स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकालाच आपलं फिजिक-शरीर सुदृढ असावं असं वाटतं. त्यासाठी त्यांना योग्य डाएट अर्थात आहार घेण्याची नि योग्य ते व्यायाम प्रकार करण्याची आवश्यकता असते. आपण वर्कआऊट करतो तेव्हा आपले स्नायू ताणले जातात. प्रसंगी ब्रेक होतात, पण ते प्रोटीन, काबरेहायड्रेटस्, फायबर, व्हिटॅमिन्स नि मिनिरल्स आदींचा समावेश असलेल्या पोषक आहार घेतल्यामुळं ४८ तासांत पूर्वपदावर येऊ शकतात. असा पोषक आहार वेळीच घेतला गेला नाही तर आपण केलेल्या वर्कआऊटला पूरक असं पोटात काहीच न गेल्यानं स्नायूंना शक्ती पुरवली जाणार नाही. ते बळकट होण्याऐवजी उलट कमकुवत होतील. तुमची ‘शक्तिमान’ व्हायची स्वप्नं हवेत विरून जातील नि तुम्ही अशक्त व्हाल. वर्कआऊट करणं नि डाएट करणं या दोन्ही गोष्टी व्हायलाच हव्यात. डाएट ही गोष्ट प्रत्येकाची लाइफस्टाइल, वर्कआऊटची इन्टेन्सिटी-ताण, होऊन गेलेली आजारपणं आणि सध्या खात असलेल्या आहारातून मिळणारं पोषण यावर अवलंबून असतं. त्यामुळे डाएट सेट करताना या सगळ्या मुद्दय़ांचा सखोल विचार करून आपल्याला ते सेट करावं लागतं. हा आहार चौरस असावा, तरच रिकव्हरी होणं शक्य असतं नि त्याचीच पुढं चांगली निष्पत्ती होऊन आपलं व्यक्तिमत्त्व सुदृढ नि आकर्षक होऊ शकतं.
आपण जे खातो, तसे आपण दिसतो
अनेकदा तरुणाईचा आरोग्याला हितकारक ठरणारा आहार टाळण्याकडंच कल असतो. बर्गर, पिझ्झा, पेस्ट्रीज, कोल्ड िड्रक्स असं जंक फूडच त्यांना हवं असतं. खरं सांगतो की, यात काडीमात्र कॅलरीज नसतात. ना इतर कोणतीही पोषकद्रव्यं. त्यातले फॅटस् साठत जाऊन जाऊन आपण ओबेस होऊन जातो. आपल्याला सुस्ती येते. पोषक आहाराअभावी आपण बौद्धिक नि शारीरिकदृष्टय़ा कमकुवत होऊन जातो. म्हणूनच ‘आपण जे खातो, तसे आपण दिसतो’, असं म्हटलं जातं, ते उगाच नाही.
आपण वर्कआऊट केल्यावर आपल्या स्नायूंच्या बळकटी नि रिकव्हरीसाठी आणि एनर्जेटिक वाटण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन आणि काबरेहायड्रेटसचा आहारात समावेश असणं आवश्यक असतं. अंडं, मासे, चिकन, टोफू, पनीर, योगर्ट, मोड आलेली कडधान्यं इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. पदार्थ पचणं सोप्पं होण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ, अॅण्टिऑक्सिडण्टससाठी हिरव्या भाज्या नि फळं खावीत. आपली प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या व्हिटॅमिन्सचाही आहारात समावेश करावा. चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे आजार पळून जातील नि स्किन तजेलदार होईल. डाएटमध्ये हे एवढे ढेरसारे प्लस पॉइंटस आहेत. त्यामुळे तुम्ही फिट नि सुंदर दिसाल.
चांगलं खा, चांगलं दिसा
सेलिब्रिटीज त्यांच्या फिटनेसची काळजी कशी काय घेत असतील, हे जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांना असेल. सेलिब्रेटी मंडळी ही साधारणपणं शो बिझनेसमध्ये असल्यानं त्यांना एका विशिष्ट प्रकारची
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा