डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
आई.. सुलभाकाकींच्या मुलीच्या लग्नाला जायचंय का? मी आईला विचारलं. सकाळपासून ही साडी नेसायची का ती साडी, हे कानातलं का डायमंड सेट का सोन्याची बोरमाळ!! बापरे! कशाला करतात हे सगळेजण लग्न. किती खर्च करतात, महागडय़ा साडय़ा नेसतात व सर्वाना शाकाहारी खायला घालतात.. मला बाबा लग्नाला जायला कंटाळा येतो. खरं कारण काय माहितीय का? सगळेजण त्याच त्याच चौकशा करत राहतात. ‘अय्या! किती मोठी झालीस! किती लहानपणी बघितली होती .. अगं अगदी बाबांवर गेलीय.. काय करतेस मग सध्या..’ (आयुष्य झोपा काढण्यात आणि खाण्यात वाया घालवते असं सर्वाना वाटतं).. ‘अय्या! मला ओळखलंस का?’ (हो मी फेसरीडर आहे … जन्मापासूनच. प्रत्येक माणसाचं नाव, गाव, फळ, फुल ओळखते) सगळे बोरिंग कुठले!
अर्थातच म्हणून लग्नाला न जायची माझी कारणं.. ‘आई ! मला बरं वाटत नाहीय. मी आले नाही तर चालेल?’ आईला माझे बहाणे माहितीयेत बहुतेक. मी असं काही कारण द्यायचा अवकाश.. आईने अशी एक जळजळीत नजर टाकली माझ्यावर की, पुढचं लेक्चर नको म्हणून मी पलंगावरून उठले आणि गुपचूप बाथरूममध्ये. सर्व आटपून पंजाबी ड्रेस घालून तयार झाले. शेवटी लग्नात जसं म्हटलं होतं तसंच झालं. पण एक मुलगी माझं खूपच लक्ष वेधून घेत होती. लक्ष विचलित करत होती खरं तर.. करीनापेक्षाही तिच्या ‘झिरो फिगरची’ वेगळीच व्याख्या असावी. कंबर तर मी वीतभर मोजू शकत होते. मी हळूच आईला ती मुलगी दाखवली आणि तिला म्हटलं ‘आई! बघ.. तुला कॉम्पिटिशन.’ तिचा बारीकपणा हा कृत्रिम दिसत होता. तिने तोंडावर इतका मेकअप लावला होता की, त्यामागचा निस्तेजपणा, खप्पडपणा झाकला जात होता.
अर्थात आईला हे दाखविल्यानंतर आईची नजर तिच्यावर पडली आणि ती बिचारी आईच्या स्कॅनर खाली आली. आईने हळूच तिची इकडे-तिकडे चौकशी सुरू केली तेव्हा कळलं, ती मुलाकडून चक्क करवली होती. झालं! आईला आपसूक काळजी लागून राहिलीय काही दिवसांनी आई त्यांच्या घरी गेली. अर्थात तिच्या भाचीचा संसार कसा चाललाय हे बघायला. आई गेली तेव्हा कश्मिरा (ती मुलगी) घरीच होती. नीतामावशी (मुलाची आई) आणि अपूर्वा (नववधू) वगरे सर्वजण होते. आईमात्र कश्मिराशी गप्पा मारत होती. बिनामेकअप कश्मिरा अगदीच वाईट दिसत होती. पण तिचा कॉन्फिडन्स मात्र काही वेगळंच सांगत होता. तिचे दात जरासे पिवळसर आणि थोडेसे खराब झालेले होते. आईसाठी चहा-कॉफी, सामोसे, जिलबी समोर ठेवलेलं होतं. आईनी चक्क ते आवर्जून कश्मिराबरोबर खाल्लं. तिलाही अगदी आग्रह करून खायला भाग पाडलं. तिने चक्क का-कू न करता ते चवीने खाल्लं. जर ही मुलगी अतिडाएट किंवा व्यायामप्रेमी असती तर तिने ह्य़ा खाद्यपदार्थाना हातही लावला नसता. तिने ते खाल्लं आणि नंतर लगेच काहीतरी निमित्त सांगून ती खोलीत गेली. आई लगेच भोचकपणा दाखवल्यासारखी अगदी अनौपचारिकतेसारखी धावत तिच्यामागे तिच्या खोलीत गेली. बाथरूममधून ओकण्याचा आवाज येत होता. अर्थात आईचा संशय खरा ठरला.
कश्मिरा स्वतच्या शारीरिक दिसण्यावर व पद्धतीवर मानसिक रोगाची शिकार झाली होती आणि दुख म्हणजे तिच्या घरातल्यांना, तिच्या मत्रिणींनाही त्याचा पत्ताही नव्हता. ती खायची पण लगेचच तिला भयंकर गिल्टी वाटायचं. म्हणून ती सर्व अन्न ओकाऱ्या काढून बाहेर काढायची. स्वत बारीक असणं हे तिने सुंदरतेचं प्रतीक मानलं होत. तिला ही सवय लागली पण ती कोणाशीही हे शेयर करू शकली नाही. आईने कश्मिराला जवळ घेतलं. अजिबात ओरडली नाही. सर्व घरातल्या मंडळींना समजावलं. या प्रकाराला ‘ब्युलिमिया’ (ु४’्र्रें) म्हणतात कसं सांगितले. वयात आलेल्या मुलींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. अतिशय ताण, नराश्य हे वयात आलेल्या मुलांमध्ये भरपूर प्रमाणात दिसतं. ही मुलं समाजामध्ये अत्यंत ताणात वाढतात. जाडेपणावर लोक हसतील, चिडवतील, आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये घेणार नाहीत असे वाटत राहतं. आईने त्यांना समुपदेशकाकडे जायला सांगितले. ज्यामुळे तिला व सर्व घरातल्या मंडळींना फायदा होईल तसेच डॉक्टरांकडेही सल्ला घ्यायला सांगितला. थोडक्यात, या अघोरी उपायापेक्षा मोजकं पौष्टिक खावं व व्यवस्थित व्यायाम करावा. नेहमी मित्र-मत्रिणी अशा कराव्यात, जे आपल्यातील आत्मविश्वास वाढवतील. आपल्याला खाली पाडणार नाही. नको त्या मत्रीपेक्षा मित्र नसलेले चांगले. चला पुरे आता माझं पुराण!