मग यंदा नवीन काय?’ हा प्रश्न सर्व फॅशनप्रेमींच्या चच्रेत असतो. जगभरात होणारया फॅशन शोमधून येणाऱ्या सीझनमध्ये काय ट्रेण्ड असेल याचा अंदाज येतो. येत्या२६ ऑगस्टपासून मुंबईमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’ सुरू होणार आहे. यंदाच्या हिवाळ्याला डोळ्यासमोर ठेवून डिझायनर्सनी केलेली कलेक्शन्स येथे पाहायला मिळणार आहे. कसं असेल यंदाचं कलेक्शन?

अर्दी टोनमधील नवीन शेड्स
हिवाळा म्हटला की, साहजिकपणे गडद रंग आपल्या डोळ्यासमोर येतात. पण त्यामुळे कित्येकदा आपला वॉर्डरोब काळ्या रंगाने भरून जातो. नाही म्हणायला आतापर्यंत मेहंदी हिरवा, नेव्ही ब्लू, ब्राऊन, राखाडी, गडद लाल, मस्टर्ड यलो यांसारख्या अर्दी टोन्स होत्या त्यांच्या दिमतीला. पण त्यांचे पर्याय कमीच होते. पण यंदा या अर्दी शेड्समध्ये काही नव्या रंगांची भर पडली आहे. गडद नारंगी, मोरपिशी, गडद गुलाबी, गडद सोनेरी यांसारखे रंग या पंक्तीत विराजमान झाले आहेत.

युनिसेक्स इज बिग िथग
फॅशनच्या दुनियेतील फेमिनिझमचे वारे आता कोणालाच नवीन नाहीत. त्याच्याच पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये मुलींमध्ये मस्क्युलीन ड्रेसिंगचा ट्रेंड बराच गाजला. त्यानंतर तर बॉयफ्रेंड शर्ट, जॅकेट किंवा डेनिम्सची संकल्पनाही चच्रेत होती. पण या पलीकडे जाऊन आता युनिसेक्स ड्रेसिंग फॅशनमध्ये रुजू होऊ पाहतंय. यामध्ये कपडय़ांना कोणतेही कव्‍‌र्हज नसतात. एखाद्या खोक्यासदृश कपडय़ांचे पॅटर्न्‍स शिवलेले असतात. मुळात या कपडय़ांच्या नावाप्रमाणेच ते स्त्रीपुरुष दोघांनाही वापरण्यास सोयीचे असतात. फक्त दोघांच्या शरीरयष्टीनुसार त्यात साईजचे बदल केले जातात.स्पोर्टस् वेअरमध्ये हा ट्रेंड सर्वाधिक गाजतो आहे. मागच्या सीझनप्रमाणे यंदाही हा ट्रेंड रॅम्पवर नक्की पाहायला मिळेल.

सुपरमॅन, बॅटमॅन आणि जॉर्जेट
सुपरमॅन आकाशात उडताना हवेसोबत फडफडणारा लाल केप असो किंवा बॅटमॅनच्या गूढतेला अजून गडद करणारा त्याचा काळा केप, त्यांच्याशिवाय या सुपरहिरोंचे ड्रेसिंग अपूर्ण आहे. गेल्या वर्षांपासून हे केप रॅम्पवरसुद्धा पाहायला मिळत आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे फारशी थंडी नसते पण लेयर्ड ड्रेसिंग पसंत केलं जात, तिथे जॉर्जेट, शिफॉन कपडय़ांचे हे केप्स सहज वापरता येतात. रेड काप्रेट सोहळ्यांमध्ये हे केप्स सध्या लोकप्रिय आहेत.दुपट्टा, जॅकेटला पर्याय म्हणून यांना सहज वापरता येते.

डेनिम्सना पर्याय काय?
या वर्षी गुगलच्या सर्वेक्षणातसुद्धा मुली पँटपेक्षा स्कर्टस्, ड्रेसेसना जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले होते. भारतातसुद्धा हा ट्रेंड रुजू होतोय. त्यामुळे यंदाही डिझायनर्सचा प्रयत्न डेनिम्स आणि पँट्सना विविध पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये मॅक्सी ड्रेस, वन पीस ड्रेस, स्कर्टस्, जंपसूट्स, पलॅझो असे विविध पर्यायांचा यात समावेश असेल.

फ्युजनचा मंत्र
फ्युजन ड्रेसिंगला मरण नाही आणि ते यंदाही रॅम्प गाजवणार. वेस्टर्न ड्रेसिंगवर भारतीय कला, नक्षीकाम, चित्रकथांचा प्रभाव यंदा पाहायला मिळेल. तसेच वेगवेगळ्या स्टाइलने वापरता येणारे कपडे यात नक्कीच पाहायला मिळतील.

बी बोल्ड, बी ब्युटिफुल
मागच्या वर्षीपासून कपडय़ांपासून ते मेकअपपर्यंत बोल्ड लुकचा प्रभाव प्रामुख्याने दिसून आला. मग ते कुर्ता किंवा ड्रेसची हाय साईडस्लिट असो किंवा मोठाले िपट्र्स त्यात बोल्डनेसवर डिझायनर्सनी जास्त भर दिला. िपट्र्समध्ये मुख्यत्वे तुमच्या आसपास दिसणाऱ्या गोष्टींचा वापर केला जातोय. त्यामुळे यंदा रॅम्पवर भाजीमंडई अवतरल्यास आश्चर्य मानायला नको. मेकअपमध्येसुद्धा कमीतकमी पण बोल्ड मेकअपला पसंती असेल. मागच्या सीझनप्रमाणे डोळे किंवा ओठांवर मेकअपमध्ये अधिक भर दिला जाईल. सध्या पण सुंदर हेअरस्टाइल्स यंदा पाहायला मिळतील.

viva.loksatta@gmail.com

Story img Loader