|| गायत्री हसबनीस

कपडय़ांची स्टाइल जितकी वेगळी आणि विलक्षण तितक्याच वेगळ्या ठरतात त्यावर मॅच होणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज. यात सध्या ज्वेलरी, शूज यापेक्षाही बॅग्जना जास्त महत्त्व आले आहे. खांद्याला लटकणाऱ्या शोल्डर बॅग्ज या लहान-मोठय़ा कशाही असोत त्याप्रमाणे आपला लुकही बदलतो. शोल्डर बॅग्ज असतील तर टी-जिन्स असा लुक जास्त योग्य ठरतो. वन-साइड लॉन्ग बॅग असेल तर गाऊनवर चांगला दिसेल, असा काहीसा हिशेब आपला असतो. हातात क्लच बॅग असेल तर वन-पीस किंवा साडीसारख्या ट्रॅडिशनल आऊटफिटला पसंती मिळते. मात्र सध्या या सगळ्या रुटीन बॅग्जपलीकडे जात वेस्ट किंवा आपण ज्याला बेल्ट बॅग म्हणतो तिचा दरारा वाढतोय.

या सीझनला सेलिब्रिटींपासून ते अगदी पडद्यावरदेखील वेस्ट/बेल्ट बॅगची फॅ शन दिसते आहे. अगदी मॉडेल्सपासून ते गर्ल नेक्स्ट डोअपर्यंत कोणत्याही आऊटफिटवर सध्या वेस्ट बॅगची स्टाईल प्रभावित करते आहे. यंदा बॅगच्या लुकसोबत, त्याची रचना, डिझाइन आणि उपयोग यांचा योग्य समन्वय साधून हुशारीने या बॅग्समध्ये वैविध्य आणले गेले आहे. बॅग्जना हल्ली जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीने डिझाइन केले जाते. त्यामुळे यंदाही लेदर फॅ ब्रिक असलेल्या, क्विल्टेड डिझाइनच्या आणि फ्रन्ट झीपर अशा या बॅग्ज आहेत ज्याला स्मॉल पॉकेट्स असतील. यंदा स्पोर्टी लुक ट्रेण्डमध्ये आहे त्यामुळे ब्लॅक लेदरच्या वेस्ट बॅग्ज त्यावर सुटेबल आहेत. वेस्ट बॅग्जच्या स्ट्रॅप (कंबरेला बांधली जाते ती पट्टी) विविध डिझाइनच्या आहेत. यामध्ये बॅगचा मुख्य रंग जरी काळा असला तरी काळ्या रंगाच्या एकटेपणाची उणीव मात्र बॅगच्या स्ट्रॅपवरील कलरफूल डिझाइनने भरून निघते. तुम्हाला यात ‘अमेरिकन स्टाइल गिटार स्ट्रॅप’, ‘बारकोड प्रिंट स्ट्रॅप’, ‘स्लोगन प्रिंट’ अशा काही आगळ्यावेगळ्या डिझाइन्स बॅगेच्या पट्टीवर म्हणजे स्ट्रॅपवर दिसतील. याशिवाय बॅगवर पूर्णत: वेगळा लुकही ठेवण्यात आला आहे. ‘अ‍ॅनिमल स्कार्फ ’, ‘लेपर्ड’, ‘क्रोकोडाइल’, ‘टायगर स्कीन’, ‘स्नेक स्किन’ या डिझाइनच्या डिझायनर बॅग्ज मिळतील. सिंगल कलर बॅग्जना डबल झिपरचा फंडा वापरला आहे जेणेकरून सिंगल कलर असल्यास डबल डिपरमुळे बॅगचा बाहेरील लुक ठळक दिसतो आणि गरजेनुसार दोन कप्पेही मिळतात. यामध्ये प्रामुख्याने स्काय ब्लू, डार्क ग्रीन, ब्लॅक आणि व्हाइट असे कॉमन रंग पाहायला मिळतात.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या बॅग्जही आल्या आहेत. ज्या ‘सिक्वेन’ या डिझाइनच्या पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला सिंगल झिपर मिळेल आणि फ्रन्टला स्मॉल पॉकेट आहे. सिक्वेन वेस्ट बॅगची रचना सिंगल झिपर आणि फ्रन्ट साइड स्मॉल पॉकेट अशी ठेवण्यात आली आहे. काही सिक्वेन बॅग्सला तुम्हाला सिंगल झिपरच मिळेल आणि यामध्ये प्रामुख्याने ‘पॅच डिटेल’, ‘कलरफूल बीडेड’, ‘जिओमेट्रिकल प्रिंट’, ‘फोइल फॅब्रेडेड’ अशा डिझायनर स्टाइल्स यात आहेत. परंतु ‘इराइडेसन्स’ म्हणजे सप्तरंगी/इंद्रधनुषी कॉन्ट्रास्टवर तुम्हाला डबल डिपर मिळतील.

ऑनलाइन स्टोअरवर सध्या जास्त करून लेपर्ड स्किन डिझायनर वेस्ट बॅग्ज पाहायला मिळतात. त्याचबरोबर चेन स्लाइडिंग आणि मेटल बटण असलेल्या बॅगही जास्त प्रमाणात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये बोल्ड रंग आहेत. ब्लॅक करंट, डार्क नेव्ही ब्ल्यू, वेलवेट पिंक, डार्क शेडेड यल्लो, क्रीमी ग्रे वगैरे. ऑनलाइन स्टोअरवर म्हणजे ‘शीईन’ आणि ‘अजियो.कॉम’वर आणि ‘कूव्स’वर फंकी आणि रॉयल रंगांपासून ते अ‍ॅनिमल प्रिंट आणि विविध स्ट्रॅपच्या चन्की ‘वेस्ट बॅग्ज’ उपलब्ध आहेत. यंदा गिअर असलेल्या युनिसेक्स वेस्ट बॅग्ज आदिदासने आणल्या आहेत. ऑनलाइनवरील डिझायनर बॅग्ज आणि फॅ शन डिझायनर्सनी बनवलेल्या बॅग्जमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे ‘लेदर क्विल्टेड’ वेस्ट बॅग्ज. लेदर क्विल्टेड या रचनेची बॅग दोन्हीकडे आहे. फॅ शन डिझायनर्स म्हणजे रिना सिंग, कीर्ती तुला यांनी ‘बेल्ट स्ट्रॅप’ला जास्त महत्त्व दिले आहे. रिना सिंग हिने एम्ब्रॉयडरीवर भर दिला आहे तर कीर्तीने लेदरवर. सेलिब्रिटींमध्ये ‘गुची’च्या लेदर बॅग्ज जास्त पाहायला मिळतील. आलिया भट्ट, जॅकलिन फर्नाडिस, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, क्रिती सेनॉन, शिल्पा शेट्टी यांनी वेस्ट बॅग्जचा हा फंडा लोकप्रिय केला आहे. आलिया भट्टने चेन स्लाइडिंग आणि डेकोरेटेड लेदरच्या वेस्ट बॅग्ज ट्राय केल्या आहेत. यापूर्वी तिच्या महागडय़ा रेड वेस्ट बॅगची चर्चा होती.

या सर्वात प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे वेस्ट बॅग्जबरोबर केलेली आऊटफिट्सची निवड. प्लिटेड स्कर्ट आणि टीवर क्रोकोडाइल लेदर क्विल्टेड बॅग अजमावू शकता. तर जीन्स आणि क्रॉप टॉपवर आऊटलेयर्ड आणि सिंगल कलर बॅग्जची स्टाइल योग्य ठरेल. यात पिवळ्या, लाल, काळ्या रंगाच्या बॅग्ज मिळतील. ‘गुची’च्या बॅग्ज हिल्स, जप्पर, हुडी आणि जीन्स या कोणत्याही आऊटफिटवर मॅच होतात. मेन्सवेअरमध्ये कॅनव्हास वेस्ट बॅग्ज ट्रेण्डमध्ये आहेत ज्यामध्ये रेट्रो आणि विन्टेज स्टाइलचा प्रभाव आहे. ब्राऊन शेड्स यात प्रामुख्याने पाहायला मिळतील. मेसेन्जर बॅग्जही यंदा मेन्सवेअरमध्ये आहेत. ज्यात स्पोर्टी लुकला वेगळेपण दिलेय. काही वेगळ्या धाटणीच्या वेस्ट बॅग्जही वेस्टर्नमध्ये आहेत. एक म्हणजे ओव्हर साइज्ड आणि दुसरी स्लिम पॉकेट मनी वेस्ट बॅग. या दोन स्टाइल्सही नक्की लवकरच भारतीय फॅ शनमध्ये उतरतील.

वेस्ट बॅग्ज या कॅज्युअल वेअरमध्ये फिट बसल्या आहेत. कॉलेजवेअर, ऑफिसवेअर आणि ट्रॅव्हलवेअर या कुठल्याही पातळीवर फॅ शनेबल युगात पुढे आहेत. त्यामुळे बाजारात दाखल झालेल्या या बॅग्ज दुर्लक्षित होणार नाहीत यात किंचितही शंका उरत नाही.

‘फनी पॅक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि फॅ शनच्या गर्दीत हल्ली सतत झळकणाऱ्या ‘बेल्ट/वेस्ट बॅग्ज’ सेलिब्रिटी, मॉडेल, फॅ शन डिझायनर्स आणि सर्वसामान्य फॅशनिस्टा तरुणींना न आवडत्या तरच नवल! कम्फर्टेबल आणि ईझीवेअरचा हा फंडा अगदी बॅग्जनाही लागू पडतो. त्यामुळे बाहेर जाताना छोटी का होईना बॅग असणं ही गरज आणि ती सांभाळताना होणारी कसरत टाळून फॅ शन स्टेटमेन्टची हौस भागवणारी कंबरेवरची ही आधुनिक पोतडी म्हणजेच वेस्ट बॅग्ज कुल फंडा ठरत आहेत..

viva@expressindia.com