हा वीकएंड रंगांच्या उत्सवासाठी आहे. आपल्याकडे होळी, धुळवड, रंगपंचमी. रंग खेळण्याचे दिवस कुठलेही असू शकतात. या रंगोत्सवासाठी आता जोरदार प्लॅनिंग सुरू असेल. होळी कुठे खेळायची, कपडे कुठले घालायचे इथपासून केस, त्वचा आणि मेकअप इथपर्यंत. यातली प्रत्येक बाब परफेक्टच असली पाहिजे, कारण, संपूर्ण रंगले असतानाही तुम्ही सुंदर दिसाल. विशेषत या रंगांमुळे केस आणि त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी थोडी पूर्वतयारी आणि खेळ झाल्यानंतर थोडी घ्यायची काळजी घ्यावी लागेल.
रंग घालवण्यासाठी केस केवळ श्ॉम्पूने धुऊन त्यानंतर कंडिशन करणं, पुरेसं नाही. त्यासाठी काही सलॉन ट्रीटमेंट्स आवश्यक आहेत. आजकाल होळीच्या रंगांमध्ये अत्यंत घातक रसायनं वापरली जातात ज्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होणं स्वाभाविक आहे. त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करतोच, पण केसांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. रंगांपासून केसांची होणारी हानी रोखण्यासाठी रंग खेळण्यापूर्वीच केसांना तेल लावणं आवश्यक आहे. तुमचे केस लांब असोत वा आखूड, त्यांना तेल लावणं हा एक उत्तम उपाय आहे. असं मानलं जातं की, केसांना तेल लावल्याने रंग केसांना फार लागत नाहीत. नसíगक तेलांचा वापर केल्याने रंगांमुळे केसांची होणारी मोठी हानी वेळीच रोखता येते.
‘रंगामुळे केसांची हानी होऊ नये म्हणून सलॉन ट्रीटमेंटसाठी आम्ही स्टीमसह हॉट ऑइल सलॉन ट्रीटमेंटची शिफारस करतो. ज्यात केसांना मोठय़ा प्रमाणावर मॉश्चरायिझग मिळतं. या प्रक्रियेत तेल छिद्रांमधून खोलवर मुरतं आणि संरक्षक कवच निर्माण करतं’, असं  नॅचरल्स हेअर अ‍ॅण्ड ब्युटी सलॉनचे क्रिएटिव्ह डायरेक्टर एस तलिना यांनी सांगितलं. हे उपाय केले तरी रंग खेळण्यापूर्वी केसांचा बन बांधावा किंवा वेणी घालावी, अशाने त्यांना रंगांपासून संरक्षण मिळतं, असंही ते म्हणाले.

काय करायचं आणि काय  टाळायचं
१. रंगाच्या पाण्यात खूप ओलं होऊ नका आणि ते पाणी दीर्घकाळ अंगावर राहू देऊ नका. अंगावरचा रंग लवकरात लवकर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
२. रंग खेळून झाल्यानंतर पुढचे तीन दिवस तरी केसांना तेल लावत राहा, कारण केसांना दुरुस्त होण्यासाठी थोडा कालावधी लागतो.
३. बाहेर पडण्यापूर्वी केसांना स्कार्फ किंवा बॅण्ड लावा.
४. गरम किंवा कोमट पाण्यापेक्षा थंड पाण्याने केस धुवावेत.
५. श्ॉम्पूने केस धुतल्यानंतर हेअर कंडिशनर वापरण्यापेक्षा कंडिशिनगसाठी ‘ग्रीन टी’चा अर्क लावावा. हेअर फॉलिकल्सना ते उत्तम पोषण पुरवतं. शिवाय ग्रीन टीमुळे केसांची चांगली वाढ होऊन त्यांना पोषणही मिळतं.
   
रंग खेळल्यानंतर..
रंग खेळून आल्यानंतर केस श्ॉम्पूने धुणं आवश्यक असतं. केसांना झालेल्या हानीची तीव्रता कमी करण्यासाठी माइल्ड श्ॉम्पू वापरावा. या कालावधीत वरचेवर केस धुऊ नयेत, कारण अशाने आधीच शुष्क बनलेल्या केसांमधली उरलीसुरली आद्र्रताही निघून जाईल. केसांना घरगुती नसíगक हेअर मास्क लावावेत. एक सोपा पॅक म्हणजे २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून मध आणि एका अंडय़ाचा पांढरा भाग एकत्र करून ते मिश्रण टाळूला चोळावं आणि ते ३० मिनिटं तसंच ठेवावं. माइल्ड श्ॉम्पूने केस धुवावेत. यामुळे केसांना आद्र्रता मिळते आणि ते गळत नाहीत. सलॉनमध्ये जाऊन प्रोटीन रिस्टोअर केराटिन ट्रीटमेंट घेतल्यास त्याचा चांगलाच फायदा झालेला दिसेल. या ट्रीटमेंटमुळे केस बळकट आणि सरळ बनतात शिवाय ते मऊ बनून त्यांना चमकही प्राप्त होते.
(सौजन्य : नॅचरल्स ब्युटी सलॉन)

Story img Loader