एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
एखाद्या शब्दाच्या नशिबी प्रचंड लोकप्रियता लिहिलेलीच असते. काही शब्द अगदी मोजूनमापून विचारपूर्वक लिहिले, बोलले जातात तर काही शब्द ओंजळीतून पसा पसा धान्य सांडावे तसे आपल्या मुखातून सांडत असतात. डिवेलपमेंट हा शब्द याच कॅटेगरीत यावा. ‘या भागाची काय पटकन डेवलपमेंट झाली नाही?’ किंवा ‘रोल डेव्हलप करायला दिलाय’ अथवा ‘बाळाची डेवलोपमेंट छान आहे, काळजी करू नका’ या आणि अशा विविध संवादात सर्वसंचारी असलेला हा शब्द आहे. मात्र वापर जितक्या विविध क्षेत्रांत, तितक्याच उच्चारांच्याही नानापरी. यातला नेमका उच्चार कसा वेचायचा हेच आपल्याला कित्येकदा उमगत नाही. वरच्या तीन तीन वेगवेगळ्या वाक्यात हाच शब्द तीन वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. डेव्हलपमेंट, डेवलपमेंट, डिविलपमेंट, डेवलोपमेंट अशा विविध पद्धतीने या शब्दाचा उच्चार होत असला तरी अचूक उच्चार आहे डिवेलपमेंट. ऊी५ी’स्र्ेील्ल३ या स्पेलिंगमधल्या ’ चा उच्चार लो न करता ‘ल’ होणे,ीि चा ‘डे’ न होता ‘डि’ होणे, अशा काही खुणा डोक्यात पक्क्या ठेवल्या की काम झालं. या शब्दाचं स्पेलिंग छान मोठ्ठं असलं तरी कदाचित तुम्हीही शालेय वयात हा अनुभव घेतला असेल की हे स्पेलिंग पाठ व्हायला काही त्रास होत नाही. ते पटकन लक्षात राहून जातं. कदाचित लिहिण्या-वाचण्यात हा शब्द बऱ्याचदा येत असल्याने असे होत असेल.
फ्रेंच भाषेतील मूळ शब्दाचा हा इंग्रजी अवतार. इंग्रजी भाषेत विकास, विस्तार या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. पण फ्रेंचमध्ये ३ ४ल्लऋ’ िअशा अर्थाने हा शब्द मुळात वापरला गेला. उलगडत जाणेचा प्रवास विकास, विस्तार होणे अशा अर्थच्छटांपर्यंत गेला. आणि आज अगदी इंग्रजीशी फार संबंध नसणारी व्यक्तीही ह्य़ा शब्दाचा वापर फार सहज करताना आढळते. कारण विविध क्षेत्रांत या शब्दाचा उपयोग अनिवार्य आहे.
या उच्चाराकडे जर नीट कान देऊन लक्ष दिलं की आढळणारी अजून एक गोष्ट म्हणजे या डिवेलपमेंटमधल्या ‘वे’ चा उच्चार अनेकांकडून ‘व्हे’ असा होतो. डिव्हेलपमेंट असा काहीसा, जसा वेजिटेरियन मधला ‘वे’ अनेक हॉटेल्सच्या पाटय़ांवर ‘वेज’ ऐवजी व्हेज होतो. तसाच काहीसा हा प्रकार आहे.
सध्याच्या काळात डिवेलपमेंट या शब्दाचा विचार करता ‘वाढ’ हाच अर्थ अधिकतर आपल्या डोक्यात पक्का बसलेला दिसतो. मग ती कशीही व कसलीही वाढ का होईना! ज्ञानाच्या बाबतीत मात्र असे चालत नाही. नुसताच ज्ञानाचा आवाका मोठा असून उपयोग नसतो. ती गोष्ट समजून-उमजून आपल्या कृतीत तिचा वापर होणे तितकेच गरजेचे असते. उच्चारांच्या बाबतीतही हाच नियम लागू व्हावा. एखाद्या शब्दाचा उच्चार आपल्याला ज्ञात नसतो. तो आपण आपल्या कृतीत आणतो आणि आपले उच्चार परफेक्शनच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हीसुद्धा असा प्रयत्न केला आहे का? जर असेल, तर ती झाली खरीखुरी डिवेलपमेंट!
डिवेलपमेंट
एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो.
Written by रत्नाकर पवार
First published on: 27-11-2015 at 00:58 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development of language