कंझोमें

चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. फ्रेंच क्लासिकल मेन्यूमध्ये १७ कोर्सेस असतात. त्यातल्या स्टार्टर्सनंतर येणाऱ्या सूपविषयी आणि त्यानंतरच्या ‘एग कोर्स’विषयी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याला स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डीझर्ट असे तीन कोर्सच माहित असतात. फ्रेंच क्लासिकल मेन्यूमध्ये १७ कोर्सेस असतात. अर्थात सतराच्या सतरा कधी एकाच वेळी खाल्ल्या जात नाहीत. त्यांची विभागणी स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डीझर्ट किंवा आफ्टर्स अशातच होते. बडा खाना असेल तर पाच-सहा कोर्सेस असू शकतात. यामध्ये एक ‘रेस्ट’ कोर्सपण असू शकतो.

सूप
मागच्या सदरात आपण स्टार्टर्सबद्दल माहिती घेतली. आता थोडं सूपबद्दल जाणून घेऊ या. सूप्स मुख्यत: दोन प्रकारची असतात. जाड (thick) किंवा पातळ (thin). थिक सूप्सचे क्रीम सूप्स (जे आपल्याकडे अगदी कॉमन आहे- उदाहरणार्थ, क्रीम ऑफ टोमॅटो), चावडर, बिस्क (हे शेलफिशपासून बनवलं जातं) इत्यादी प्रकार आहेत. थिक सूप खास सूपप्लेटमधून सव्‍‌र्ह केलं जातं आणि सूप खायच्या चमच्याचा वरचा भाग गोल असतो. थिन सूप्समध्ये ‘कंझोमें’ हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. हे सूप पूर्णत: पारदर्शक असत. त्यात तळाला बसलेलं त्याचं गार्निश अगदी स्वच्छपणे दिसून येतं. ‘कंझोमें’ हे कंझोमें कपमध्ये (दोन कान असलेलं सूप बोल) सव्‍‌र्ह करतात.

कंझोमें

काही सूप्स ब्रॉथमध्ये धरली जातात- म्हणजे फार पातळही नाही आणि फार दाटही नाही आणि यात भाज्यांचे आणि मांसाहारी जिनसांचे तुकडे असतात. उन्हाळ्यासाठी काही विशिष्ट थंड सूप्स बनविली जातात. कोल्ड सूप्समध्ये ‘गाझ्पाचो’ (टोमॅटोचं थंड सूप), बोर्ष (बीटरूटचं थंड सूप) ही सूप्स नावाजलेली आहेत.

स्पॅनिश ऑम्लेट
पोच्ड एग ऑन किनोआ केक
प्रॉन बिस्क

 

क्रीम ऑफ अस्पॅरगस

एग कोर्स
एग कोर्स अर्थातच अंडय़ाचा कोर्स.. हो, अगदी बरोबर वाचलंत! पण हे अंडय़ाचे पदार्थ आपल्या नाश्त्यातील अंडय़ाच्या प्रकाराहून थोडे वेगळे असतात. फ्राइड एग, भुर्जी, वगैरे न करता, अंडं ऑम्लेटच्या नाही तर पोच्ड एगच्या रूपात येतं. पोच करणं म्हणजे उकळत्या पाण्यात अंड फोडून शिजवणं- हल्ली वाटी घालून वाफेवर शिजवतात. या ‘पोच्ड एग’वर मग सॉस, भाज्यांचे किंवा चिकनचे तुकडे घालून सव्‍‌र्ह करतात. एग कोर्स हा फक्त लंचला सव्‍‌र्ह केला जातो, डिनरला कधीच नाही. ऑमलेट जरी केलं तरी ते प्लेन नसून स्टफ्ड असतं, नाही तर खूप भाज्या घालून केलेलं पसरट स्पॅनिश ऑमलेट असत. ऑमलेट नुसत्या काटय़ाने (सुरी न वापरता) खाल्लं जातं.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dining table etiquettes and manners