कपडय़ांची रंगसंगती, कापडाचा पोत (टेक्स्चर), कपडय़ावरील रेषांचे रेखांकन आणि यांतून निर्माण होणारे नजरेचे खेळ आपण मागच्या लेखांमध्ये पाहिले. या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर कसा प्रभाव पडू शकतो, हेदेखील पाहिले. परंतु हे एवढय़ावरच थांबत नाही. आपल्यापकी बरीच मुलं-मुली छापील चित्रांकन (प्रिंट) किंवा नक्षी असलेले कपडे वापरतात. पूर्वी अशा प्रिंट्सचे प्रकार फार मर्यादित आणि सर्वसाधारण असत. उदा. फक्त उभ्या रेषा किंवा उभ्या-आडव्या रेखाकृतींतून निर्माण झालेली चौकडीची नक्षी, फुलांची नक्षी, प्राण्यांच्या आकृत्या किंवा मानवी चेहरे. वैविध्यपूर्ण चित्रांकन सर्व प्रकारच्या कापडांवर दिसत नसे आणि अशी कापडे फार कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध असत. आता मात्र सगळं बदलतंय. सर्व प्रकारच्या कापडांवर सर्व प्रकारची प्रिंट्स आढळतात. बाजारातील सर्वच प्रकारच्या कापडांची आवक एवढी वाढली आहे की आपण खरेदी करताना गोंधळून जातो. बरे कापडावरील चित्रेसुद्धा नाना प्रकारची.. फुलांपासून ते ट्रेंडी पौराणिक चित्रांपर्यंत.  
इतके  वैविध्य पाहून, नक्की काय घालावे हे न कळून सामान्य माणूस संभ्रमात पडतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारे प्रिंटेड कापड निवडणे हे फारच कठीण काम. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे रोजच नवनवीन छपाई असलेली अनेक कापडे बाजारात हजर होत असतात आणि तसे पाहायचे तर सगळीच मनाला भुरळ घालतात. कापडाचा पोत किंवा रंग या कशातच या प्रिंट्सइतके नावीन्य असूच शकत नाही. त्यामुळे कोणती चित्रे असलेला, कोणता कापडाचा प्रकार निवडायचा ही गोष्ट मोठय़ा खुबीची आहे. कारण फक्त  कापडावरील नक्षी आवडणे महत्त्वाचे नाही तर ती आपल्याला शोभून दिसणे हेही तितकेच गरजेचे आहे.
या निवडीमध्ये अनेक बाबींना प्राधान्य द्यावे लागते. मुख्य म्हणजे कपडा परिधान करणाऱ्या व्यक्तीचे वय आणि आकारमान. कोणतीही फॅशन कोणत्याही वयात करावी हे जरी मान्य केले तरी ती तुम्हाला शोभायला तर हवी की नाही? सर्वसाधारणपणे तिशी-पस्तीशीपर्यंतच्या स्त्रियांना कोणताही कापडाचा प्रकार, त्यावरील चित्रकला शोभून दिसते, पण त्यानंतर मात्र शरीराचा आकार, चालण्याची ढब, वयाचा शरीरावर होणारा दृश्य परिणाम या सर्वाचा विचार कपडय़ावरीलप्रिंट निवडताना करावा लागतो. अशा वयात बहुधा फुलापानांची नाजूक नक्षी किंवा पारंपरिक चित्रकला तुमची प्रतिमा अधिक प्रगल्भ दिसण्यास मदत करते. असा िपट्र निवडीचा प्रश्न पुरुषांच्या बाबतीत उद्भवतच नाही. आता मात्र परिस्थिती थोडी बदलताना दिसते आहे. आजकालची तरुणाई आणि चाळिशीच्या आतले युवक चित्रविचित्र छपाई असलेले कपडे घालताना सर्रास दिसतात.  
आता सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे वळूया, तो म्हणजे कपडा घालणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचा आकार. आणि येथेच आपल्याला ड्रेस डिझायनर्सची फार मोलाची मदत होते. तंत्रशुद्धपणे विचार करायचा झाला तर शरीराचा आकार म्हणजे उंची आणि रुंदी. उभ्या- आडव्या रेषा किंवा चौकडीचे प्रिंट मागील लेखात सांगितल्याप्रमाणे – रेषा रेखांकनामुळे होणाऱ्या दृष्टीभ्रमासारखेच परिणाम करतात. आपल्या किंवा कोणाच्याही शरीराचा आकार नेमका कसा आहे हे ठरवता येणे फार कठीण. कोणाचे खांदे ताठ आणि रुंद असतात, तर कोणाचे उतरते, कोणाचा पाश्र्वभाग खूप मोठा, तर कोणाचा अगदीच अरुंद, कोणाची छाती भरदार, तर कोणाच्या मांडय़ांचा भाग आकाराने मोठा असतो. कोणाचे शरीर अंडाकृती आणि कंबर जाड असते. अशा सर्वासाठी कोणत्या प्रकारची प्रिंट्स योग्य दिसतील त्याचा विचार करूया.
पुलांची नक्षी
सामान्यत: फुलांची नक्षी असलेले कपडे सर्व वयोगटाचे स्त्री-पुरुष घालतात. असे कपडे तुम्ही वयाने लहान किंवा तरुण असल्याचे भासवतात, पण अशीच गडद आणि मोठय़ा आकाराची कपडय़ावरील नक्षी पस्तिशीच्या आतल्या कोणालाही शोभून दिसते. त्यापुढच्या वयोगटातल्या माणसांनी तरल रंगातली नाजूक फुलांची नक्षी निवडणे योग्य. उंच व्यक्तींना मोठय़ा फुलांची नक्षी चालून जाते, पण कमी उंची असणाऱ्या व्यक्तींनी लहान आकाराची विरळ फुलांची नक्षी असलेला कपडा निवडलेला चांगला.
भौमितिक चित्र
वेगवेगळ्या रेषा, उदा. उभ्या, आडव्या, चौकडी, चौरस, आयत, गोलाकार याचा वेगवेगळा किंवा एकत्रित वापर म्हणजे भौमितिक चित्र किंवा जॉमेट्रिक प्रिंट्स. यांतील जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आकार म्हणजे वर्तुळे. यांचा पोल्का डॉट्स म्हणून उल्लेख केला जातो. फार पूर्वापार वापरात असलेले या प्रकारचे डिझाइन सर्वच वयातील व्यक्तींना प्रामुख्याने तरुणांना जास्त आकर्षति करते. अतिबारीक किंवा अतिजाड व्यक्तींनी मोठय़ा आकाराच्या व अगदी जवळजवळ पोल्का डॉट्स असलेले कपडे टाळायला हवेत, कारण त्यामुळे जाडी व्यक्ती आणखी जाड, तर बारीक व्यक्तीच्या आकारमानाशी ते मिळतेजुळते दिसणार नाही.
पेसली प्रिंट
कापडावरील नक्षीत मुबलक प्रमाणात वापरण्यात येणारा आणखी एक प्रकार म्हणजे पेसली प्रिंट, याला भारतात कैरी प्रिंट असेही म्हणतात. कपडे, चादरी, हातावरच्या मेहंदीत हा नक्षी प्रकार वापरण्यात येतो,आणि मुख्य म्हणजे तो सर्व वयोगटांतील व्यक्तींना शोभून दिसतो. यातील लांबट (उदा. पíशयन) नक्षी कमी उंचीच्या व्यक्तींना योग्य दिसते. तर तशीच भारतीय प्रकारची नक्षी अंगाने सडपातळ व्यक्तींना शोभते.  
अमूर्त चित्र
या प्रकारच्या चित्रांना प्रमाणबद्धता नसते व ती अंगभर पसरलेली असतात. खरे तर अशी नक्षी ठळक आणि आकर्षक असते, पण ती सगळ्यांनाच शोभून दिसेल असे नाही. यासाठी वय महत्त्वाचे नाही, पण वापरलेली रंगसंगती, नक्षीचा आकार हे कपडा वापरणाऱ्या व्यक्तीच्या आकारमानाला शोभायला हवे हे नक्की. उंच व्यक्तींनी मोठय़ा ठळक अमूर्त रचनेची, तर बारीक माणसांनी मध्यम आकाराच्या अमूर्त रचनेची निवड करावी.
मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्या
पारंपरिक वस्त्र प्रावरणांमध्ये प्राणी, पक्ष्यांच्या आकारांच्या नक्षीचा वापर अधिक दिसत असला तरी आता पाश्चात्त्य पद्धतीच्या आऊटफिट्समध्येही हे आकार वापरले जातात. अशी नसíगक आणि ट्रेंडी नक्षी सर्व वयोगटांतील व्यक्तींना शोभते. चित्ता प्रिंट, झेब्रा प्रिंट , टायगर प्रिंट अशी प्राण्यांच्या आकाराची चित्रे १९५० च्या दशकात पाश्चात्त्य पद्धतीच्या पॅन्टस, जाकिटे, कुत्रे यावर मोठय़ा प्रमाणात दिसत असत. हे प्रकार वापरणाऱ्या व्यक्तीचा आकार महत्त्वाचा नसून वय महत्त्वाचे असते.
पौराणिक चित्रे
या प्रकारच्या चित्र नक्षीला वस्त्र उद्योगात चांगलीच मागणी आहे. भारतात आणि भारताबाहेर या स्टायलिश प्रिंटचा वापर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो. यात सर्वाना आवडणारी कपडय़ावरील चित्र म्हणजे राधा-कृष्ण, गौतम बुद्ध, भगवान शंकर आणि गणपती. या नक्षीचा वापरणाऱ्याच्या आकाराशी संबंध नसतो, पण वयाशी मात्र असतो. ही पूर्णाकृती चित्रे कोणताच दृष्टीभ्रम निर्माण करीत नाहीत. अर्थात तरुण वर्गात या प्रकारच्या प्रिंट्सना भरपूर मागणी असते.
कपडय़ांवर आणखीही अनेक चित्रपद्धती वापरल्या जातात. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या वैचारिक दृष्टिकोनानुसार, डिझायनर्सनाही कपडय़ांवर निरनिराळे प्रयोग करण्याची आयतीच संधी मिळते.

एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस
या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, आपल्या कांतीला कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना, ही फॅशन शोभून दिसेल ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. पण तुमच्या आऊटफिट्सविषयी, फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे  viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Geo Studios Stree 2 movie Oscar Entertainment news
जिओ स्टुडिओजला नवी झळाळी…नव्या वर्षात रंजक चित्रपटांसह सज्ज
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Loksatta viva Fashion Trends Fashion Sustainable Fashion Celebrities
सरत्या वर्षातले फॅशन ट्रेंड्स
Shocking video Selling fake vegetables cauliflower viral video vegetable market frauds unhygienic vegetables
लोकांच्या जीवाशी खेळ! महिलांनो बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल
Shocking video found plastic in ginger garlic paste unhygienic shocking video goes viral
गृहिणींनो तुम्हीही विकतची आलं-लसूण पेस्ट वापरता? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

(अनुवाद – गीता सोनी)

Story img Loader