|| आसिफ बागवान

क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनाबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये अनभिज्ञता आहे. पाश्चात्त्य देशांत ‘बिटकॉइन’सारख्या आभासी चलनाच्या व्यवहारांना मान्यता मिळाली असली तरी, भारतात रिझव्‍‌र्ह बँकेने अशा चलनातील व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा वातावरणात फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’चे आगमन होत आहे. फेसबुकचे जगभरातील वापरकर्ते पाहिले तर ‘ग्लोबलकॉइन’चा वापरही वाढेल, अशी चिन्हे आहेत.

Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
Surya and Chandra make Vaidhriti Yog
सूर्य-चंद्र बनवणार अशुभ योग, ‘या’ चार राशीच्या लोकांना घ्यावी काळजी, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
lord Ganesha favourite rashi
नवीन वर्षात ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस, गणपतीच्या कृपेने मिळणार अपार पैसा-संपत्ती
shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ
dog writes ABCD
कुत्रा लिहितो चक्क ABCD; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसानंतर जवळपास चार महिने अवघा भारत नोटाबदलीसाठी बँकांबाहेर उभा राहिल्याचे दिसून आले. नोटाबंदी करून केंद्र सरकारने काय साध्य केले, हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो; परंतु नोटाबंदीच्या निमित्ताने देशात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, ही बाब नाकारता येणार नाही. निश्चलनीकरणापूर्वी अगदी मोजक्याच डिजिटल पेमेंट बँका वा कंपन्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांचे नगण्य प्रमाण असे चित्र होते. मात्र, नोटाबंदीनंतर नाइलाजाने म्हणा किंवा रोकडरहित व्यवहारांचे महत्त्व पटल्याने म्हणा, डिजिटल व्यवहारांची संख्या वाढली. आजघडीला एखाद्या मित्राची पैशांची गरज पूर्ण करायची असेल तर, लागलीच पेटीएम किंवा फोनपे करून  ती भागवली जाते. ऑनलाइन शॉपिंगसाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचे प्रमाणही वाढले. एकूणच पाश्चात्त्य देशांत बऱ्याच आधीपासून रूढ झालेली डिजिटल अर्थव्यवस्था भारतातही बऱ्यापैकी रुजली आहे.

याच डिजिटल अर्थव्यवस्थेला आणखी पुढच्या पायरीवर नेणारी एक गोष्ट येत्या वर्षभरात घडणार आहे. ती म्हणजे, फेसबुकचं स्वत:चं असं आभासी चलन बाजारात येणार आहे. ‘ग्लोबल कॉइन’ नावाचं हे आभासी चलन २०२०च्या पहिल्या तिमाहीत जगभरातील देशांत जारी केलं जाईल, अशी चर्चा आहे. हे आभासी चलन फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही वापरता येईल. एवढंच नव्हे तर फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल. फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल, अशी तंत्रजगतात चर्चा आहे.

आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे. काही दिवसांपूर्वीच एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलरइतके पोहोचले होते. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतके आहे. ‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. सुमारे महिनाभरापूर्वी, २८ एप्रिल रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. ते २८ मे रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.

तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. साहजिकच फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते. फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत.

असे असले तरी, फेसबुकचे ‘ग्लोबलकॉइन’ हे अन्य आभासी चलनांच्या तुलनेत खूप वेगळे असणार आहे. आभासी चलनाची मूळ संकल्पना गोपनीयतेवर आणि मुक्तव्यवस्थेवर बेतलेली आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यावर कोणा एकाच मक्तेदारी नाही (अगदी बिटकॉइनची निर्मिती करणाऱ्या साकोशी नाकामोतोचीही नाही!) नाही म्हणायला या आभासी चलनाचा माग काढणारी ‘ब्लॉकचेन’ यंत्रणा अस्तित्वात आहे; पण ही यंत्रणा केवळ वापरकर्त्यांच्या विश्वासार्हतेसाठी आहे. आपल्याकडे आलेले आभासी चलन हे खरोखरच अस्तित्वात आहे का, याच्या पडताळणीचे काम ‘ब्लॉकचेन’ करते. ‘ब्लॉकचेन’ ही एका प्रकारची अदृश्य साखळी आहे, जी एखाद्या बिटकॉइनचा एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास दर्शवते. या साखळीवरील ठिपके बिटकॉइनच्या हस्तांतराचे टप्पे दर्शवतात. मात्र, ते हस्तांतर करणारे कोण, याचा उलगडा करून देत नाहीत. फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’ची संकल्पना मात्र, यापेक्षा वेगळी असणार आहे. मुळात ‘ग्लोबलकॉइन’च्या उलाढालीवर फेसबुकचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे त्याचे व्यावहारिक मूल्य ठरवण्याचा अधिकारही फेसबुककडे असेल. आभासी चलनाच्या सध्याच्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे हे.

दुसरं म्हणजे, फेसबुकने ‘ग्लोबलकॉइन’ला अधिमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी विविध देशांतील प्रमुख बँकांशी, नामांकित ईकॉमर्स संकेतस्थळांशी, ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मशी त्यांची बोलणी सुरू आहेत. बिटकॉइन किंवा अन्य कोणत्याही आभासी चलनाने गेल्या दशकभरात असे प्रयत्न केले नाहीत. उलट या प्रस्थापित यंत्रणेपासून स्वत:ला किती वेगळे ठेवता येईल, यावरच या आभासी चलनांनी भर दिला.

मग फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’चा प्रसार कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो; पण याचे उत्तर फेसबुकच्याच सद्य:स्थितीत दडले आहे. फेसबुक ही आज जगभरातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक आहे. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या आज अडीच अब्जांच्या आसपास पोहोचली आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकच्या मालकीचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची कल्पनाच अनेकांना उत्साहित करणारी आहे. अशा परिस्थितीत फेसबुकचं आभासी चलन लोकप्रिय होणार नाही तर नवलच. उलट भविष्यात कदाचित ते सर्वात मोठं जागतिक चलनही ठरू शकेल. किमान आभासी दुनियेत तरी!

YYviva@expressindia.com

Story img Loader