गेल्या लेखात आपण अॅक्सेसरीजच्या वापरातील संभाव्य चुकांबद्दल चर्चा केली, आज आपण अॅक्सेसरीजचे फॅशनमधील महत्त्व जाणून घेऊ. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जओि अर्मानी यांच्या मते, ‘अॅक्सेसरीज खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे महत्त्व वाढतच आहे. अॅक्सेसरीजमुळे आपल्या पेहेरावाचे रूपच बदलून जाते. आणि स्त्रियांनाही त्यांच्या कपडय़ांच्या कलेक्शनमध्ये सतत वैविध्य हवेच असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, एखादा ठळक दागिना तुमच्या साध्याशा ड्रेसची शान वाढवू शकतो.’
खरोखर, अॅक्सेसरीज तुमचा लुक परिपूर्ण आणि आकर्षक बनवतात. अर्मानी यांनी सांगितल्याप्रमाणे, कपडय़ांप्रमाणेच अॅक्सेसरीज तुमचा नूर बदलून टाकतात. इतकंच नव्हे तर अॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातात. असं असूनही कित्येक स्त्री, पुरुष फॅशन करताना अॅक्सेसरीजच्या चुकीच्या वापराच्या भीतीनं किंवा अॅक्सेसरीजच्या योग्य वापराबाबत पुरेशी माहिती नसल्यानं, त्यांचा वापर करणं टाळतात.
याबाबतीत या लेखातून काही टिप्स द्यायचा प्रयत्न करते. मग पाहा निरनिराळ्या अॅक्सेसरीज वापरताना तुम्हाला खूप मजा येईल. कोणालाही हेवा वाटावा, असे अॅक्सेसरीजचं स्वत:चं कलेक्शन तयार करण्यासाठी तुम्ही लगेच कामाला लागाल.
तुमच्या नेहमीच्या वापरात असायलाच हव्यात, अशा अॅक्सेसरीज खालीलप्रमाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा