शब्दांकन: श्रुती कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मैं कौन हूं यह सिर्फ मैं जानता हूं बाकी दुनिया तो सिर्फ अंदाजा लगा सकती हैं ।

‘स्पॉटिफाय’वर प्रसारित होणाऱ्या ‘डिअर टीनएज मी’ या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर, कलाकार आपण किशोरवयात असताना कसे होतो? नकळत काय चुका केल्या? कसे शिकत गेलो? या धावपळीच्या जगात आपण स्वत:ला कुठे पाहतो? कधी कोणता न्यूनगंड होता का? अशा सध्याच्या किशोरवयीन मुलांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांबद्दल बोलतात आणि स्वत:साठी तयार केलेले पत्र आपल्या श्रोत्यांना ऐकवतात. या पॉडकास्टमधील ‘टेक अ चिल्ल पिल्ल’ या भागात अभिनेत्री एहसास चन्नाने तिचा किशोर वयात असतानाचा अनुभव सांगितला आहे. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करायला लागल्यामुळे अन्य मुलांच्या तुलनेत जास्त कामात अडकून राहावं लागायचं. त्यामुळे मित्र- मैत्रिणींना, परिवारातील लोकांना फार कमी वेळ देता यायचा. याची एवढी सवय झाली की आता जरी ३ दिवस सुट्टी मिळाली तरी त्यातील २ दिवस काही ना काही कामं हातात घेतलेली असतात. त्यामुळे बाकी कोणाला वेळ देता येत नाही, हे सांगतानाच या गोष्टी आपल्या अधिक जवळचे लोकही समजू शकत नाहीत, याची खंत तिने व्यक्त केली. ‘मैं कौन हूं यह सिर्फ मैं जानता हूं बाकी दुनिया तो सिर्फ अंदाजा लगा सकती हैं’ ही शायरी एकवून हा भाग तिने संपवला आहे.

हेही वाचा >>> ऐकू आनंदे

तरुण वयात मुलं अनेक विचारांनी गोंधळलेली असतात. तसंच या वयात मुलं अजाणतेपणी अनेक चुका करतात किंवा आपल्यामधला आत्मविश्वास कमी पडल्यामुळे अनेक संधी गमावून बसतात. अशा प्रत्येक किशोरवयीन मुलामुलींसाठी या पॉडकास्टमध्ये खूप काही सांगण्यात आलं आहे. तरुणांमध्ये अभिनेत्री एहसास चन्नाचे चाहते खूप आहेत. मलादेखील तिचं काम फार आवडतं. बिनधास्त, बेधडक असलेल्या या अभिनेत्रीचं पॉडकास्टमध्ये एक वेगळं हळवं रूप अनुभवायला मिळालं. फक्त एहसास चन्ना नाही तर असे अनेक इन्फ्लुएन्सर, कलाकारांनी किशोर वयातील असलेले त्यांचे अनुभव या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितले आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची ही एक वेगळी बाजू समजून घेता येते. – जिशान मोहिते (विद्यार्थी)