डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आई! शंकरदाचा फोन आलाय नागपूरवरून. ‘काय म्हणतोय तो?’- आई. अगं तो त्याच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस मुंबईला येणार आहे. सरोदवादनाचा कार्यक्रम आहे. वसंतोत्सव. ‘इस्कॉन’मध्ये वाजवणार आहे म्हणे! त्या दिवशी हा शंकरदाचा फोन आला. वाव! मलापण त्याच्यासोबत गोडधोड पदार्थ खायला मिळतील आता. त्या सर्व देशी-विदेशी कृष्णभक्तांचा सोहळा बघायला मिळेल. आत्तापर्यंत तुम्ही मला चांगलंच ओळखलं असेल, तर हे सर्व जे आई करणार-म्हणणार आहे त्याची मी नक्कल करतेय ते.
तर हा माझा शंकरदा आमच्याकडे शुक्रवार- शनिवार- रविवार कार्यक्रमाच्या निमित्ताने राहायला आला. तो अतिशय उत्तम सरोदवादक आहे. सरोद वाजवण्याचा त्याचा रियाज रोज सकाळी किमान दोन तास चालतो. वेगळ्या प्रकारची मांडी किंवा पायाची बठक घालून त्याला बसायला लागतं. कार्यक्रमाच्या वेळी दोन-तीन तास सलग तसं बसून त्याला सरोद वाजवायची असते. शंकरदा बँकेत कामाला जातो आणि तो सरोदवादनाचे क्लासेसही घेतो. हरहुन्नरी आहे. रात्री एक तास चालायला जातो.
तो घरी येणार म्हणून आईने मस्त मांसाहारी जेवण केलं, गोडधोड बनवलं. खूप गप्पा झाल्या. आमच्या आग्रहाखातर सकाळी त्याने सरोदवादन केलं. त्याच्या चालण्याबोलण्यात आईला एक प्रकारचा थकवा जाणवला. त्याचं खाणं-पिणं उत्तम होतं. पण त्याला उठताना त्रास होत होता. त्याची सकाळी उठल्यावर हाडं दुखायची. तो आईला म्हणाला, ‘अगं आता चाळिशी येईल. असं व्हायचंच’. शंकरदा योगा आणि व्यायामही करायचा. मग सर्व छान असताना शंकरदा असा थकला का होता. ना तो सिगरेट ओढे, ना दारू सेवन करी. सर्वात शिस्तबद्ध दादा आहे तो माझा. कलाकाराला खाली बसून सरोद वाजवलं नाही तर त्याचा जणू आपण प्राणवायूच कापू. त्या खाली बसण्याचाच त्याला त्रास व्हायला लागला होता. शेवटी शनिवारी सकाळी आईने त्याला न सांगता विचारताच रक्तचाचणीसाठी घरी माणूस बोलावला. जीवनसत्त्व ‘ड’ करायला सांगितलं. रविवारी जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा त्याचं व्हिटॅमिन डीचं प्रमाण केवळ ४ होतं. सर्वसाधारण ‘ड’ जीवनसत्त्व ३० ते ४० च्या घरात लागतं, असं आई म्हणाली.
‘ड’ जीवनसत्त्व आपल्या हाडांना लागणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण राखण्यात मदत करतं. या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अतिशय थकवा जाणवतो. पडलं-झडलं तर पटकन फ्रॅक्चर होण्याची संभावना वाढते. हाडं दुखतात. खूप वेळा ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास थायरॉईड किंवा मधुमेह याची लागण झाल्याचा भास होतो. थकवा आल्यामुळे व्यायाम केला जात नाही. खाण्यात काही अभाव आहे का, अशी शंका येऊन आपण अधिक खातो. पण त्याचाही उपयोग होत नाही. कारण ‘ड’ जीवनसत्त्व आपल्याला खाण्यात मिळतच नाही. तर ते सूर्यप्रकाशामुळे मिळते. सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरातील अचल जीवनसत्त्व ‘ड’ चल जीवनसत्त्व ‘ड’मध्ये रूपांतरित होतं, जे आपल्या शरीराला उपयोगी असतं.
आपल्या घर, गाडी, ऑफिस, जिम या जीवनशैलीमुळे आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळत नाही. एसपीएफ असलेल्या क्रीममुळे, यूव्ही प्रोटेक्शन लावलेल्या काचांमुळे आपल्या शरीरात पूरक सूर्यकिरण जात नाहीत. हल्लीची जीवनशैलीच या ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेला कारणीभूत आहे. पूर्वी अभ्यंगस्नान करायचं म्हणजे अंगाला तेल लावायचं, सूर्यप्रकाशात १०-१५ मिनिटं बसायचं. मग बेसन-मलई लावून गरमगरम पाण्याने अंघोळ करायची. सध्या वेळेच्या अभावामुळे आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. आंघोळ कशीबशी उरकतो आपण. पण या काही छोटय़ा गोष्टी आपण करूच शकतो. ते म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यावर केस सुकवणं, बूट घालणं, फोनवर बोलणं इत्यादी कामांसाठी खिडकीत किंवा गॅलरीत आवर्जून जावं. असं काही मिनिटं कोवळ्या उन्हात वावरल्यानंतरच सनस्क्रीन वगरे लावावं. जर उन्हात फिरणार असू तर सनस्क्रीन वगरे लावावं. जर उन्हात फिरणार नसू तर सनस्क्रीन न लावता बाहेर पडावं. इतर छोटी कामं किंवा फोनवर बोलणं हे आवर्जरून उन्हात करावं. २०-३० मिनिटांचं ऊन आपल्याला आवश्यक आहे.
अर्थात शंकरदाच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची मात्रा वाढवण्यासाठी त्याला मात्र इंजेक्शन आणि नंतर गोळ्यांची गरज लागली. कारण ते फारच कमी होतं. शंकरदा आईचे आभार मानत राहिला आणि मी मात्र गमतीनं त्याला जाताना चिडवत राहिले – आमच्याकडे येऊन सरोदवादनाने कान तृप्त केल्याबद्दल आईने इंजेक्शन देऊन तुला धन्यवाद दिले म्हणून!
शेवटी भरपूर सूचना, भरपूर उपदेश देत आईने त्याला एअरपोर्टवर सोडलं व एक उपदेशपर फोन त्याच्या बायकोलाही केला. या आठवडय़ात आमची मात्र सुटका झाली. हुश्श!