राधिका कुंटे
गेले काही दिवस म्हटलं तर सगळीच समाजमाध्यमं तिरंगा आणि त्याविषयीच्या गप्पांनी भारावलेली नि भरलेली दिसतात. त्यात कोणत्याच वयोगटातील व्यक्ती मागं नाही. अगदी स्वत:चा डीपी बदलल्यावर दुसऱ्यांनीही तसं करण्याचा विनंतीवजा आग्रह केला जातो आहे. त्यामुळे व्हॉटस्ॲप फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ र्वष) हा ट्रेण्ड झाला आहे.
‘अरे त्या अमुकला सर्टिफिकेट मिळालं, for successfully pinning a flag ‘काय सांगतोस?’
‘हो.’
‘अरे यार, मलाही पाठव ना ती लिंक.’
‘htpps:// harghartiranga. com’
‘थँक्यू.’
गेले काही दिवस अशा धर्तीचे संवाद होत आहेत किंवा व्हॉटस्ॲप मेसेजेस सर्रास केले जात आहेत. अनेकांच्या डीपीवर तिरंगा विराजमान झालेला आहे. कुठे फक्त तिरंगा आहे. कुठे आकाशात लहरणारा स्तंभासह ध्वज दिसतो आहे. कुठे झेंडा हातात घेतलेली स्वत:ची छबी डीपी म्हणून ठेवलेली दिसते आहे. तर कुठे डीपीवरचा तिरंगा प्रतीकात्मक आहे. तर काहींच्या डीपी आणि कव्हर फोटोवर तिरंगा पुरा छा गया हैं.
काहींनी तो पोस्टातून मागवला तर चक्क त्याची डिलिव्हरी घेतानाचा फोटो आवर्जून टाकला आहे आणि पोस्ट, पोस्टमनसह तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त करणारी पोस्टही लिहिली आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा