मालिकांमधली फॅशन तरुण मुलींना कशी वाटते याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत

मोठ्ठी नागमोडी किंवा तत्सम विचित्र आकाराची टिकली, गळ्याजड होणारे दागिने, कलरफूल – भडक मेक-अप ही आपल्या टीव्ही सीरिअल्समधल्या नकारात्मक भूमिका वठवणाऱ्या स्त्रीची म्हणजे व्हॅम्पची ठळक लक्षणं.!! आणि आपली बिच्चारी हिरॉईन मात्र कायम प्रथा-परंपरांच्या जोखडात अडकून पारंपरिक वेशभूषा पसंत करणारी. काळानुसार आपली हिरॉईन मॉडर्न झाली आणि कामानिमित्त घराबाहेरही पडू लागली परंतु तिची फॅशन मात्र ट्रॅडिशनलच आहे, असं मत बहुतेक तरुण मुलींनी नोंदवलंय. मालिकेतली फॅशनबाबतच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.!!
vv27पुण्याची ऐश्वर्या म्हणते, ‘आज आजूबाजूला जवळपास सर्वत्र वेस्टर्न कपडय़ांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असतानाही मालिकांमध्ये मात्र साडी आणि ट्रॅडिशनल कपडय़ांमधली स्त्री रंगवली जाते. स्त्रिया आणि दागिने हे नातं सर्वज्ञात असलं तरी त्यामधली ‘अति’जवळीक विशेषत: िहदी मालिकांमध्ये दाखवली जाते. कदाचित टीव्हीवर दाखवायचं असतं, त्यामुळे इतकं ग्लॅमरस करावं लागत असेल. पण ते मला तरी रिअ‍ॅलिस्टिक वाटत नाही.’
‘सगळ्याच मालिका काही अति भडक नसतात,’ ऋता सांगते. तिच्या मते, िहदी मालिका अगदी अनरिअ‍ॅलिस्टिक असतात.
तुलनेने ‘जुळून येती रेशीमगाठी’ किंवा ‘का रे दुरावा’सारख्या मराठी सीरिअल्समधल्या नायिकांची फॅशन मात्र जवळची आणि खरी वाटते.’ काही मालिका या फॅशनच्या दुनियेत ट्रेंडसेटर ठरल्यात. परंतु ट्रेंड सेट करणं हेच vv26मुळी आता ‘आऊट ऑफ ट्रेंड’ झालंय, असं श्रेयाला वाटतं. ‘श्रीमंत घर आणि श्रीमंत नायक असलेल्या िहदी
मालिका आणि मराठीत ‘पुढचं पाऊल’सारख्या मालिका तर आपण २१व्या शतकात आहोत हे सोयीस्करपणे विसरल्यात,’ असं तिला वाटतं.
सीरिअल्समधल्या फॅशनच्या दृष्टीने पाहायचं झालं तर तनुजाचं म्हणणं महत्त्वपूर्ण ठरतं. तिच्या मते, ‘मराठीतली फॅशन खूप लिमिटेड आणि मोनोटोनस असते. परंतु त्यामानाने िहदी मालिकांमध्ये अतिरेक जरी असला तरी नवी फॅशन ही अ‍ॅडॉप्ट होताना दिसते. ट्रेंड सेट vv25करायच्या नादात मराठी मालिकांमध्ये फॅशनचं वैविध्य हरवतंय.’
मुली म्हटलं की त्याना हवी असते व्हरायटी.. कपडय़ांपासून ते चपलांपर्यंत अगदी सगळीकडे!! प्राचीच्या म्हणण्यानुसार नेमका हा पॉइंट मराठी सीरिअल्समध्ये विचारात घेतला जात नाही असं दिसतं. ती म्हणते,
‘कोणतीही मुलगी एकाच पॅटर्न किंवा स्टाइलचे सगळे कपडे घेत नाही. रोज आपल्याला व्हरायटी हवी असते. त्यामुळे हे फार खोटं आणि वरवरचं वाटतं.’
थोडक्यात मालिकांमधली फॅशन दखल घेण्यासारखी असते. पण ती किती रिअ‍ॅलिस्टिक आहे, यावर तरुण मुलींमध्ये मतभेद आढळतात. अजून सुधारणेस बराच वाव आहे तर..!