जागतिक चित्रपट महोत्सवात कान फिल्म फेस्टिव्हलचं वेगळं स्थान आहे. कान महोत्सवाचा दिवस जवळ येऊ लागला की, या वेळी ‘तेथे कोण जाणार? कोणते कपडे घालणार?’ अशा विविध चर्चा रंगू लागतात आणि मूळ सोहळा सुरू झाला, की ‘कोणी सर्वात सुंदर ड्रेस घातला होता आणि कोणी तिथे जाऊन आपलं नाक कापलं’ या विषयावर वादविवाद सुरू होतो. कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरून जगभरातील चित्रपट तारे-तारका जातात. त्यांच्या दिसण्यावर, नटण्यावर अर्थातच चर्चा तर होणारच!
गेल्या काही वर्षांत बॉलीवूडच्या तारकांचीही कान्सच्या रेड कार्पेट लूकसाठी चर्चा होत आहे. ऐश्वर्या रायपासून हा ट्रेंड सुरू झाला. विद्या बालन, कतरिना कैफ यांनीही कानचं रेड कार्पेट सजवलं.
पण हा फेस्टिव्हल नक्की असतो काय? आणि त्यासाठी नक्की इतकी तयारी का केली जाते? हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. जगभरातील काही उत्तम चित्रपट, लघुपट दाखवण्याचा प्रयत्न या कान फेस्टिव्हलच्या माध्यमातून केला जातो. त्यातील उत्तम चित्रपटांना गौरवण्यात येते. थोडक्यात तिथे जाऊन लोकांनी चित्रपट पाहणं आणि अप्रिशिएट करणं अपेक्षित असतं. ‘पण अंधाऱ्या खोलीत सिनेमा पाहायला जाण्यासाठी इतकं नटून जाण्याची काय गरज? तिथे तुम्हाला पाहायला लोक येणार आहेत का?’ हा एक भोळा समजही आपण करून घेतो; पण ही नटूनथटून सिनेमाला जाण्याची पद्धत आपल्याकडेही काही नवीन नाही. अगदी यालाही परंपरा आहेच. सिनेमाला किंवा नाटकाला जाताना पूर्वीच्या बायकाही ठेवणीतल्या साडय़ा आणि मोगऱ्याचा गजरा माळून जायच्याच की! अगदी बालगंधर्वाची संगीत नाटकं पाहण्यासाठी बायका नटून जात असतं. आजही थिएटरला सिनेमा पाहायला जायचं म्हटलं तर तुम्ही किती तयार होऊन बाहेर पडता याचा जरा हिशोब मांडा. इथे तर कान्सचं रेड कार्पेट आहे आणि त्याकडे जगाचं लक्ष आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत कानच्या रेड कार्पेटवर अवतरणारी ऐश्वर्या राय ही आपल्यासाठी एकमेव आशेची किरण होती, पण आता सोनम कपूर, विद्या बालननेही कानचे रेड कार्पेट गाजवले आहे.
सोनमचा कान अवतार
नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात ‘लॉरियल्स’ मेकअप बँडने आपली बँड अँबेसिडर सोनम कपूरचे कान फेस्टिव्हलमधील लूक सादर केले. यंदा सोनम हेच तीन लूक कान फेस्टिव्हलमध्ये मिरवताना दिसणार आहे. यंदाचा सोनमचा कान फेस्टिव्हलमधला लूक बाँझ शेडकडे झुकणारा असून त्यात लिप्सवर जास्त फोकस देण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी डोळ्यांना न्यूड शेड्स वापरल्या आहेत. तसेच रेड, ऑरेंज, पिंक या खास समर शेड्सचा वापर तिने केला आहे. यासंबंधी बोलताना सोनम म्हणाली, ‘आपण परदेशातील मेकअप ट्रेंड्स फॉलो करतो, पण ते ट्रेंड्स तेथील मुलींची गोरी स्किन पाहून तयार केले जातात. पण आपल्याकडील इतर मुलींप्रमाणेच माझीही स्किन सावळी आहे, त्यामुळे त्यानुसार यंदा मी बाँझ शेड्सचा वापर करण्याचे ठरवलं आहे.’ यंदा १६ ते १८ मेदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि फ्रिदा पिंटो कान फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर चालणार आहेत. तेव्हा लवकरच आपल्याला सोनमचा हा नवीन लूक पाहायला मिळणार आहे.
नटले मी ‘कान्स’साठी
जागतिक चित्रपट महोत्सवात कान फिल्म फेस्टिव्हलचं वेगळं स्थान आहे. कान महोत्सवाचा दिवस जवळ येऊ लागला की, या वेळी ‘तेथे कोण जाणार? कोणते कपडे घालणार?’
First published on: 09-05-2014 at 07:57 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion in cannes festival