नमस्कार, मी पूजा. मी २५ वर्षांची असून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करते. माझा वर्ण गोरा आहे. माझी उंची ५.३ असून वजन ७५ किलो आहे. माझ्या उंचीच्या मानाने माझी अप्पर बॉडी बऱ्यापैकी जाड आहे. माझ्या बॉडी टाइपला साजेसे कॅज्युअल ऑफिस वेअर सुचवा, तसेच कोणते रंग सूट होतील तेही सुचवा.
हाय पूजा ,
तुझ्या ऑफिसमध्ये कॅजुअल्स चालतात ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुझ्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पहिल्यांदा आपण रंगांबद्दल बोलू. हेवी बॉडी टाइप असलेल्या व्यक्तींसाठी डार्क शेड्स कधीही चांगल्या. ब्लॅक, मरून, डार्क ग्रे, एमराल्ड, पर्पल हे कलर्स जास्त वापर. त्याचबरोबर जर तुला प्रिंट्स घालायला आवडत असतील तर लहान प्रिंट्स तू वापरू शकतेस. ब्राइट कलर्स आणि मोठय़ा प्रिंटमध्ये तू जाड दिसशील. व्हर्टिकल स्ट्रिप्स किंवा प्रिंट असलेले कपडे वापर, ज्यात तू स्लिम दिसायला मदत होईल. नॉर्मल फिटिंगचे कपडे वापर. अति लूज किंवा अति घट्ट कपडे वापरू नको. स्टिफ आणि जास्त व्हॉल्यूम निर्माण करणारे फॅब्रिक्स म्हणजे जाडेभरडे किंवा कडक कापड वापराणे टाळ. त्यामुळे तू जास्त जाड दिसशील.
आता आपण बॉटम्सबद्दल बोलू. तू टाइट्स किंवा लेगिंग्ज घाल. त्याच बरोबर स्लिम फिट फुल लेन्थ जीन्स घाल. थ्री फोर्थ आणि काफ लेन्थ पँट्स आणि त्याच बरोबर बल्की सलवार आणि पटीयाला घालणे मात्र टाळ. त्यामुळे तू बुटकी दिसशील. टय़ुनिक्स घातलेस तरीही त्याची लेन्थ मोठी असू दे. अँकल लेन्थ कुर्तीजसुद्धा खूप छान दिसतील. त्यामुळे तू मस्त उंच दिसशील. त्याच बरोबर मॅक्सी ड्रेसेस नक्की ट्राय कर. ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुझी फिगर उठावदार दिसण्यासाठी मॅक्सी ड्रेस खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुला लहान टॉप्स घालायचे असतील तर मेक शुअर तो तुझ्या अप्पर थायलेन्थपर्यंत असेल. ज्यामुळे तुझे पाय लांबसडक दिसतील. त्याच बरोबर नी लेन्थपर्यंत असलेले टॉप्स किंवा कुर्तीज घालू नको. ज्यामुळे तू जास्त जाड वाटशील. मीडियम फिटेड कपडे वापर. जास्त घट्ट किंवा जास्त लूज कपडे वापरू नको.
जर कम्फर्टेबल असशील तर नेहमी हाय हिल्स वापर. नाही तर स्टीलेटोज किंवा वेजेस घालायलाही हरकत नाही. फ्लॅट्स वापरत असशील तर ओपन फ्लॅट्स वापर. बंद फ्लॅट्समध्ये खूप कॉम्पॅक्ट लुक येईल.
केस लांब आणि स्ट्रेट ठेवलेस तर तू काहीशी उंच दिसू शकशील. नेकपिसेस, दुपट्टा, स्कार्फ जे काही घेशील ते लांब आणि थिन असू दे. थिक आणि जरा हेवी मटेरिअल असेल तर व्हॉल्यूम निर्माण होईल आणि जास्त जाड दिसशील. सगळ्यात महत्त्वाचे जे काही घालशील ते कॉन्फिडंटली कॅरी कर. मग बघ तू नक्कीच सुंदर आणि आकर्षक दिसशील.
(अनुवाद – प्राची परांजपे)
हेवी बॉडी टाइपसाठी डार्क शेड्स
नमस्कार, मी पूजा. मी २५ वर्षांची असून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-08-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dark shades for heavy body