मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेची म्यूज अर्थात प्रेरणा बनली आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्वप्निलच्या कलेक्शनचं प्रतिनिधित्व सई करेल.
लॅक्मे फॅशन वीक आणि बॉलीवूड हे समीकरण आपल्याला नवीन नाही. मनीष मल्होत्रासारख्या काही नामवंत डिझायनर्सच्या शोजची घोषणा झाल्या झाल्या यंदा कोणकोणते सेलेब्रिटीज त्याच्या शोला हजेरी लावणार, यावर तर्कवितर्क केले जातात. या सगळ्यापासून मराठी तारे-तारका मात्र काहीशा दूर असतात. नाही म्हणायला माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे यांसारखी मराठमोळी नावं याआधी ही रॅम्पवर झळकली आहेत. तसेच मराठी चॉकलेट बॉय श्रेयस तळपदे आणि नुकतेच निर्माता म्हणून मराठीत पदार्पण केलेला बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख यांची रॅम्पवर नियमित हजेरी असते.
पण अजूनही अस्सल मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची फॅशन शोजमधली हजेरी मात्र दुर्मीळच आहे. येत्या १२ मार्चपासून येऊन ठेपलेला लॅक्मे फॅशन वीक मात्र याला अपवाद आहे. ‘दुनियादारी’च्या यशाने सध्या चच्रेत असलेली मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यंदा डिझायनर स्वप्निल िशदेच्या कलेक्शनची ‘म्यूज’ असणार आहे. यानिमित्त ती स्वप्निलच्या शोला उपस्थित राहणार असून शोच्या आधी आणि नंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्वप्निलच्या कलेक्शनचं प्रतिनिधित्व करणार आहे.
कलाकार आणि डिझायरनच्या कलेक्शनची एक म्यूज असते. अर्थात प्रेरणा असते. या वेळी स्वप्निलनं आपलं कलेक्शन सईला डोळ्यापुढे ठेवून तयार केलं आहे.
स्वप्निल िशदेचं प्रत्येक कलेक्शन वेस्टर्न लूकवर आधारित असतं. लेटेस्ट कलेक्शनसुद्धा त्याला अपवाद नाही. यंदा ‘पठणी साडी आणि ५० व्या दशकातील हॉलीवूड’ यांच्या मिलाफातून घडलेले ‘अॅन अफेअर टू रिमेंबर’ हे कलेक्शन डिझायनर स्वप्निल िशदे लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर करणार आहे. पारंपरिक टेक्स्टाइल आणि पाश्चात्त्य लूक यांचा संगम त्याच्या कलेक्शनमधून पाहायला मिळणार आहे. कलेक्शनबद्दल बोलताना सई म्हणाली, ‘या वेळीच स्वप्निलने त्याचं कलेक्शन मला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलं आहे. त्यामुळे मीदेखील त्याचं कलेक्शन प्रत्यक्षात पाहायला उत्सुक आहे.’
पण तरीही सईला रॅम्पवर पाहण्याची संधी मात्र आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी अजून थोडासा अवकाश आहे. ‘पण येत्या काही वर्षांत माझा एखादा िहदी चित्रपट जर हिट झाला, तर मात्र मला रॅम्पवर वॉक करायची संधी नक्कीच मिळेल’, अशी आशा तिने या वेळी व्यक्त केली. पण तोपर्यंत हेही नसे थोडके. त्यामुळे यंदाच्या लॅक्मेमधील सईची एंट्री नक्कीच पाहण्यासारखी असेल.
फॅशन डिझायनरची ‘म्यूज’
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेची म्यूज अर्थात प्रेरणा बनली आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्वप्निलच्या कलेक्शनचं प्रतिनिधित्व सई करेल.
First published on: 14-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion designing