पहाटे पहाटे हवेत जाणवू लागलेला गारवा, मार्केटमधली पणत्या-आकाशकंदिलांची हजेरी नि फराळासाठी देऊ घातलेली वाणसामानाची यादी.. अशा अनेक गोष्टींतून दिवाळीची वर्दी कधीच मिळालीय. कुणाच्या परीक्षा संपल्यात तर कुणाच्या संपत आल्यात. काहींची बारावी तर कुणाच्या इतर कसल्या ना कसल्या परीक्षा. अभ्यास नि परीक्षा सांभाळून कॉलेजगोअर्सचं दिवाळीच्या सुट्टीतलं प्लॅिनग आहे तरी काय, ते जाणून घेऊ या, प्रातिनिधिक कॉलेजगोअर्सच्या माध्यमातून !
हा छंद जिवाला..
दोस्तहो, दिवाळीची सुट्टी सुरू होतेय. या लाडक्या सणासाठी ढेरसारी शॉिपगची तयारी तुम्ही करतच असाल. स्मार्टफोनसाठी लाडीगोडीची डिमांड, ड्रेसेस व्हरायटी, मेवा-मिठाई नि फराळाची चव वगरे वगरे. यातला मेन प्लस पॉइंट म्हणजे कॉलेजला असणारी दिवाळीची सुट्टी ! या सुटीत मनसोक्त झोप, निरुद्देश भटकंती, पार्कातल्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि खादाडी हे सगळं आपण करतोच. पण तेच तेच करायचा कंटाळा येणारच. वेगळेपणा नसेल तर ती सुट्टी कसली ?
सुट्टीच्या प्लॅिनग्जमध्ये मूव्हीज किंवा नाटक बघणं, चौपाटीवर भटकणं, कुटुंबासोबत बाहेरगावी फिरायला जाणं या झाल्या कॉमन गोष्टी ! प्रत्येकाची आवड आणि सवड वेगळी असते. त्यानुसार काहीजण ट्रेकिंग, रॅपिलग, रात्री आकाशदर्शन, कॅम्प्सना जाणं असे बेत आखतात. कुणी एक अनुभव म्हणून व्हेकेशन जॉब करतात. काहींना मात्र सुट्टीत आपले छंद जोपासायचे असतात. मग कुणी अनिमेशन-व्हिडीयो गेम्स डिझाइिनग, वेब डिझाइिनगसारखे कोस्रेस करतात. कुणी आपापल्या आवडीच्या वाचन प्रकारांचा आणि दिवाळी अंकांचा आनंद घेतात. कुणी अक्षराला वळणदार करण्यासाठी कॅलिग्राफी शिकतात.
‘क्रिएटिव्हिटी’ ही गोष्ट अशी आहे, की जी थोडीशी शोधा, ती सापडतेच. कल्पना भरारी मारते पुढय़ात येतेच. मग कुणाला ती पॉटरी मेकिंग, ग्लास पेंटिंग, वारली आर्ट, ड्रॉइंग, पेंटिंग, आर्ट अँण्ड क्राफ्ट, वॉलपीस मेकिंग, कॅन्हास पेंटिंग, फ्लॉव्हर मेकिंग, टाइल्स डिझाईिनग, रांगोली मेकिंग, हँण्डमेड ज्वेलरी, फोटोग्राफी अशा कलेत गवसेल. तर कुणाला चक्क डान्सच्या वर्कशॉप्समध्ये गवसेल. वेस्टर्न, बॉलीवूड, अमेरिकन, लॅटिन, हिपहॉप अशा फॉर्ममधला तुमचा आवडता डान्स शिकता येईल. म्युझिक हा तरुणाईचा वीक पॉइंट. तेच शिकून घेतलं तर ? येस्स ! गिटार, कॅसिओ, किबोर्ड, पियानो, व्हायोलिन, अक्टोपॅड, ड्म्र्स, तबला अशी इन्स्ट्रमेंण्टस शिकता येतील. इतरांच्या अभिनयाला आपण नेहमीच दाद देतो. आपल्यालाही अशी दाद हवी असेल तर अँिक्टग वर्कशॉप्स अटेंड करता येईल. सॉफ्ट टॉइज विकत घेण्यापेक्षा ती कशी करायची ते शिकून घेऊन सगळ्यांना छान गिफ्ट देता येईल. कुकिंग, चॉकलेट मेकिंग, केक मेकिंगमध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी खूप क्सासेस आहेत. स्पोट्रस फॅन्ससाठी स्वििमग, बॅडिमटन, टेबल टेनिस, चेस, बास्केटबॉल आदी खेळांचे कॅम्प्स आयोजित केले जातात. या सगळ्या क्लासेस आणि वर्कशॉप्सची माहिती इंटरनेट आणि पेपर्समधून मिळते, फक्त त्याकडं लक्ष द्यायला हवं. कारण हे छंद आपण आपल्या आवडीप्रमाणं जोपासणार असतो. ती आपली निवड असल्यानं त्यात अडकण्याची भावना नसते. सो, दिवाळीचा सण, त्यानिमित्तानं केलेलं शॉिपग आणि सुट्टीतल्या फेव्हरेट हॉबीज हे भारी कॉम्बिनेशन मनसोक्त एन्जॉय करा. जस्ट एन्जॉय !
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा