कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट. पास्त्याच्या प्रकारांविषयी आणि ते खायचे कसे याविषयी..
फ्रेंच क्लासिक मीलमध्ये अंडय़ानंतरचा कोर्स असतो पास्ता. जरी इटालियन असला तरी फ्रेंचांनी तो आपल्या जेवणात सामावून घेतला आहे. पास्ता मद्यापासून बनविला जातो. जास्त प्रमाणात ग्लुटीन (गव्हात असलेला एक पदार्थ, ज्यामुळे मदा लवचीक होतो) असलेल्या गव्हाचा वापर पास्त्यासाठी केला जातो. मद्यात तेल आणि मीठ घालून त्याचा गोळा बनविला जातो आणि लाटून निरनिराळे आकार बनविले जातात. आकार बदलला की त्या पास्त्याचं नाव बदलत. भारतात मॅकरोनी हा सर्वात लोकप्रिय पास्ता आहे. पास्त्याचे विविध प्रकार कोणते आहेत ते आता आपण पाहू.
पास्त्याचे मुख्यत: दोन प्रकार असतात एक म्हणजे फ्रेश पास्ता आणि दुसरा ड्राय पास्ता. फ्रेश पास्ता म्हणजे मद्याचा भिजवलेला गोळा लाटून लगेच वापरला जातो तो. तो अधिक रुचकर बनवायचा असेल तर त्यात मदा भिजवताना अंडं घातलं जातं आणि काही वेळा रंगीत करण्यासाठी पालकची प्युरी, बीटरूट प्युरी आदी घातली जाते. ड्राय पास्ता म्हणजे कडक होईपर्यंत वाळवला जातो तो. अर्थात हा बरेच दिवस टिकतो. पास्ता कोणताही असो फ्रेश किंवा ड्राय – तो नेहमी भरपूर उकळत्या पाण्यात शिजवला जातो आणि मगच त्यापासून विविध डिशेस बनविल्या जातात. आपल्याकडे जशी सुगरणीची परीक्षा साबुदाण्याच्या खिचडीवरून होते, तशी बहुतेक इटालियन बायकांची पास्त्यावरून होत असावी! कारण पास्ता असा शिजला पाहिजे की, तो अति शिजून मऊ गिच्च होता काम नये आणि कमी शिजला तर कच्चा लागतो, तसा लागता कामा नये. यातल्या सुवर्णमध्याला al dente (to the teeth) म्हणतात म्हणजेच दातांना थोडा त्यातला कणखरपणा (कच्चटपणा नव्हे!) जाणवला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा