटी, पिस्ता या फिकट रंगांच्या कपडय़ांना प्राधान्य द्या. त्यातही पांढऱ्या रंगांच्या कपडय़ांना जास्ती पसंती दिली जाते. काळा रंग सूर्यप्रकाश आकर्षति करत असल्यानं जास्त उकडतं. त्यामुळं काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळाच.
खादी ही तर एव्हरग्रीन आहे. आता खादीलाही स्टायलिश लुक प्राप्त झालाय. लेनिन नि रंगीत खादीला अधिक प्रेफरन्स दिला जातोय. त्यात कुडता, ड्रेस मटेरिअल्सची व्हरायटी आहे. सिल्क खादीच्या रिच लुकमुळं ती फंक्शनमध्येही घालता येऊ शकते. खादी ज्यूटच्या वेगळ्या टेक्चरमुळं तिचा वापर कुत्रे, शर्टसाठी करता येईल. प्रिंटेड खादीतल्या ड्रेस मटेरिअल्समध्येही खूप चॉइस मिळू शकेल.

सर सलामत..
एके काळी फक्त पुणेकर मुलींची मक्तेदारी मानला गेलेला स्कार्फ आता सगळीकडं अवतरलाय. एकदा स्कार्फ बांधला की, आपले हात मोकळे राहतात नि ऊन- धुळीपासून बचाव होतो. फिक्या रंगाचा कॉटनचा स्कार्फ घेतलेला उत्तम. एरवी ओढणीच्या लोढण्याऐवजी वापरला जाणारा स्टोल पटकन डोक्याभोवती गुंडाळून उन्हाचा तडाखा वाचवता येईल. वजनानं हलक्या असणाऱ्या कॉटन, सिल्क, पश्मिना, काश्मिरी सिल्क अशा फॅब्रिक्समधल्या समर शॉल्सचा वापर करता येईल. या शॉल्सचा पार्टी किंवा कार्यक्रमाला जाताना वापर करू शकता. छत्री पकडायला कंटाळा येत असल्यानं तशी ती नकोशीच वाटते. पण फॅशन म्हणून छत्री न्यायची असल्यास रंगीबेरंगी थ्रीफोल्ड छत्री पर्समध्ये सहज मावेल. उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनकोट वापरला जातो. सनकोटमध्ये चेन, विदाउट चेन, अटॅच्ड टोपी असे निरनिराळे प्रकार आहेत. कम्फर्टेबल फीलची कॅप वापरून उन्हापासून बचाव करताना एक फॅशनेबल लुकही मिळतो. आदिदास, नायकी, जग्वार आदी ब्रँडच्या कॅप्स, हॅट्स ट्राय करता येतील.

डी फॉर डाएट
आपल्या आहारावर अनेकदा त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांत ताजी फळं, पालेभाज्या, फळभाज्या नि ताज्या अन्नाचा समावेश आहारात करावा. चहा-कॉफी शक्यतो घेऊ नये. त्याला पर्याय म्हणून िलबू, कोकम, जांभूळ इत्यादींचं सरबत घ्यावं. घरातलं गोड ताक प्या. शहाळ्याचं पाणी प्यावं. फळांचं ज्यूस प्यावं. पाण्याची बाटली कायम जवळ ठेवावी. ठराविक वेळानं पाणी प्यावं.
ही थोडी हटके लाइफस्टाइल ट्राय करून पाहिलीत तर खरोखरच तुमचा समर एकदम कुऽऽऽल होईल. हॅप्पी समर व्हेकेशन..

सजना हैं मुझे..
उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावाच. कारण घामाच्या धारांमुळे मेकअप खराब होण्याची शक्यता अधिक असते. फंक्शनला जायचं असल्यास वॉटरप्रूफ, वॉटररेझिस्टंट मेकअप करावा. बाहेर जाण्याआधी चेहरा स्वच्छ धुणं टाळू नका. सनस्क्रीन लोशन लावा. लिक्विड, क्रीम फाउंडेशनचा वापर करू नका. गडद रंगाचं फाउंडेशन लावू नका. उन्हाळ्यात हलका मेकअपच करावा. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी नॅचरल रंग वापरावा. काळ्यापेक्षा ब्राउन मस्कारा आय लॅशचा फ्रेश लूक देतो. आयलायनरही ब्राउनच लावा. लिपस्टिकपेक्षा लिप बाम वापरावा. ऑरेंज, पीच कलर चांगले दिसतात. बाहेरून घरी किंवा ऑफिसमध्ये आल्यावर चेहरा पुन्हा व्यवस्थित धुवावा.

नजरें मिली..
डोळ्यातून पाणी येणं नि त्यांची जळजळ होणं हा उन्हाळ्यातला त्रास टाळण्यासाठी मोठय़ा ग्लेअर्सचा वापर करा. त्यामुळं चेहऱ्याचा जास्तीतजास्त भाग झाकला जातो. चेहरेपट्टीला सूट होणारा नि मेडिकली करेक्ट असणारा गॉगल घ्यावा. गॉगलसाठी यूव्ही प्रोटेक्टेड आणि पोलराइज्ड या ग्लासची निवड करावी. फास्टट्रॅक, रेबॅन, डॉलर, मक्र्युरी आदी कंपन्यांचे ब्रँडेड गॉगल्स भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत.
ग्रीन, ब्ल्यू, ग्रे आणि ब्राउन या रंगांना सध्या अधिक पसंती आहे. एव्हिएटर शेपचे गॉगल्स कोणत्याही चेहऱ्याला छान दिसतात. उभ्या चेहऱ्यासाठी स्क्वेअर शेपचे नि गोल चेहऱ्यासाठी सक्र्युलर किंवा ओव्हल आकाराचे गॉगल्स छान दिसतात.
पर्समध्ये मस्ट : पाण्याची बाटली, रुमाल, फेसवॉश, सनस्क्रीन लोशन, लिपबाम, आवळा सुपारी.
छाया : आशिष सोमपुरा / मॉडेल : शिल्पा