ऋतू बदलला म्हणजे फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळी फॅशन म्हटलं की समोर येतात ब्राइट आणि बोल्ड कलर्स. अशा या थंडीच्या काळात बाजारात एक ना अनेक उबदार कपडय़ांच्या व्हरायटी आल्या आहेत केवळ स्वेटर्स आणि मफलर नव्हे तर टी-शर्ट्स, स्कर्ट्सपासून ते स्कार्फ आणि कॅपची क्लासी रेंज अनेक प्रकारांत विस्तारली आहे.
प्रत्येक ऋतू आपलं वेगळं फॅशन स्टेटमेंट घेऊन येतो. तसाच विंटर फॅशनचा नवा ट्रेण्ड मागील काही वर्षांपासून येऊ घालतोय. कलरफुल, ब्राइट कपडे हिवाळ्यामध्ये बहारदार रंग भरतील यात शंका नाही. कडक हिवाळ्याचा सामना करायचा तर स्टाइलही हवीच ना. तेव्हा या कुल फॅशनचा डामडौल कसा राखायचा याविषयी जाणून घेण्यासाठी ‘विंटर’ शॉपिंग तो मंगताय बॉस!
काही वर्षांपूर्वी थंडीचे कपडे म्हटले की टिपिकल स्वेटर्स, शाली आणि मफलर मिळायचे त्यांच्या रंगातील वैविध्य सोडलं तर फारशी व्हरायटी नसायची म्हणजे रंग कुठलाही असू दे. स्वेटर हे स्वेटरसारखं दिसायचं पण आता ट्रेण्ड बदलला आहे. उबदार कपडय़ांच्या, लोकरीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्सची चलती आहे. टी-शर्टस् अशा अनेक प्रकारात विंटरसाठी डिझाइन केलेले कपडे मिळू लागल्याने फॅशन युजफूल आणि ब्युटीफुल हे तिन्ही हेतू साध्य होताएत. पूर्वी स्वेटर्स ज्या पॅटर्नमध्ये मिळायचे त्यात उपयुक्तता होती पण स्टाइल मात्र नव्हती. परंतु आता स्ट्रेप्स, बॉर्डर किंवा तत्सम डिझाइन्स असलेले चार-पाच रंगात विणलेले स्वेटर्स कम पुल ओव्हर, झिपर जीन्सवर घालणं हा तर सध्या फण्डा बनला आहे. आज्जी-आजोबांकडून मोठय़ा प्रमाणात वापरले जाणारे मफलर्सही आता आउटडेटेड झाले असले तरी मफलरसारखे दिसणारे स्कार्फ, स्टोल्सना मात्र मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. लोकर आणि कॉटन सिल्कच्या कॉम्बिनेशनमधून बनलेल्या शालीही सध्या इन आहेत. काश्मिरी शालींच्या डिझाइन्सबाबत आपल्याकडे खूप उत्सुकता असायची. पण आता तशाही शाली आपल्या इथे मिळू लागल्या आहेत. स्काफ्र्मध्ये पश्मिना, कॉटन अशा वेगवेगळ्या प्रकारे वैविध्य आणता येतेय. टी-शर्ट्समध्ये राऊण्ड नेक, कॉलर, पोलो नेक, ब्रॉड नेक इत्यादी प्रकार मिळू लागले आहेत. हे वुलन टी-शर्ट्स सिंगल स्टीच असल्यामुळे फार जाडजूड दिसत नाहीत आणि थंडीपासूनही संरक्षण होते. अशा या लोकरीच्या कपडय़ांना फॅशन टच येऊ लागल्याने या कपडय़ांची चलती आहेच. त्यात सध्या थंडीची सुरुवात झाल्याने वुलन कपडय़ांना प्रचंड मागणी आली आहे.
थंडीचं वॉर्डरोब कलेक्शन असं असावं जे तुम्हाला थंडीपासून वाचवील आणि मॉडर्न लुकसुद्धा देईल. मार्केटमध्ये आलेले थर्मल वेअर या दिवसांत वापरा, यात तुम्ही थंडीपासून सुरक्षित राहाल तसेच मनपसंत आऊटफिट घालून स्लिमट्रिम दिसाल.
थंडीत लेदर जेकेटचा वापर अधिक होतोय. आवडत असल्यास तुम्ही डेनिमसोबत ट्राय करू शकता. स्टोल किंवा शाल हे तर थंडीतले स्टाइल आयकॉन. यातही रंगीत स्टोल्स वापरून तुम्ही जुन्या ड्रेसमध्ये नावीन्य आणू शकता. एखादा स्टोल व्हाइट रंगाचा घेतल्यास बऱ्याच कपडय़ांवर चालेल. रंगीबेरंगी स्वेटर डेनिमसोबत वापरल्यास व्यक्तिमत्त्वाला उठाव येईल.
हिवाळ्यात सगळ्यात मस्ट आणि न विसरता येणारी गोष्ट म्हणजे सनग्लासेस. आता सनग्लासेसच्या फॅशनमध्ये रोजच नवीन डिझाइनची भर पडतेय. डोळ्याखालील जास्तीत जास्त भाग व्यापणाऱ्या गोलाकार व अंडाकृती गॉगल्सना हल्ली जास्त मागणी आहे. सनग्लासेसबरोबर टोपीची अदा हिवाळा नक्कीच सुसहय़ करील. हिवाळ्याची तयारी वुलन कॅपशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
िवटर स्पेशल लुक मिळवायचा तर कॅपमध्येही विविधता असणे आवश्यक आहे.
समोरून टोपीसारखी दिसणारी व गाठ असणाऱ्या बंडी कॅप लाही या काळात वाढती मागणी आहे. मुलांना आणि मुलींना दोघांनाही सूट होणारी कॅप म्हणजे देव आनंद कॅप. कोणत्याही आउटफिटला ही कॅप शोभून दिसते.
पार्टी गाऊनबरोबर एलिगंट लुक देणाऱ्या वुलन मटेरिअलमधील ब्रिटिश कॅप कायम इन आहेत.
हुडहुडी भरवणाऱ्या हिवाळ्यात स्टाइल स्टेटमेंट बरकरार ठेवायची तर फॅशनमधील नवनवे प्रयोग असे चालूच ठेवा आणि हिवाळ्यातील लेटेस्ट फॅशनेबल कपडय़ांनी आपला वॉर्डरोब सजवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा