हाय, मी श्रद्धा माझी उंची ४ फूट असून वजन ६० किलो आहे. तसेच माझा वर्ण सावळा आहे. माझ्यासाठी काही चांगले आउटफिट्स आणि मला शोभतील असे रंग सुचवा.
हॅलो श्रद्धा,
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यात तू छान आणि कॉन्फिडंट फील करू शकशील. सर्वप्रथम एक अतिशय छान ट्रेंडी हेअरकट करून घे, जो तुझ्या चेहऱ्याला परफेक्ट दिसेल. तुझ्या लुकमध्ये हेअर कट नक्कीच चार चाँद लावेल. काही गोष्टी ज्यावर तू विशेष लक्ष देऊ शकतेस त्या म्हणजे तुझी स्किन. तुझी स्किन नेहमीच ग्लोइंग आणि हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न कर. त्याचबरोबर मॅनिक्युअर आणि पेडीक्युअरवर जास्त भर दे, जेणेकरून तुझे हात आणि पावले सुंदर दिसतील. त्याचबरोबर सुंदर लांब नखांना ट्रेण्डी नेल कलर लावून उठावदार बनव.
आता तुझा वर्ण सावळ्याकडे झुकणारा आहे, असे तू म्हणालीस. लाइट कलर्स – जसे की यलो, लाइम ग्रीन, टरक्वाइश असे रंग वापरणे पूर्णपणे टाळ. त्याऐवजी पर्पल, वाईन रेड, बरगंडी, बॉटल ग्रीन, नेवी ब्लू, रॉयल ब्लू, अॅक्वा असे कलर्स नक्की वापर. तसेच ग्रे, आर्मी ग्रीन, रस्ट असे कलर्ससुद्धा तुला शोभून दिसतील. लाइट कलर्स आणि पिंकमधील पेस्टल शेड वापरू नकोस.
नेहमी कपडे खरेदी करताना व्हर्टिकल पिंट्र्स पाहूनच कपडे खरेदी कर. तसेच लहान पिंट्र असलेले कपडेच वापर. आडवी पिंट्र असलेले कपडे किंवा मोठी पिंट्र असलेले कपडे अजिबातच वापरू नकोस. वेस्टर्न वेअरमध्ये फिटेड जीन्स वापर. डार्क कलरला प्राधान्य दे. मिड वेस्ट किंवा हाय वेस्ट जीन्स वापर, जेणेकरून त्यात तुझे पाय लांबसडक आणि सुंदर दिसतील आणि त्यामुळे उंचीचा आभास निर्माण होईल. त्याचबरोबर तू सेमी फिटेड मॅक्सी ड्रेस वापरू शकतेस, जे सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. लिनियर आणि लांब गोष्टी वापर, जेणेकरून तू उंच दिसशील. इंडियन वेअरमध्ये नेहमी चुडीदार वापर. सलवार किंवा पटियालीस मध्ये तू बल्की दिसू शकतेस. कुर्तीजमध्ये लांब किंवा सेमी फिटेड कुर्तीज वापर. तसेच सेमी फिटेड अनारकली आणि टय़ुनिक आणि टाइट्स हा तुझ्यासाठी नक्कीच खूप छान पर्याय ठरेल.
तू कम्फर्टेबल असशील तर नेहमीच हाय हिल्स वापर. स्टेलेटोज जर खूपच अनकम्फर्टेबल वाटत असतील तर प्लॅटफॉर्म हिल्स, वेजेस वापरून बघ. या सगळ्यांनी तू मस्त उंच आणि स्लिम वाटशील. त्याचबरोबर ब्राइट कलरमधील बॅग्स वापर तुझ्या व्यक्तिमत्त्व फ्रेश आणि उठावदार दिसेल. मुळात स्वत:बद्दल नेहमी चांगलाच विचार कर. स्वत:बद्दल सकारात्मक विचार केला की आपण आपोआपच सुंदर दिसू लागतो. (अनुवाद : प्राची परांजपे)
प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
अमित दिवेकर -viva.loksatta@gmail.com